अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव
स्थान | अंबरनाथ, मुंबई |
---|---|
स्थापना | २०१५ |
संस्थापक | अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अंबर भरारी |
पुरस्कार | एकूण ४५ |
भाषा | मराठी |
संकेतस्थळ | - |
अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव किंवा अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल (लघुरूप:एएमएफएफ) हा महाराष्ट्र राज्यातील अंबरनाथ शहरात दरवर्षी आयोजित केला जाणारा एक मराठी चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,[१] [२] आणि अंबर भरारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जातो.[३]
हा उत्सव इ.स. २०१५ पासून दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जातो.[४] या महोत्सवात अप्रकाशित मराठी चित्रपट आणि लघुपटांना आपल्या कलाकृती प्रदर्शित करण्यास परवानगी मिळते. अंबर भरारीचे अध्यक्ष सुनील चौधरी, निखिल चौधरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपत महामंडळाचे अध्यक्ष यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महेंद्र पाटील हे या महोत्सवाचे संचालक आहेत.[५] तिसरा चित्रपट महोत्सव सप्टेंबर - ऑक्टोबर २०१७ मध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ३० चित्रपट आणि ५० लघुपट प्रदर्शित करण्यात आले होते. याचा पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता.[१] [२]
पुरस्कार
अंबरनाथ चित्रपट महोत्सवातील चित्रपटांसाठी ३५ विविध श्रेणीतील पुरस्कार आणि लघुपटांसाठी १० श्रेणी असतात.[६] [७]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ a b 'Loksatta (5 Nov 2017) ' 'http://epaper.loksatta.com/c/23450930' Archived 2017-11-08 at the Wayback Machine.
- ^ a b 'Pudhari' 'http://newspaper.pudhari.co.in/home.php?edition=Mumbai&date=-1&pageno=4&pid=PUDHARI_MUM#Article/PUDHARI_MUM_20171105_04_6/452px' Archived 2017-11-08 at the Wayback Machine.
- ^ "Yuva Maharashtra". 2018-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-24 रोजी पाहिले.
- ^ Lokmat Official News
- ^ India Today - PTI News Feed
- ^ "AMFF Awards, MahaNews Official Website". 2017-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-24 रोजी पाहिले.
- ^ Loksatta