अँटनी अँड क्लिओपात्रा
विल्यम शेक्सपियरची शोकांतिका क्लिओपात्रा अँटनीचे स्वागत करताना | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | नाटक | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
लेखक | |||
वापरलेली भाषा | |||
Full work available at URL | |||
स्थापना |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
अँटनी ॲन्ड क्लियोपात्रा ही विल्यम शेक्सपियरची शोकांतिका आहे. हे नाटक प्रथम १६०७ च्या सुमारास किंग्स मेन गटाद्वारे ब्लॅकफ्रीअर्स थिएटर किंवा ग्लोब थिएटरमध्ये सादर केले गेले.[१][२] द ट्रॅजेडी ऑफ अँटनी ॲन्ड क्लियोपात्रा या शीर्षकाखाली १६२३ मध्ये प्रकाशित झालेल्या फर्स्ट फोलिओमध्ये त्याचे पहिले स्वरूप छापण्यात आले होते. क्लिओपात्रा ही इजिप्तच्या टॉलेमिक राज्याची शेवटची राणी होती. मार्क अँटनी (मार्कस अँटोनियस) हा एक रोमन साम्राज्यातील राजकारणी आणि सेनापती होता.
दुसऱ्या शतकाची सुरुवातीला प्लूटार्कने पॅरेलल लाइव्हज या पुस्तकात प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहीली. १५७९ मध्ये थॉमस नॉर्थने प्लुटार्कच्या या पुस्तकाचे इंग्रजी अनुवादा केले. शेक्सपियरचे हे नाटक ह्या अनुवादीत पुस्तकावर आणि क्लियोपात्रा व मार्क अँटोनी यांच्यातील संबंधांना अनुसरून आहे जे सिसिलियन बंडापासून ते क्लिओपात्राच्या आत्महत्येपर्यंत आहे.[३]
नाटकातील मुख्य खलनायक हा ऑक्टाव्हियस सीझर आहे, जो अँटोनीचा दुसरा ट्रायम्विरेटचा सहकारी आणि रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता. शोकांतिका मुख्यत्वे रोमन प्रजासत्ताक आणि टॉलेमिक इजिप्तमध्ये वसली आहे. ह्या वेगळ्या भौगोलिक स्थानांमुळे नाटकाच्या भाषिक नोंदणीमध्ये जलद बदल देसतात ज्यात ह्या जागांचे वैशिष्ट आहे जसे की कामुक व काल्पनिक अलेक्झांड्रिया आहे आणि अधिक व्यावहारिक, कठोर असे रोम आहे.
शेक्सपियरयांची क्लियोपात्रा ही नाटककाराच्या कार्यातील सर्वात जटिल आणि पूर्ण विकसित स्त्री पात्रांपैकी एक मानली जाते.ती बऱ्याचदा व्यर्थ आणि नाटकी आहे ज्यामुळे प्रेक्षकांना जवळजवळ तिचा तिरस्कार वाटतो. सोबतच शेक्सपियरने तिला आणि अँटोनीला विशाल दुःखद शेवटात गुंतवले आहे. या विरोधाभासी वैशिष्ट्यांमुळे समिक्षकांचे विभाजित प्रतिसाद मिळाले आहेत.[४]
अँटनी आणि क्लियोपात्रा हे एकाच शैलीतील आहेत असे वर्गीकरण करणे कठीण आहे. याचे वर्णन इतिहासाचे नाटक (जरी ते ऐतिहासिक लेखानुरूप पूर्णपणे पालन करत नाही), शोकांतिका म्हणून (जरी पूर्णपणे ॲरिस्टॉटलच्या व्याख्येनुसार नाही), विनोदी किंवा प्रणय म्हणून नाही आणि काही समीक्षकांच्या मते हे एक समस्या नाटक आहे.[५] हे शेक्सपियरच्या दुस-या शोकांतिका, ज्युलियस सीझरचा सिक्वेल आहे.
सारांश
अँटनी मोहिमेवर इजिप्तमध्ये असतो आणि क्लियोपात्राला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. तथापि, त्याचे फुल्वियाशी लग्न झाले आहे आणि इजिप्तमध्ये असताना त्याला फुल्वियाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळते. तो रोमला परततो. रोममध्ये तो ऑक्टाव्हियसची बहीण ऑक्टाव्हिया हिच्याशी राजकीय मतभेद बरे करण्याच्या प्रयत्नात लग्न करतो. ह्या लग्नाबद्दल ऐकून क्लियोपात्रा रागावते. ऑक्टाव्हियस आणि अँटनी यांच्यात युद्ध सुरू होते आणि अँटनी क्लियोपात्राकडे परत येतो.
क्लियोपात्रा अँटनीसोबत ॲक्टियमच्या लढाईत जाते, जिथे तिच्या उपस्थितीमुळे लष्करी आपत्ती ओढवते. ती इजिप्तला परत येते आणि अँटोनी ऑक्टाव्हियसचा पाठलाग करतो. ऑक्टाव्हियसचा वरचा हात स्पष्टपणे आहे, म्हणून अँटोनीचे जवळचे मित्र देखील बाजू बदलत आहेत. ऑक्टाव्हियस ॲलेक्झांड्रियामध्ये अँटोनीचा पराभव करतो. अँटनीने परत यावे ह्यासाठी क्लियोपात्रा अँटोनीला तिच्या आत्महत्येचा खोटा अहवाल पाठवते. ते खरे आहे असे मानून अँटनी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न करतो. प्राणघातक जखमी झालेला अँटनी क्लियोपात्राकडे परत जातो आणि तिच्या समोर त्याचा मृत्यू होतो. अँटोनीच्या मरणाच्या शोकात आणि ऑक्टाव्हियसने पकडू नये म्हणून क्लियोपात्रा स्वतःला मारण्यासाठी विषा वापरते व आत्यहत्या करते.
ऑक्टाव्हियस दोन्ही मृतदेह बघतो आणि परस्परविरोधी भावना अनुभवतो. अँटनी आणि क्लियोपात्रा यांच्या मृत्यूमुळे तो पहिला रोमन सम्राट होण्यासाठी मोकळा होतो, परंतु त्याला त्यांच्याबद्दल थोडी सहानुभूतीही वाटते व सार्वजनिक लष्करी अंत्यसंस्काराचा आदेश देतो.
रूपांतर
२०१६ मध्ये, सृजित मुखर्जीचा बंगाली भाषेतील भारतीय चित्रपट जुल्फिकार प्रदर्शित झाला जो ज्युलियस सीझर आणि अँटनी ॲन्ड क्लियोपात्रा या दोन्ही नाटकांचे रूपांतर होते.[६]
संदर्भ
- ^ Barroll, J. Leeds (1965). "The Chronology of Shakespeare's Jacobean Plays and the Dating of Antony and Cleopatra". In Smith, Gordon R. (ed.). Essays on Shakespeare. University Park, Pennsylvania: Penn State University Press. pp. 115–162. ISBN 978-0-271-73062-2.
- ^ Shakespeare, William (1998). "The Jacobean Antony and Cleopatra". In Madelaine, Richard (ed.). Antony and Cleopatra. Cambridge: Cambridge University Press. pp. 14–17. ISBN 978-0-521-44306-7.
- ^ "North's translation of Plutarch's Lives" Archived 18 January 2017 at the Wayback Machine., British Library
- ^ Bevington, David, ed. (1990).Antony and Cleopatra. Cambridge: Cambridge University Press, 12–14 आयएसबीएन 0-521-84833-4.
- ^ "Antony & Cleopatra – McCarter Theatre Center". 2022-12-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-02-22 रोजी पाहिले.
- ^ Anindita Acharya, My film Zulfiqar is a tribute to The Godfather, says Srijit Mukherji, Hindustan Times (20 September 2016).