अँजिओप्लास्टी
हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो. तो अडथळा दूर करण्यासाठी ॲंजिओप्लास्टी केली जाते.याची पुर्व तपासणी ॲंजिओग्राफी द्वारे केली जाते
पद्धत
- स्थानिक बधिरीकरण केल्यानंतर एक छोटी प्लास्टिकची नळी सुईबरोबर मांडीतून सोडली जाते.
- त्यानंतर एक लांब आकाराची ट्यूब घेऊन पायाच्या रक्तवाहिनीमार्फत एक्स-रेच्या मदतीने ती नळी मानेच्या रक्तवाहिनीपर्यंत नेली जाते. या वेळी रुग्ण पूर्णतः शुद्धीत असतो आणि डॉक्टर काय करत आहेत, हे पाहू शकतो.
- नंतर एक छोटी वायर या करोनरी आर्टरीमध्ये प्लास्टिकचा फुगा असलेल्या छोट्या नळीतून सोडली जाते.
- नंतर हा फुगा फुगवला जातो व त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि चरबीही कमी केली जाते. कारण हा फुगा फुगल्याने कोलेस्टेरॉल आणि चरबी बाजूला सारली जाऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
- यानंतर एक स्वतःहून प्रसरण पावणारी जाळी (स्टेंट) आतमध्ये सोडली जाते. ही जाळी(स्टेंट) नंतर रक्तवाहिनी प्रसरण पावलेल्या अवस्थेत ठेवून देतो.