Jump to content

अंजोरा

अंजोरा (Anjora) : महाराष्ट्रातील अंजोरा हे गाव गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात आहे. गोंदिया शहरापासून अंजोरा ३५ कि.मी. अंतरावर आणि आमगाव गावापासून आमगाव-देवरी रोडवर ९ कि.मी. अंतरावर आहे. अंजोरा पासून देवरी २७ कि.मी. तर सालेकसा १२ कि.मी अंतरावर आहे. गावात डिजिटल शाळा आहे, तेथे ८व्या इयत्तेपर्यंत मराठी व सेमी-इंग्रजी शिक्षणाची सोय आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पशू वैद्यकिय दवाखाना, पोस्ट ऑंफिस, सावित्रीबाई फुले अध्ययन कक्ष व सार्वजनिक वाचनालय आहे. गावाबाहेर आमगाव रोडवर बाबा कुर्रापाटचे मंदिर आहे. अंजोरा महसुली गावात अंजोरा व भालीटोला या दोन गावांचा समावेश आहे. पोस्टल कोड ४४१९०२ हे आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. जवळचे रेल्वे स्थानक आमगाव हे १० कि.मी. अंतरावर आहे.