Jump to content

अ क्वेशचन ऑफ सायलेन्स (पुस्तक)

अ क्वेशचन ऑफ सायलेन्स: द सेक्चुवल इकोनोमिक्स ऑफ मॉर्डन इंडिया हे भारतीय स्त्रीवादी मेरी जॉन व जानकी नायर द्वारे संपादित निबंधांचे संग्रह आहे. हे पुस्तक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस द्वारे २००० साली प्रकाशित केले गेले.[] या सर्व निबंधांमध्ये लेखक भारतातील लैंगिकतेचे विविध घटक तसेच कायदा, चित्रपट व सामाजिक चळवळींमध्ये लैंगिकता कशी रचली जाते याचा उलगडा करून दाखवतात.

सारांश

पुस्तकातील सुरुवातीस प्रस्तावनेद्वारे संपादकांनी लैंगिकतेविषयक, भारतातील विविध चर्चाविश्व एकत्र आणतात तसेच हे चर्चाविश्व आधुनिकता व ब्रम्हचर्येच्या आदर्शांना कसे छेदतात हे ही बघतात. प्रस्तावनेत स्पष्ट केल्याप्रमाणे पुस्तकाच्या नावाचे उद्देश भारतात लैंगिकतेसंदर्भात पाळले जाणारे मौनाचे षड्यंत्र समजून घेणे आहे.[] या पुस्तकात प्रेम चौधरी, व्ही.गीथा, रवी वासुदेवन व तेजस्विनी निरंजना सारख्या प्रसिद्ध अभ्यासकांचे निबंध आहेत.

योगदान/ प्रतिक्रिया

सोशल चेंज या नियतकालिकेत[] (सेज नियतकालिका) आलेल्या पुस्तकाच्या पुनरावलोकनात, पितृसत्तेतील मुलभूत वर्चस्व उलगडण्यासाठी कशा पद्धतीने लेखकांनी विविध ऐतिहासिक व दृश्य साहित्याचे पुनर्वाचन केलेले आहे हे दाखवून दिले आहे.

संदर्भ सूची

  1. ^ a b Nair, Janaki; John, Mary E. (2000). A Question of Silence: The Sexual Economies of Modern India (इंग्रजी भाषेत). Zed Books. ISBN 9781856498920.
  2. ^ A., Tellis,. "Book reviews and notices : MARY E. JOHN and JANAKI NAIR, eds., A question of silence? The sexual econom ies of modem India. New Delhi: Kali for Women, 1998. viii + 412 pp. Notes, index. Rs. 420 (hardback)". Contributions to Indian Sociology (इंग्रजी भाषेत). 35 (1). ISSN 0069-9667.CS1 maint: extra punctuation (link)