Jump to content

अंध क्रिकेट

अंध क्रिकेट हा अंध अथवा अंशतः अंध व्यक्तींसाठी खेळला जाणारा क्रिकेट खेळ आहे. या खेळाचे आत्तापर्यंत तीनदा विश्वचषकासाठी सामने आयोजित केले गेले आहेत. अंधांसाठीचा पहिला क्रिकेट विश्वचषक नवी दिल्ली, भारत येथे इ.स. १९९८ साली, दुसरा विश्वचषक चेन्नई, भारत येथे इ.स. २००२ साली तर तिसरा विश्वचषक इस्लामाबाद, पाकिस्तान येथे इ.स. २००६ साली आयोजित करण्यात आला होता.