अंकुर (चित्रपट)
अंकुर | |
---|---|
दिग्दर्शन | श्याम बेनेगल |
निर्मिती | ललित बिजलानी |
कथा | श्याम बेनेगल |
प्रमुख कलाकार | शबाना आझमी अनंत नाग साधू मेहेर प्रिया तेंडुलकर दलिप ताहिल |
संगीत | वनराज भाटिया |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
अवधी | १२५ मिनिटे |
अंकुर हा एक १९७५ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. श्याम बेनेगल ह्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता. बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी व प्रसिद्ध कन्नड अभिनेता अनंत नाग ह्यांनी अंकुरमधून हिंदी चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली.
अंकुर तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला व त्याला ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह एकूण ४३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २४व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अंकुरला सुवर्णपदकासाठी नामांकन मिळाले होते.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील अंकुर (चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)