ॲल्युमिनियम
ॲल्युमिनियम (रासायनिक सूत्र Al) (अणुक्रमांक १३) हा एक धातुरूप रासायनिक पदार्थ आहे.
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
साधारण अणुभार (Ar, standard) | ग्रॅ/मोल | |||||||
ॲल्युमिनियम - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | १३ | |||||||
गण | अज्ञात गण | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
घनता (at STP) | ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
शोध
वैज्ञानिकांना १७८७ पर्यंत तुरटीत अनोळखी धातू असण्याची शक्यता वाटत होती. पण त्यातून तो धातू वेगळा करण्याची पद्धत त्यांना १८२५ पर्यंत तरी सापडली नव्हती. १८२५ मध्ये डेन्मार्कचे रसायनतज्ज्ञ ओस्र्टेड यांनी विद्युत अपघटन पद्धत वापरून अॅल्युमिनिअम धातू शोधला आणि अल्पप्रमाणात वेगळा केला. याच पद्धतीत सुधारणा करून जर्मन रसायनतज्ञ फ्रीड्रीख वोलर यांनी १८४५ पर्यंत गुणधर्म तपासता येईल एवढे अॅल्युमिनिअम मिळवले.
अॅल्युमिनिअम हा धातू पृथ्वीच्या कवचातील धातूंपैकी सर्वात विपुल म्हणजे ८.२ टक्के इतका असला तरी तो निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडत नाही. आज इतक्या मोठय़ा प्रमाणात अॅल्युमिनिअमची उपलब्धता निर्माण होण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे अॅल्युमिनिअम ऑक्साईडपासून अॅल्युमिनिअम धातू मिळवण्याची पद्धत अमेरिकी रसायनतज्ज्ञ चार्लस हॉल आणि फ्रेंच रसायनतज्ज्ञ पॉल हेरॉल्ट यांनी स्वतंत्रपणे १८८६ मध्ये विकसित केली आणि दुसरी घटना म्हणजे १८८८ मध्ये ऑस्ट्रेलियन रसायनतज्ज्ञ कार्ल जोसेफ बायर यांनी अगदी कमी खर्चात बॉक्साइट या खनिजापासून अॅल्युमिनिअम ऑक्साइडपासून मिळविण्याची ‘बायर’ पद्धत तयार केली.[१]
ॲल्युमिनियमसंबंधी आयुर्वेदाची मते
अॅल्युमिनियम हे प्रामुख्याने आपल्या स्मरणशक्तीवर घातक परिणाम करते, असे जगात अनेक ठिकाणी झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ब्रिटन, नॉर्वे, फ्रान्स आदी ठिकाणी हे संशोधन झाले आहे. अल्झायमर्स रिसर्च इन्स्टिट्टयूचे संचालक डॉ. मायकेल वैनर यांनी केलेल्या संशोधनात अॅल्युमिनियमच्या अधिक वापराने स्मृतिभ्रंश निर्माण होतो, असे म्हणले आहे.
अॅल्युमिनियमच्या भांड्यांत अन्न शिजवणे घातक
युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी मेडिकल सेंटर येथे झालेल्या संशोधनात अॅल्युमिनियमच्या भांड्यांत शिजवलेल्या अन्नाचे सेवन केले तर प्रत्येक वेळी त्यातील २ ते ४ मिलिग्रॅम अॅल्युमिनियम शरीरात जाते. सामान्यत: एका दिवसात जास्तीत जास्त २० मिलिग्रॅम एवढे अॅल्युमिनियम शरीरात निर्धोकपणे शोषले जाऊ शकते. अन्न शिजवण्यासाठी तसेच चहा बनविण्यासाठी अॅल्युमिनियमची भांडी मोठ्ठया प्रमाणावर वापरली जातात. हे लक्षात घेऊन त्या भांड्यांचा सर्रास होणारा वापर थांबविणे गरजेचे आहे.[ संदर्भ हवा ]
औषधातूनही अॅल्युमिनियम
आधुनिक वैद्यकाच्या काही जंटासिड्डसमधून (अॅसिडिटीसाठीचे औषध) अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा घटक धोकादायक प्रमाणात शरीरात जातो, असे शास्त्रज्ञांनी म्हणले आहे. थोडे पित्त वाढले की, अशा गोळ्या खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी या गोळ्यांचा वापर कमीत कमी करणे आवश्यक आहे.[ संदर्भ हवा ]
कुपोषण रोखण्यासाठी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अंगणवाडी योजना तसेच गेल्या १५ वर्षांपासून शालेय पोषण आहार योजना अशा विविध योजना भारत सरकारच्या वतीने राबवल्या जातात. या योजनांमध्ये बहुतांशी ठिकाणी अन्न शिजवताना अॅल्युमिनियमच्या भांड्डयांचा उपयोग केला जातो. वरील संशोधनात सांगितलेला स्मृतिभ्रंशाचा आणि अॅल्युमिनियमचा संबंध लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्टेनलेस स्टीलची किंवा चांगली कल्हई केलेली पितळेची पातेली वापरात येणे आवश्यक आहे. सोडियम अॅल्युमिनियम फॉस्फेट नावाचा घटक बेकिंग पावडरमध्येही वापरला जातो. विशेषतः काही केक्स तसेच काही प्रकारचे चीज बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. याचे सेवनही बरीच मंडळी करत असतात. त्यातून माणसाच्या पोटात अॅल्युमिनियम जाते. काही रासायनिक शाम्पूमध्येही अॅल्युमिनियमचा वापर केला जातो. त्यामुळे नेहमी असे शाम्पू वापरणाऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे, कारण अॅल्युमिनियम हे शरीरामध्ये पोटातून, त्वचेवाटे तसेच फुप्फुसावाटेही शोषले जाते. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनांमध्ये घाम न येण्यासाठी वापरल्या जाणाया काहींमध्ये अॅल्युमिनियमचा वापर होतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे.[ संदर्भ हवा ]
अर्थात अशुद्ध पाण्यातूनही अॅल्युमिनियम माणसाच्या पोटात जाऊ शकते. ‘युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्टयूट ऑफ एन्व्हायरन्मेंटल स्टडीज्’मधील संशोधकांनी अॅल्युमिनियमच्या अति वापराबद्दल अशीच चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात अॅल्युमिनियम पोटात जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्वाचा विचार करता अॅल्युमिनियम हा घटक आरोग्याला घातक असून स्मृतिभ्रंशाचे एक मोठे कारण आहे हे सिद्ध होते. त्यामुळे त्याचा वापर टाळणे हेच आवश्यक असून अॅल्युमिनियमची भांडी न वापरणे गरजेचे आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ आणि नोंदी
- ^ शुभदा वक्टे. कुतूहल : मौल्यवान अॅल्युमिनिअम!. Loksatta (Marathi भाषेत). 14-03-2018 रोजी पाहिले.
बायर आणि हॉल-हेरॉल्ट या दोनही पद्धती वापरून आज जगभर अॅल्युमिनिअमचे उत्पादन किफायतशीरपणे घेतले जाते
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
H | He | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
Li | Be | B | C | N | O | F | Ne | |||||||||||||||||||||||||||||||||
Na | Mg | Al | Si | P | S | Cl | Ar | |||||||||||||||||||||||||||||||||
K | Ca | Sc | Ti | V | Cr | Mn | Fe | Co | Ni | Cu | Zn | Ga | Ge | As | Se | Br | Kr | |||||||||||||||||||||||
Rb | Sr | Y | Zr | Nb | Mo | Tc | Ru | Rh | Pd | Ag | Cd | In | Sn | Sb | Te | I | Xe | |||||||||||||||||||||||
Cs | Ba | La | Ce | Pr | Nd | Pm | Sm | Eu | Gd | Tb | Dy | Ho | Er | Tm | Yb | Lu | Hf | Ta | W | Re | Os | Ir | Pt | Au | Hg | Tl | Pb | Bi | Po | At | Rn | |||||||||
Fr | Ra | Ac | Th | Pa | U | Np | Pu | Am | Cm | Bk | Cf | Es | Fm | Md | No | Lr | Rf | Db | Sg | Bh | Hs | Mt | Ds | Rg | Cn | Uut | Uuq | Uup | Uuh | Uus | Uuo | |||||||||
|