अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन
महाराष्ट्रातील १ले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ६-७ जुलै२०१३ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्ष दत्ता देसाई (की उत्तम कांबळे?) होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे संमेलन झाले. उद्घाटक प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव दीपक शाह होते.
या संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दोन दिवस झालेल्या या साहित्य संमेलनात मराठी साहित्यातील अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते.
पहा : साहित्य संमेलने; अंनिसचे साहित्य संमेलन