अंतराळ पोशाख
अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना अंतराळ पोशाख असे म्हणतात. अंतराळ अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे वातावरण पुरवितो. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी प्राणवायू तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेवून बनवलेले असतात. या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून अंतराळ यानाबाहेर यात्रा करताना कार्यरत राहता येते. यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ यात्रेला जाताना हा पोशाख अत्यावश्यक असतो. अंतराळवीरांचा पोशाख यात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे अवकाशातील धोक्यांपासून संरक्षण करतात. त्वचेलगत पाण्यामुळे थंड राहणार्र्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित असतो यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो. सर्वांच्या वर बाह्य स्तर व डोक्यावर शिरस्त्राण. हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात. हा पोशाख अंतराळवीराचे सूर्याच्या अतीनिल किरणांपासून बचाव करतो. तसेच अंतराळातील हवेच्या शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतो.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अमेरिकन अवकाशयानांची क्षेत्रमार्गदर्शक पुस्तिका (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर):(इंग्रजी मजकूर) ली स्लेज् व जेम्स एच. गेरार्ड यांनी एकत्रित केलेली अमेरिकन अंतराळ पोशाखांबद्दची यादी व वस्तूसंग्रहालयांचे स्थान जेथे ते ठेवण्यात आलेले आहेत.
- Astronautix.com अंतराळपोशाखांची संपूर्ण यादी (इंग्रजी मजकूर)
- NASA JSC Oral History Project: See link near page end to Walking to Olympus: An EVA Chronology.
- NASDA Online Space Notes (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
- Analysis of the Space Shuttle Extravehicular Mobility Unit - 1986
- NASA Space Shuttle EVA tools and equipment reference book - 1993
- Space Suit Evolution From Custom Tailored to Off-the-Rack
- 'अपोलो' बद्दलचे अभियांत्रिकी आयाम: (इंग्रजी मजकूर) अपोलोच्या अंतराळ पोशाखाबद्दलचा विभाग व हातवाही(पोर्टेबल) जीवसहाय्य प्रणाली.
- एतिहासिक अंतराळयान -अंतराळ पोशाख (इंग्रजी मजकूर)
- नासाचे चित्रदालन Archived 2012-10-25 at the Wayback Machine. (इंग्रजी मजकूर)
- Zvezda History (Russian) Archived 2011-07-27 at the Wayback Machine. Eng
- ILCDover.com - Spacesuits (इंग्रजी मजकूर)
- स्मिथसोनियन एर अँड स्पेस:अंतराळपोशाख भूतकाळातील व भविष्यातील (इंग्रजी मजकूर)
- In April 2011, the VOA Special English service of the Voice of America broadcast a 15-minute program on the evolution of space suits. A transcript and MP3 of the program, intended for English learners, can be found at अंतराळपोशाखांची उत्क्रांती.(इंग्रजी मजकूर)