अंडी उबवणारे यंत्र
अंडी उबवणारे यंत्र म्हणजे कुक्कुट पालन व्यवसायात शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाचे कोंड्याची पिल्ले तयार करण्याचे यंत्र होय. अंडी उबवणी यंत्रामध्ये (इनक्यूबेटर) तापमान, आर्द्रता आणि हवेचे योग्य अवागमन यासारख्या पर्यावरणीय परिस्थितीला नियंत्रित करता येते. बहुतेकदा सूक्ष्मजीवांच्या वाढविण्यासाठी, अंडी कृत्रिमरित्या उबविण्यासाठी, रासायनिक किंवा जैविक अभिक्रिया करण्यासाठी योग्य परिस्थिती प्रदान करण्यासाठी वापरली जाते.
सामान्य नावे
- प्रजनन यंत्र
- अंडी उबवणी यंत्र
- कृत्रिम उबवणी उपकरणे
- अंडी प्रजनन उपकरणे
- सेटर्स[१]
इतिहास
इजिप्शियन लोकांकडे इ.स.पू. ४०० मध्ये उबवणी पद्धत अस्तित्वात होती, दंडगोलाकार इमारत किंवा ओव्हनचा वापर करून ज्याच्या तळाशी आग लावण्यात येत होती. अंडी उबवण्यासाठी अंडी एका अर्धवट राखेत विणलेल्या शंकूवर ठेवली गेली. त्या इमारतीला छप्पर देखील होते, त्यामुळे धूर बाहेर जाऊ शकत नव्हता.
१७३० मध्ये, फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक रेने एन्टोईन फेराचॉल्ट डी रेऊमर यांनी प्रस्तावित केलेले अल्कोहोल-आधारित ताप-मापक यंत्र आणि तापमानाचे अचूक मोजमाप करणे आवश्यक होते.[२] रेऊमरने कृत्रिम इनक्यूबेटरच्या रचनेमध्ये ताप-मापक यंत्रचा वापर केला, १७४७ मध्ये अॅकॅडमी देस सायन्सला सादर केला. १७४९ मध्ये कोणत्याही हंगामात सर्व प्रजातींचे पाळीव पक्षी उबवण्याची आणि वाढवण्याची कला म्हणून प्रकाशित केले.
लायमन बाईस यांनी १८७९ मध्ये कोळशाचा दिवा इनक्यूबेटर तयार केला.[३] पहिले व्यावसायिक मशीन हेअरसन यांनी १८८१ मध्ये बनवले.[४]
उद्देश
इनक्यूबेटर (अंडी उबवणी यंत्र) हे एक उपकरण आहे, ज्यामध्ये तापमान, आर्द्रता आणि हवेचा प्रवाह यासारख्या पर्यावरणीय परिस्थितीला नियंत्रित करता येते. जाते. बहुतेकदा हे सूक्ष्मजीवांच्या वाढविण्यासाठी, अंडी कृत्रिमरित्या उबविण्यासाठी, रासायनिक किंवा जैविक अभिक्रिया करताना योग्य परिस्थिती प्रदान करण्यासाठी वापरली जाते. इनक्यूबेटर हे पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांची अंडी उबविण्यासाठी वापरले जात आहे. कोंबडीची अंडी सुमारे २१ दिवसांत उबविली जातात, परंतु पक्ष्यांच्या इतर प्रजाती जास्त किंवा कमी कालावधी घेऊ शकतात. इनक्यूबेटरचा वापर पक्षी वाढवण्यासाठी देखील वापरले जातात.
अंडी उबवण्यासाठी अंड्यासाठी परिपूर्ण वातावरण आणि परिस्थिती निश्चित केली पाहिजे, कारण तापमान, आर्द्रता आणि आवश्यक वेळी अंडी फिरवणे या घटकांचे नियमन केले जाते. त्यामुळे अंडी योग्य प्रकारे उबवली जातात. कारण ते कोंबडीची नैसर्गिक स्थितीची भूमिका बजावत असते. एकाच वेळी भिन्न प्रजातींच्या पक्षाची अंडी उबवणे शक्य आहे.[५]
कुकुट पालनामध्ये अंडी उबवणी पद्धती
व्यावसायिक दृष्टीकोनातून अंडी उबवणी करण्याच्या एकल-स्थरीय (स्टेज ) आणि बहु-स्थरीय अशा सामान्यपणे दोन पद्धती वापरल्या जातात. एकल-स्टेज मध्ये अंडी उबवण्यासाठी एकाच भ्रूणाची अंडी असतात. एकल-स्टेज मध्ये अंडी उबवण्याचा फायदा म्हणजे वाढत्या भ्रूणाच्या गरजांनुसार हवामान परिस्थिती मध्ये बदल करता येतो. बहु-स्टेज मध्ये अंडी उबवण्यासाठी साधारणपणे ३ ते ६ वयोगटातील विविध भ्रूणांची अंडी या संचात असतात. परिणामी, वाढत्या भ्रूणांच्या गरजांनुसार हवामानातील परिस्थिती योग्य प्रकारे जुळवून घेता येत नाही आणि संचात असलेल्या विविध भ्रूणांना वयोमानानुसार तडजोड करावी लागते. बहु-स्टेज उबवणी प्रक्रियेमध्ये, जुन्या गर्भांद्वारे तयार होणारी उष्णता त्याच मशीनमधील उबदारपणाची मागणी करणाऱ्या तरुण गर्भांना गरम करण्यासाठी वापरली जाते. एकल-स्टेज आणि बहु-स्टेज मधील भिन्न भौतिक मागणीमुळे यशस्वी होण्यासाठी भिन्न उपकरणे आवश्यक आहेत. बरेच औद्योगिक उत्पादक पारंपारिक एकल-स्टेज यंत्र वापरतात.[६]
शैली
आधुनिक उबवणी यंत्र हे विद्युत उर्जेचा उपयोग केला जातो . मोठ्या कोंबडीच्या संगोपनासाठी किंवा अंडी आतल्या आत आणि ते केव्हा तयार होते हे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ठेवले जातात. काही औद्योगिक आधुनिक उबवणी यंत्र इतके मोठे आहेत की, त्यामध्ये १,२४,४१६ इतकी अंडी सामावू शकतात.[७]
वापर
- १०० ते १००० पर्यंत अंडी उबवण्याची क्षमता असलेले यंत्र उपलब्ध.
- ग्रामीण युवक, कुक्कुटपालन करणारे शेतकरी, स्वमदत गट, शैक्षणिक संस्था /प्रयोगशाळा यांसाठी अतिशय उपयुक्त.
फायदे
- कमी किमतीची अंडी उबवणी यंत्र उपलब्ध आहे.
- हे पूर्णपणे स्वयंचलित मशीन आहे बाह्य पर्यवेक्षण किंवा नियंत्रण आवश्यक नाही
- एखादी व्यक्ती हाताळू शकते किंवा सहजपणे ऑपरेट करू शकते.
- यंत्राचे वजन ८५ - ८७ किलो असते.
हे सुद्धा पहा
- कुक्कुटपालन
संदर्भ
- ^ Keller, André A. (2018). Mathematical Optimization Terminology. Elsevier. pp. 13–237. ISBN 978-0-12-805166-5.
- ^ "Les modalités de traitement sont très différentes entre le secteur spécialisé des soins de santé mentale et le secteur des soins primaires". dx.doi.org. 2012-03-09. 2020-04-30 रोजी पाहिले.
- ^ Rude, Emelyn,. Tastes like chicken : a history of America's favorite bird (First Pegasus books edition ed.). New York. ISBN 978-1-68177-163-2. OCLC 923794443.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link) CS1 maint: extra text (link)
- ^ Page, Jason S. (2013-06-04). "Boildown Study on Supernatant Liquid Retrieved from AW-106 in December 2012". Cite journal requires
|journal=
(सहाय्य) - ^ Piestun, Y.; Druyan, S.; Brake, J.; Yahav, S. (2013-04). "Thermal treatments prior to and during the beginning of incubation affect phenotypic characteristics of broiler chickens posthatching". Poultry Science. 92 (4): 882–889. doi:10.3382/ps.2012-02568. ISSN 0032-5791.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Tucker, Philippa (2017-06-22). "A prospective randomised trial comparing embryo development in the MINC incubator versus the EmbryoScope incubator". dx.doi.org. 2020-04-30 रोजी पाहिले.
- ^ "September 6–12, 2014". The Lancet. 384 (9946): i. 2014-09. doi:10.1016/s0140-6736(14)61491-4. ISSN 0140-6736.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)