Jump to content

अंगारा नदी


अंगारा
Ангара́
अंगारा नदीच्या मार्गाचा नकाशा
उगमबैकाल सरोवर
मुखयेनिसे नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशरशिया
लांबी १,७७९ किमी (१,१०५ मैल)
उगम स्थान उंची ४५६ मी (१,४९६ फूट)
सरासरी प्रवाह ३,४१६ घन मी/से (१,२०,६०० घन फूट/से)
ह्या नदीस मिळतेयेनिसेची

अंगारा (रशियन: Ангара́) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील नदी येनिसेची प्रमुख उपनदी आहे. अंगारा नदी बैकाल सरोवरामध्ये उगम पावते. तेथून प्रथम उत्तरेस व त्यानंतर पश्चिमेस वाहत जाऊन ती येनिसे नदीला मिळते. एकूण १,७७९ किमी लांबीची अंगारा ही रशियातील सर्वात लांबीच्या नद्यांपैकी एक असून अंगारा, येनिसे व बैकालला पुरवठा करणारी सेलेंगा ह्या तीन नद्या मिळून जगातील सर्वात मोठ्या पाणलोट क्षेत्रांपैकी एक निर्माण झाले आहे.

रशियाच्या इरकुत्स्क ओब्लास्तक्रास्नोयार्स्क क्राय ह्या प्रदेशांमधून वाहणाऱ्या अंगारावरील इरकुत्स्क हे सर्वात मोठे शहर आहे. येनिसेच्या दक्षिण व मध्य भागात जलविद्युतनिर्मिती करणारी अनेक मोठी धरणे बांधली गेली आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत