Jump to content

अंजीराचे शेंडेकलम

अंजिराचे शेंडेकलम जंगली अंजिरच्या सुधारणेकरता व चांगल्या दर्जाची बनविण्याकरता या पद्धतीचा वापर करतात. कलमाची फांदी दोन वर्ष वयाची असावी लागते. हिमाचल प्रदेशात अंजिरच्या शेंडेकलमावर चार पद्धतीने डोळे भरण्यात आले टी, उलटा टी, ठिगळकलम व फोरकर्ट पद्धतीने डोळा भरणे. हे चारी पद्धतीने भरलेले डोळे मे ते जुलै या काळात १५ दिवसाच्या अंतराने भरण्यात आले. एका वर्षी टी पद्धतीने भरलेल्या डोळ्यात सर्वात जास्त डोळे यशस्वी झाले व जूनचा पहिला पंधरवाडा हा या पद्धतीने डोळे भरण्यास योग्य काळ दिसून आला.