ॲरिझोना
| अॅरिझोना Arizona | |||||||||||
| |||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
| रहिवासी | अॅरिझोनियन | ||||||||||
| राजधानी | फीनिक्स | ||||||||||
| मोठे शहर | फीनिक्स | ||||||||||
| सर्वात मोठे महानगर | फिनिक्स महानगरीय क्षेत्र | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत ६वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | २,९५,२५४ [१] किमी² (१,१३,९९८[१] मैल²) | ||||||||||
| - रुंदी | ५०० किमी (३१० मैल) | ||||||||||
| - लांबी | ६४५ किमी (४०० मैल) | ||||||||||
| - % पाणी | ०.३२ | ||||||||||
| - अक्षांश | ३१°२०′ उ. to ३७° उ. | ||||||||||
| - रेखांश | १०९°०३′ प. to ११४°४९′ प. | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत १६वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ६३,३८,६६६ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | ११७.३/किमी² (अमेरिकेत ३६वा क्रमांक) | ||||||||||
| - सरासरी उत्पन्न | ४१,१७१ अमेरिकन डॉलर | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | फेब्रुवारी १४, इ.स. १९१२ (४८वा क्रमांक) | ||||||||||
| प्रमाणवेळ | Mountain: UTC-7 | ||||||||||
| संक्षेप | AZ US-AZ | ||||||||||
| संकेतस्थळ | www.az.gov | ||||||||||
अॅरिझोना (इंग्लिश: Arizona,
उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले अॅरिझोना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सहावे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १६व्या क्रमांकाचे राज्य आहे.
अॅरिझोनाच्या दक्षिणेला मेक्सिकोची सोनोरा व बाहा कॅलिफोर्निया ही राज्ये, पश्चिमेला कॅलिफोर्निया, वायव्येला नेव्हाडा, पूर्वेला न्यू मेक्सिको, उत्तरेला युटा तर ईशान्येला कॉलोराडो ही राज्ये आहेत. फीनिक्स ही अॅरिझोनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
अॅरिझोना १९१२ साली अमेरिकेचे ४८वे राज्य बनले. अमेरिकन संघात सामील झालेले संलग्न ४८ राज्यांमधील ते सर्वात शेवटचे राज्य आहे. सोनोराच्या वाळवंटात वसलेले हे राज्य आपल्या रुक्ष व उष्ण हवामानासाठी तसेच ग्रँड कॅन्यन व इतर अनेक राष्ट्रीय उद्याने, जंगले व वास्तूंकरिता प्रसिद्ध आहे.
मोठी शहरे
- फीनिक्स महानगर - ४० लाख
- तुसॉन - ५,२०,११६
- युमा - ९०,०४१
गॅलरी
तुसॉनजवळील वाळवंटात आढळणारे निवडुंग.
कॉलोराडो नदीने घेतलेले घोड्याच्या नालेच्या आकाराचे वळण.
अॅरिझोनामधील प्रमुख रस्ते.
अॅरिझोनाचे विधानभवन.
नेव्हाडाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
संदर्भ
- ^ a b "२००० जनगणना" (ZIP). अमेरिकन जनगणना ब्यूरो. जुलै १८,२००७ रोजी पाहिले.
|accessdate=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
