Jump to content

अ टेल ऑफ टू सिटीझ

अ टेल ऑफ टू सिटीझ

लेखकचार्ल्स डिकन्स
भाषाइंग्लिश
देशयुनायटेड किंग्डम
साहित्य प्रकारकादंबरी
प्रकाशन संस्थाचॅपमन अँड हॉल
प्रथमावृत्ती१८५९
मुखपृष्ठकारहॅब्लॉट नाइट ब्राउन
विषयलंडन आणि पॅरिसमधील एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील जीवन; फ्रेंच राज्यक्रांती आणि दहशतीचा राज्यकाल

अ टेल ऑफ टू सिटीझ ही चार्ल्स डिकन्सची १८५९ मध्ये प्रकाशित झालेली इंग्लिश भाषेतील ऐतिहासिक कादंबरी आहे. याचे कथानक एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील लंडन आणि पॅरिसमधील सामाजिक परिस्थिती आणि जीवन दर्शवते. कथानकाचा कालखंड फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वीचा काळ, दहशतीचा राज्यकाल आणि त्यादरम्यान होणाऱ्या घटनांवर आधारित आहे. कादंबरी फ्रेंच डॉक्टर मॅनेटची कथा आहे जो पॅरिसच्या बास्तीय तुरुंगातून १८ वर्षांनी सुटतो आणि आपल्या लुसी नावाच्या मुलीकडे लंडनमध्ये येउन राहतो..

ही कादंबरी डिकन्सच्या ऐतिहासिक काल्पनिक कथांमधील सर्वोत्कृष्ट समजली जाते. ही आजवरच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबऱ्यांपैकी एक असल्याचेही समजले जाते. [] [] [] अ टेल ऑफ टू सिटीझ या कादंबरीची चित्रपट, दूरदर्शन, रेडिओ आणि रंगमंचासाठी अनेक रूपांतरणे केली गेली आहे. आजही जगभरातील संस्कृतीवर या कादंबरीचा प्रभाव आहे. यातील पहिले वाक्य इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स.... हे अनेक प्रकारे अनेक ठिकाणी वापरले गेले आहे.

संदर्भ

  1. ^ "Charles Dickens novel inscribed to George Eliot up for sale". The Guardian. 7 September 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "A Tale of Two Cities, King's Head, review". The Telegraph. 11 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 September 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "TLSWikipedia all-conquering – The TLS". May 26, 2016. 26 May 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 February 2021 रोजी पाहिले.