अँड्रियापोल
अँड्रियापोल (रशियन:Андреа́поль) हे रशियाच्या त्वेर ओब्लास्त मधील शहर आहे. अँड्रियापोल्स्की जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या ८.२८६ इतकी होती.
या प्रदेशातील जंगलातील लाकूडतोड हा या शहरातील मुख्य व्यवसाय आहे. शहराजवळील अँड्रियापोल वायुसेना तळावरील तैनात लढाऊ विमाने मॉस्कोची राखण करतात.