Jump to content

अंजनगाव सुर्जी

  ?अंजनगाव सुर्जी

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२१° ०९′ ५४.५८″ N, ७७° १८′ ३२.७६″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
प्रांतविदर्भ
विभागअंजनगाव
जिल्हाअमरावती
लोकसंख्या८६,३८० (2011)
भाषामराठी
संसदीय मतदारसंघअमरावती लोकसभा
विधानसभा मतदारसंघअंजनगाव-दर्यापुर विधानसभा
तहसीलअंजनगाव सुर्जी
पंचायत समितीअंजनगाव सुर्जी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 444705
• +०७२२४
• MH27

अंजनगाव सुर्जी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक मोठी आणि पहिली नगरपालिका आहे तसेच तालुका, व तालुक्याचे शहर आहे. येथे ३० डिसेंबर १८०३ साली इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होेता, हा तह इतिहासात 'अंजनगावसुर्जी तह' म्हणून प्रसिद्ध आहे.

पैठणमधील सुप्रसिद्ध सत्पुरुष थोर संत श्री एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील श्री देवनाथ महाराज (यांचा जन्म अंजनगाव येथेच झाला होता) यांनी येथे १७५४ साली श्री देवनाथ मठ स्थापन केला. त्याच परंपरेतील १८ वे महापुरुष श्री मनोहरनाथ महाराज ( कार्यकाळ - इ.स. १९६० ते इ.स. २०००) यांनी स्वतःच्या कारकीर्दीत हिंदू धर्माची ध्वजा फडकती ठेवली. सर्वश्री दत्तात्रेय तथा नृसिंहसरस्वती, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, गावबा ऊर्फ नित्यानंद, कृष्णनाथ, विश्वंनाथ, मुरारनाथ, रंगनाथ, गोपाळनाथ, गोविंदनाथ ही देवनाथ महाराजांची गुरुपरंपरा तर दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ , मनोहरनाथ विद्यमान पीठाधीश श्री जितेन्द्रनाथ, ही शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची शिष्यपरंपरा. [१]