Jump to content

अंजली पाटील

अंजली पाटील
अंजली पाटील
जन्म २६ सप्टेंबर, १९८७ (1987-09-26) (वय: ३६)
नाशिक, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
कारकीर्दीचा काळ २०११ - ते आजपर्यंत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट दिल्ली इन ए डे
पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदिनी पुरस्कार
धर्महिंदू

अंजली पाटील ( २६ सप्टेंबर १९८७) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने मराठी, हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, सिंहली आणि इंग्रजी चित्रपटात देखील काम केले आहे. तिने २०११ मध्ये दिल्ली इन ए डे हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली, ज्यात तिने रोहिणी नावाच्या मुलीची भूमिका साकारली. दिल्ली इन ए डे, चक्रव्यूह, न्यूटन तसेच सिंहली भाषेतील विथ यु विदाऊट यु या चित्रपटातील तिच्या भूमिका प्रसंशनिय ठरल्या. तर तेलुगू चित्रपट ना बंगारु तल्ली साठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दक्षिणेतील उत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा नंदिनी पुरस्कार देखील मिळाला.[][][]

अंजली पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. तिचे बालपण आणि शिक्षण महाराष्ट्रातील नाशिक येथे झाले. तिने आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षी चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला आणि तसे आपल्या पालकांना सांगितले. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिनयाच्या शिक्षणासाठी पाठवले.[][]

अंजली पाटील (डावीकडे) IFFI Best Female Actor award पुरस्कार घेताना, २०१२
अंजली पाटील आणि पंकज त्रिपाठी चित्रपट न्यूटन च्या वर्ल्ड प्रीमियर ला झू प्लास्ट, बर्लिन येथे 2017.

चित्रपट

चलचित्र

वर्ष चित्रपट भाषा भूमिका नोंद
२०११देल्ही इन अ डेहिंदीरोहिणी
ग्रीन बँगल्सहिंदीमनूलघुपट
२०१२प्रथ्यायमतेलुगूदुर्गा
ओबा नथुवा ओबा इक्कासिंहलीसेलवी
चक्रव्यूहहिंदीजुही
२०१३एंटेमल्याळमदुर्गा
ना बंगारु तल्लीतेलुगू
अपना देशकन्नडवसुंधरा[]
श्रीहिंदीसोनू
२०१४किल द रेपिस्ट?हिंदीमीरा शुक्ला
फाईंडिंग फॅनिइंग्रजी / कोंकणीस्टीफनी 'फॅनि' फर्नांडिस,
फॅनिची मुलगी
अतिथी कलाकार
२०१५द सायलेंसमराठीमामी
मिसेस. स्कुटरहिंदीअशिमा
२०१६मिर्झ्याहिंदी झीनत
२०१७ समीरहिंदी आलिया इरादे
न्यूटनहिंदी मालको
२०१८मेरी निम्मोहिंदीनिम्मो
कालातामिळपुयल चारुमती गायकवाडतामिळ भाषेतील पदार्पण
२०१९दिठीमराठीतुळसा
मेरे प्यारे प्राईम मिनिस्टरहिंदीसरगम
२०२० मन फकिरा मराठी माही
२०२१कुथीरैवालतामिळ
बारडोमराठीआशालता

वेब सिरीज

वर्ष नाव भूमिका भाषा प्रक्षेपण नोंद
२०१९ हुतात्माविद्युत मराठी झी फाईव्ह
२०२० अफसोसश्लोक हिंदी अमेझॉन प्राईम व्हिडीओ
२०२० माय क्लाइन्टस् वाईफसिंदूरा हिंदी अमेझॉन प्राईम व्हिडीओ

संदर्भ

  1. ^ Gurvinder Singh bags Golden Peacock at IFFI 2012, Centenary Award to Mira Nair | DearCinema.com Archived 22 January 2013 at the Wayback Machine.
  2. ^ "IndiaGlitz -". 2015-06-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 October 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Nandi Awards 2012 and 2013: Rajamouli, Ilayaraja, Samantha and Prabhas emerge winners". 1 March 2017.
  4. ^ Hungama, Bollywood (30 October 2012). "Introducing Anjali Patil: Prakash Jha's Naxal firebrand - Bollywood Hungama". 13 October 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "NDTVMovies.com : Bollywood News, Reviews, Celebrity News, Hollywood News, Entertainment News, Videos & Photos". 30 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 October 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Bollywood actress Actress Anjali Patil in Kannada- Timesofap Archived 16 December 2012 at the Wayback Machine.

बाह्य दुवे