Jump to content

अंकिता रैना

अंकिता रविंदरकृष्णन रैना
वैयक्तिक माहिती
Nationality भारतीय
जन्म 11 जानेवारी 1993
उंची १.६३ मी (५ फूट ४ इंच) (5 फू 5 इं)

अंकिता रविंदरकृष्णन रैना (जन्म 11 जानेवारी 1993) ही एक भारतीय व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. सध्या ती भारतीय महिला एकेरी व दुहेरी मानांकन यादीत अग्रस्थानी आहे. [5]

विशेष कामगिरी

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडेरेशन सर्किटमध्ये अंकिताने आजवर एक दुहेरी WTA 125K स्पर्धा जिंकली आहे, तर 11 इतर एकेरी व 17 दुहेरी जेतेपदं पटकावली आहेत. WTA 125K ही महिला टेनिस असोसिएशनद्वारे 2012 पासून ते 2020 पर्यंत आयोजित करण्यात आलेली व्यावसायिक महिला टेनिस खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांची मालिका आहे.

एप्रिल 2018 मध्ये अंकिताने सर्वोत्कृष्ट 200 एकेरी खेळाडूंच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळवलं. हे  स्थान प्राप्त  करणारी ती पाचवी भारतीय खेळाडू ठरली. अंकिताने 2016च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र-दुहेरी स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले, आणि 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने महिला एकेरीत कांस्य पदक पटकावले आहे.

फेडकप  2018 स्पर्धेत झू लिन (चाईना) आणि युलिया पुटिन्टसेवा (कझाकस्थान) यांच्यावरचे विजय उल्लेखनीय ठरले.[1][1]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

अंकिताचा जन्म गुजरातच्या अहमदाबादमध्ये येथे झाला. तिचे वडील रविंदरकृष्णन हे मूळ काश्मिरी आहेत.

वयाच्या चौथ्या वर्षापासूनच तिने घराजवळच्या एका अकादमीमध्येच खेळायला सुरुवात केली. [8] तिचा मोठा भाऊ अंकुर रैना एक टेनिस खेळाडू होताच, त्याच्याकडूनच तिला प्रेरणा मिळाली. तिची आईसुद्धा  टेबल टेनिस खेळायची, त्यामुळे खेळांप्रति उत्साही होती. [6]

राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्यानंतर अंकिता चर्चेत आली, जेव्हा तिने अखिल भरतीय टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित टॅलेन्ट हँटमधे महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांकाच्या 14 वर्षीय खेळाडूचा पराभव केला. अंकिता त्या वेळी अवघ्या 8 वर्षांची होती.

2017मध्ये अंकिताच्या आईवडिलांनी ठरवले की त्यापुढचे योग्य प्रशिक्षण देणे अत्यावशक आहे, आणि त्यामूळे त्यांनी तिला पुण्याला पाठवले, जिथे तिची  तिचे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्याशी[1]  भेट झाली. त्यांनीच तिच्या खेळाला परिपूर्ण बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.[2]

व्यावसायिक यश

2012 मध्ये अंकिताने तिचे व्यवसायिक कारकीर्दीतले पहिले एकेरीचे विजेतेपद नवी दिल्लीत पटकावलं, तर दुहेरीची आणखी तीन जेतेपदे जिंकली.

2017च्या मुंबई ओपनमध्ये तिने दोन सामने जिंकत आपल्या कारकीर्दीत तोवरच्या सर्वात मोठ्या उपत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. एप्रिल 2018 मध्ये तिने जागतिक क्रमवारीत 197व्या क्रमांकावर झेप घेतली, आणि सर्वोत्कृष्ट 200 एकेरी महिला खेळाडूंच्या क्रमवारीत समाविष्ट होणारी पाचवी भारतीय खेळाडू ठरली. तिच्यापूर्वी निरुपमा संजीव, सानिया मिर्झा, शिखा ओबेरॉय आणि सुनिता राव यांनी हे मानांकन प्राप्त केले आहे.[7]

ऑगस्ट 2018 मध्ये तिने इंडोनेशियाच्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकेरीचे कांस्यपदक जिंकले. अंकिता आणि सानिया मिर्झा या दोनच खेळाडूंनी आजवर आशियाई क्रीडा स्पर्धेत एकेरी पदक जिंकले आहे. [3]

सिंगापूरमध्ये झालेल्या ITF W25च्या अंतिम सामन्यात अंकिताने अरांत्सा रूस हिला पराभूत करत जेतेपद पटकावले. 2019च्या कुन्मिंग ओपनमध्ये तिने अमेरिकेची माजी चॅम्पियन आणि टॉप-10 खेळाडूंपैकी एक समांथा स्टोसरचा पराभव केला. हा तिच्य कारकीर्दीतला सर्वात मोठा विजय होता. [4]

2019च्या फ्रेंच ओपनमध्ये अंकिता पहिल्या क्वालिफायरमध्ये चांगली खेळली, मात्र तरुण अमेरिकन खेळाडू कोको गॉफने तिला दोन अटीतटीच्या सेटमध्ये पराभूत केलं. पुढे ती विम्बल्डन चॅम्पियनशिप 2019 आणि युएस ओपन 2019 या दोन्ही स्पर्धांच्या दुसऱ्या पात्रता फेरीत पोहचली. मात्र दोन्हीकडे तिचा अटीतटीच्या 3-सेट्समध्ये पराभव झाला.

ऑक्टोबर 2019 मध्ये ती जोडीदार रोझाली व्हॅन डर होक बरोबर सुझौ लेडीज ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली, आणि त्यासोबतच अंकिताने पहिल्यांदा प्रथम 150 दुहेरी क्रमवारीत प्रवेश केला. [9]

थायलंड ओपन 2020 मध्ये रोझालीबरोबरच अंकिताने WTA टूरमध्ये प्रथमच उपांत्य फेरी गाठली. यामुळे अंकिताला दुहेरीत 119व्या क्रमांकापर्यंत मजल मारता आली. 2020मध्ये सुरुवातीला तिने दोन एकेरी पदके जिंकली. [10]

त्यानंतर ती फ्रेंच ओपन 2020 मध्येही खेळली आणि प्रथमच दुसऱ्या पात्रता फेरीत पोहोचली. मात्र त्यात तिला कुरुमी नाराकडून पराभव पत्करावा लागला. [11]

 पुरस्कार

  • अर्जुन पुरस्कार (२०२१)[]

संदर्भ

https://en.wikipedia.org/wiki/Ankita_Raina (1)

https://scroll.in/field/859925/who-is-ankita-raina-meet-indias-top-ranked-womens-tennis-player-who-impressed-at-mumbai-open(2)

https://www.thehindu.com/sport/tennis/meet-ankita-raina-indias-top-ranked-woman-tennis-player/article26284400.ece (3)

https://sportstar.thehindu.com/tennis/kunming-open-tennis-ankita-raina-biggest-win-samantha-stosur/article26932647.ece (4)

https://www.aitatennis.com/players-ranking (5)

https://indiantennisdaily.com/2020/03/24/she-is-waiting-for-her-opportunity-and-it-will-come-sooner-or-later-lalita-raina-ji-sharing-a-mothers-perspective-on-the-tennis-journey-of-a-ankita-raina/ (6)

https://www.thehindu.com/sport/tennis/ankita-in-top-200/article23484503.ece (7)

https://www.sportskeeda.com/player/ankita-raina (8)

https://www.wtatennis.com/players/317164/ankita-raina/rankings-history (9)

https://sportstar.thehindu.com/tennis/ankita-raina-itf-womens-tennis-news-singles-berfu-cengiz-doubles-thailand/article30896301.ece (10)

  1. ^ "National Sports Awards 2021 announced". pib.gov.in. 2021-11-20 रोजी पाहिले.