Jump to content

ॲस्ट्रोफिजिक्स विषयाचे स्वरूप

खगोलशास्त्र आणि पदार्थविज्ञान यांचा  जवळचा संबंध असून, पदार्थविज्ञानाशिवाय खगोलशास्त्र अपुरे आहे, कारण अनेक खगोलशास्त्रीय घटना पदार्थविज्ञानाच्या नियमांनी स्पष्ट करता येतात, या पद्धतीलाच ॲस्ट्रोफिजिक्स किंवा खगोलभौतिक असे म्हंटले जाते.आर्थर एडीग्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने या विषयाला प्रथम चालना दिली.

ताऱ्यांमध्ये निर्माण होणारी ऊर्जा हायड्रोजन अणूंच्या संमिलनामुळे निर्माण होते, हॅन्स बेथ या वैज्ञानिकाने १९३९ साली प्रथम दाखवून दिले,आणि त्यानंतर खगोलभौतिक या विषयाची झपाट्याने प्रगती होऊ लागली.

ग्रहांच्या गतीचे नियम ,ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू , विश्वाची उत्पत्ती आणि लय अशा विविध क्षेत्रात खगोलभौतिक या विषयाने खगोलशास्त्र हा विषय पूर्णपणे व्यापून टाकला आहे. खगोलभौतिकिमध्ये प्रामुख्याने सौरऊर्जा, सूर्यमाला विज्ञान ,तारका विज्ञान, ऊर्जा विज्ञान , विश्वशास्त्र या उपविषयांचा समावेश होतो.