Jump to content

अंग (महाजनपद)

प्राचीन महाजनपदांचा स्थानदर्शक नकाशा; अंग देश मगधाच्या पूर्वेस दाखवला आहे.

अंग हे प्राचीन भारतातील एक राज्य व १६ महाजनपदांमधील एक जनपद होते. याचा सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेदात आढळतो. बौद्ध ग्रंथांत अंग व वंग यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. महाभारतातील उल्लेखांनुसार आधुनिक भागलपुर, मुंगेर व त्यानजीकच्या बिहारबंगाल यांमधील क्षेत्र अंग देशात मोडत असे. अंग देशाची राजधानी चंपा येथे होती. हे जनपद मगधाच्या अंतर्गत येत असे. प्रारंभी अंगाच्या राजांनी बृहद्रथ व ब्रह्मदत्ताच्या सहयोगाने मगधाच्या काही राजांना हरवलेही होते; परंतु कालांतराने त्यांचे सामर्थ्य क्षीण झाले व त्यांना मगधाकडून पराजित व्हावे लागले [].

राजा दशरथाचा मित्र लोमपाद व महाभारतातील कर्ण यांनी अंग देशावर राज्य केले होते.

हे सुद्धा पहा

  • महाजनपद

संदर्भ

  1. ^ नाहर, डॉ. रतिभानु सिंह. प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास (हिंदी भाषेत). अलाहाबाद, भारत. p. १११-११२.