अंजू बॉबी जॉर्ज
भारतीय लांब उडी स्पर्धक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल १९, इ.स. १९७७ Changanassery | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
Sports discipline competed in |
| ||
नियोक्ता | |||
पुरस्कार |
| ||
| |||
अंजू बॉबी जॉर्ज (जन्म १९ एप्रिल १९७७) ही एक भारतीय ॲथलीट आहे.
सुरुवातीचे जीवन
अंजू यांचा जन्म केरळच्या कोट्टायम तालुक्यातील चीरनिरारा गावातील कोचुपरम्बी कुटुंबात झाला. तिच्या वडिलांनी तिला ॲलेटिक्समध्ये आणले. तिने सीकेएम कोरथोड स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले व विमला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. कोरुथोड स्कूलमधील तिच्या क्रीडाशिक्षकाने तिची ॲथलेटिक्सची आवड विकसित केली. १९९१-१९९२ च्या शालेय ॲथलेटिक मैदानामध्ये तिने १०० मीटर अडथळ्याची शर्यत आणि रिले शर्यत जिंकली. त्यावेळी तिने आणि लांब उडी आणि उंच उडीच्या स्पर्धांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. शाळांच्या राष्ट्रीय गेम्समध्ये अंजूची प्रतिभा दिसून आली. तिने १०० मीटर अडथळ्यांमध्ये आणि ४ × १०० मीटर रिलेमध्ये तिसरे स्थान मिळवले.[१]
पुरस्कार
अंजूने सप्टेंबर २००३ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ६.७० मीटर लांब उडी मारून ब्रॉन्झपदक जिंकले व भारताला प्रथमच विश्वस्तरीय स्पर्धेतील पुरस्कार मिळवून दिला. ह्याच उपक्रमात ती भारतीय ॲथलीट बनली. २००५ मध्ये आयएएएफ जागतिक ॲथलेटिक्स फायनलमध्ये तिने रजत पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम लॉंग जंप होती. २००४ मध्ये अंजू बॉबी जॉर्ज हिला 'मे.ध्यानचंद खेलरत्न' पुरस्कार दिला गेला. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशनने रशियाच्या तात्यायाना कोतोवा यांना २००५ मध्ये दिलेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धा पुरस्काराची पुनः तपासणी झाल्यानंतर अंजूला २००५ मध्ये जागतिक ॲथलेटिक्स फायनलमध्ये रौप्य पदवी प्रदान झाले. .२००२ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]
संदर्भ आणि नोंदी
- ^ eBiography. "अंजू बॉबी जॉर्ज जीवनी - Biography of Anju Bobby George". http://jivani.org (इंग्रजी भाषेत). 2018-07-06 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)