ॲलन शेपर्ड
ॲलन बार्टलेट शेपर्ड, ज्युनिअर (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२३ - २१ जुलै, १९८८) हा अमेरिकेच्या नौसेनेचा वैमानिक, नासाचा अंतराळवीर व व्यवसायिक होता. इ.स. १९६१मध्ये अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती बनला जेव्हा प्रोजेक्ट मर्क्युरी अंतराळयान केवळ अंतराळात जाऊन परतले. दहा वर्षांनंतर, वयाच्या ४१व्या वर्षी तो अपोलो १४ यानावरील दलनायक होता व त्याने लँडर चंद्रावर अचूकरित्या उतरवले. तो या मोहिमेत वयाने सर्वात मोठ होता. तो चंद्रावर चालणारा पाचवा मनुष्य होता तसेच त्याने या मोहिमेदरम्यान चंद्रावर दोन गोल्फ चेंडूपण मारले.