ॲप्पी फिझ
प्रकार | शीत पेय |
---|---|
उत्पादक | पार्ले ॲग्रो |
मूळ देश | भारत |
ॲप्पी फिझ हे २००५ मध्ये भारतात दाखल झालेले एक पेय आहे. हे पेय पार्ले अॅग्रोची निर्मिती आहे. [१] ॲप्पी फिझमध्ये कार्बोनेटेड सफरचंदांचा रस असतो आणि कॉकटेलचा आधार म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यात मद्य नसते. [२] ॲप्पीच्या यशानंतर पार्ले अॅग्रोने सोडा मिश्रित सफरचंदांचा रस म्हणजेच ॲप्पी फिझ बनवले. याचेच सिक्वल प्रॉडक्ट ग्रुपो फिझ पार्ले ॲग्रोने बाजारात आणले. यात सोडा मिश्रित द्राक्षाचा रस आहे. २००५- २००८ मध्ये क्रिकेट सामन्यांमधील याच्या जाहिराती अपयशी ठरल्या होत्या. [३] पार्ले अॅग्रोच्या परवान्याअंतर्गत ग्लोबल बेव्हरेज को. लि.मार्फत बांगलादेशात ॲप्पी फिझ यांची निर्मिती व विक्री केली जाते.
संदर्भ
- ^ "Fruit drinks ready for an encore". The Economic Times. 2007-02-09. 2006-05-04 रोजी पाहिले.
- ^ "Big fizz gets the miss as cola warriors slug it out with fruits". Daily News & Analysis. 2007-08-29. 2008-05-04 रोजी पाहिले.
- ^ "Non-traditional Cricket ad firms score high". Business Standard. 2008-02-11. 2008-05-04 रोजी पाहिले.