Jump to content

अंजन (राजा)

अंजन (इ.स.पू. ६ वे शतक) हे प्राचीन भारतातील कोलिय वंशाचे राजा होते. बौद्ध ग्रंथांनुसार, बुद्धांच्या काळात कोलिय हा राजवंश अस्तित्वात होता. अंजन हे देवदाहचे पुत्र होते. अंजनाला दोन पत्नी सुलख्खना आणि यशोधरा आणि एक बहीण कक्कना होती. अंजनाला दोन मुले - सुप्पबुद्ध व दंदापाणी, आणि दोन मुली - महामाया आणि महाप्रजापती गौतमी होत्या. या दोन्ही मुली नंतर शाक्य नरेश शुद्धोधनाच्या पत्नी झाल्या. महामाया ही गौतम बुद्धाची आई होती.

सुप्पबुद्धाची मुलगी यशोधरा ही गौतम बुद्धांची पत्नी होती.