Jump to content

अँडी मरे

ॲंडी मरे
देशयुनायटेड किंग्डम
वास्तव्यलंडन, यु.के.
जन्म १५ मे, १९८७ (1987-05-15) (वय: ३७)
ग्लासगो, स्कॉटलंड
उंची १.८८ मी (६ फु २ इं)
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने; दोनहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत US $२०,९२६,७५२
एकेरी
प्रदर्शन ४१३ - १२८
अजिंक्यपदे ३८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (१७ ऑगस्ट २००९)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (२०१०, २०११, २०१३, २०१५, २०१६)
फ्रेंच ओपन उपविजयी (२०१६)
विंबल्डनविजयी (२०१३, २०१६)
यू.एस. ओपनविजयी (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन ४५ - ५३
शेवटचा बदल: जुलै २०१६.


ऑलिंपिक पदक माहिती
युनायटेड किंग्डमयुनायटेड किंग्डम या देशासाठी खेळतांंना
पुरूष टेनिस
सुवर्ण२०१२ लंडनएकेरी
रौप्य२०१२ लंडनमिश्र दुहेरी
सुवर्ण२०१६ रियो दि जानेरोएकेरी

अँड्र्यू अँडी मरे ( मे १५, इ.स. १९८७, ग्लासगो, स्कॉटलॅंड) हा एक ब्रिटिश टेनिस खेळाडू आहे. तो ब्रिटनमधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू असून सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर ८ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकल्या असून ३ वेळा ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे. एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठणारा खुल्या जगतातील केवळ सातवा टेनिस खेळाडू तर विंबल्डनची अंतिम फेरी गाठणारा एकमेव ब्रिटिश खेळाडू आहे. २०१२ यू.एस. ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून मरे ७६ वर्षांमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिलाच ब्रिटिश टेनिस खेळाडू ठरला. ह्यापूर्वी फ्रेड पेरी ह्याने १९३६ साली यू.एस. ओपन स्पर्धा जिंकली होती. ह्यापूर्वी चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव पत्कारणाऱ्या मरेला पाचव्या वेळेस मात्र स्पर्धा जिंकण्यात यश मिळाले. २०१३ विंबल्डन स्पर्धा जिंकून मरे ७७ वर्षांनंतर हा मान मिळवणारा पहिला ब्रिटिश टेनिस खेळाडू बनला.

२०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत मरेने रॉजर फेडररला हरवून पुरूष एकेरीमध्ये सुवर्णपदक तर मिश्र दुहेरीमध्ये रौप्य पदक पटकावले. त्याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुन्हा पुरुष एकेरीचे सुवर्णपदक मिळवले.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या: ११ (३ - ८)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी२००८यू.एस. ओपनहार्डस्वित्झर्लंड रॉजर फेडरर2–6, 5–7, 2–6
उपविजयी२०१०ऑस्ट्रेलियन ओपनहार्डस्वित्झर्लंड रॉजर फेडरर3–6, 4–6, 6–7(11–13)
उपविजयी२०११ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच4–6, 2–6, 3–6
उपविजयी२०१२विंबल्डन स्पर्धाग्रासस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–4, 5–7, 3–6, 4–6
विजयी२०१२यू.एस. ओपनहार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच7-6 (12-10), 7-5, 2-6, 3-6, 6-2
उपविजयी२०१३ऑस्ट्रेलियन ओपन (3)हार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2
विजयी२०१३विंबल्डनग्राससर्बिया नोव्हाक जोकोविच6–4, 7–5, 6–4
उपविजयी२०१५ऑस्ट्रेलियन ओपन (4)हार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच6–7(5–7), 7–6(7–4), 3–6, 0–6
उपविजयी२०१६ऑस्ट्रेलियन ओपन (5)हार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच1–6, 5–7, 6–7(3–7)
उपविजयी२०१६फ्रेंच ओपनक्लेसर्बिया नोव्हाक जोकोविच6–3, 1–6, 2–6, 4–6
विजयी२०१६विंबल्डन (2)ग्रासकॅनडा मिलोस राओनिच6–4, 7–6(7–3), 7–6(7–2)

ऑलिंपिक स्पर्धा

एकेरी: 1 (1–0)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी२०१२युनायटेड किंग्डम लंडनग्रास स्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–2, 6–1, 6–4

मिश्र दुहेरी: 1 (0–1)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार सहकारी प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी२०१२युनायटेड किंग्डम लंडनग्रास युनायटेड किंग्डम लॉरा रॉब्सनबेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
6–2, 3–6, [8–10]

संदर्भ आणि नोंदी


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत