ॲस्ट्रिड (बेल्जियमची स्वीडिश राणी)
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/11/Crown_princess_Astrid_1926.jpg/250px-Crown_princess_Astrid_1926.jpg)
स्वीडनची ॲस्ट्रिड सोफिया लोव्हिसा थायरा (१७ नोव्हेंबर १९०५, स्टॉकहोम, स्वीडन - २९ ऑगस्ट १९३५, श्वित्झ, स्वित्झर्लंड) ही बेल्जियमचा राजा तिसरा लिओपोल्ड ह्याच्या पत्नीच्या नात्याने १७ फेब्रुवारी १९३४ ते मृत्यूपर्यंत बेल्जियमची राणी होती.
१० नोव्हेंबर १९२६ रोजी आस्ट्रिडचा विवाह युवराज तिसऱ्या लिओपोल्डसोबत झाला. लग्नानंतर ती बेल्जियममध्ये अत्यंत लोकप्रिय होती. २९ ऑगस्ट १९३५ रोजी स्वित्झर्लंड येथे सहलीसाठी आलीले असताना झालेल्या मोटार अपघातामध्ये ॲस्ट्रिडचा जागीच मृत्यू झाला.
अपत्ये
- योसेफिन-शार्लट, लक्झेंबर्गची डचेस
- बूदूं, बेल्जियम
- आल्बर्ट दुसरा, बेल्जियम