Jump to content

अंतोकु

सम्राट अंतोकू

अंतोकू (जपानी: 安徳天皇; २२ डिसेंबर ११७८ - २५ एप्रिल ११८५) हा ११८० ते ११८५ दरम्यान जपानचा सम्राट होता. केवळ २ वर्षांचा असल्यापासून सम्राटपदावर औपचारिकरित्या बसवल्या गेलेला अंतोकू एका युद्धादरम्यान शत्रूच्या हाती पडण्यापासून वाचावा म्हणून त्याच्याच कुटुंबीयांनी त्याला पाण्यात बुडवून ठार केले होते.