अंजली गुप्ता
फ्लाईंग ऑफिसर अंजलि गुप्ता ' (?? - ११ सप्टेंबर, २०११) ही भारतीय वायुसेनेतील एक अधिकारी होती. ही कोर्ट मार्शल झालेली भारतातील पहिली महिला अधिकारी होती.[१] ती बेंगळुरूमध्ये एअरक्राफ्ट सिस्टम्स ॲन्ड टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट येथे काम करीत होती. तिचे वडील बँक अधिकारी होते आणि तिची आई एका शाळेत शिक्षिका होती. तिला दोन बहिणी आहेत. दिल्ली विद्यापीठातून एम.फिल पूर्ण केले होते. २००१ मध्ये बेळगाव येथे तिची नेमणूक झाली.[२]
आरोप
फेब्रुवारी २००५ मध्ये अंजली गुप्ता यांनी बेंगळुरूमधील एका पोलिस स्टेशनमध्ये आपल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.[३] पोलिसांनी तिला तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सामोपचाराने समस्या सोडवण्यासाठी विचारणा केली. त्यानंतर अंजली गुप्ता यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI च्या) चौकशीची मागणी करून कर्नाटक उच्च न्यायालयात संपर्क साधला. काही दिवसांनी अंजली गुप्ता यांनी एका टीव्ही मुलाखतीत आरोप केला की तिच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होतो. यावरून तिच्याविरुद्ध जनरल कोर्ट मार्शल (जीसीएम) कार्यवाही सुरू करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या प्रशासनाने मानसोपचारासाठी तिची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ ॲन्ड न्यूरो सायन्सेस आणि इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसीनच्या डॉक्टरांकडून तपासणी करवली. तिला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रारंभी तिच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ब्रेकफास्ट फेकण्याचा आरोप केला होता. अंतिम आरोपपत्रात दंडाची रक्कम कमी करण्यात आली.[४]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Telegraph - Calcutta : Frontpage". www.telegraphindia.com. 2018-07-21 रोजी पाहिले.
- ^ "Court martial for air force woman" (इंग्रजी भाषेत). 2005-04-25. 2018-07-21 रोजी पाहिले.
- ^ "IAF inquiry into Gupta case - Rediff.com India News". in.rediff.com. 2018-07-21 रोजी पाहिले.
- ^ "The woman who rocked the Indian Air Force". www.rediff.com. 2018-07-21 रोजी पाहिले.