ॲथलेटिक्स संक्षिप्तरुपे
विक्रम
- WR = विश्वविक्रम
- OR = ऑलिंपिक विक्रम
- CR = चॅंपियनशिप विक्रम
- GR = खेळातील विक्रम
- AR = क्षेत्र (किंवा कॉंटिनेन्टल) विक्रम
- NR = राष्ट्रीय विक्रम (एखाद्या देशासाठी)
- MR = विक्रमाशी बरोबरी
- DLR = डायमंड लीग विक्रम
J अक्षर लावल्यास तो विक्रम ज्युनियर विक्रम दर्शवतो
- WJR = जागतिक ज्युनियर विक्रम
- AJR = क्षेत्र (किंवा कॉंटिनेन्टल) ज्युनियर विक्रम
- NJR = राष्ट्रीय ज्युनियर विक्रम (एखाद्या देशासाठी)
- # = विक्रम स्विकारला गेला नाही हे दर्शवतो. हेच चिन्ह निकालामधील अनियमितता सुद्धा दर्शविते
- X = ॲथलीट कामगिरी केल्यानंतर अपात्र ठरवला गेला हे दर्शविते (बहुतेक वेळी उत्तजेक द्रव्य सेवनासंदर्भात दोषी ठरल्यानंतर)
सर्वोत्तम
- WYB = विश्व युवा सर्वोत्तम
- WB = विश्वात सर्वोत्तम (आयएएएफ विश्व स्पर्धांशिवाय इतर स्पर्धांमध्ये)
- PB = वैयक्तिक सर्वोत्तम
- SB = मोसमात सर्वोत्तम
- WL = विश्व अग्र मानांकन (एखाद्या मोसमात जगातील सर्वोत्तम कामगिरी)
परिस्थिती व अटी
- A = समुद्रसपाटीपासून उच्च पातळीवर कामगिरीचा उच्चांक
- w = वाऱ्याच्या मदतीने उच्चांक
- NWI = वाऱ्याची माहिती नाही
ज्या प्रकारांमध्ये वाऱ्याची मदत हा एक महत्त्वाचा घटक असतो (२२० यार्ड किंवा कमी अंतराच्या मैदानी शर्यती, लांब उडी व तिहेरी उडी), तेथे वाऱ्याचा वेग मीटर प्रति सेकंद किंवा मी/से असा नोंदविला जातो.
- a = रस्त्यावरील शर्यतीमध्ये, ॲथलीट्सला मदत करणारी परिस्थिती दर्शवते (डोंगरउतार, मदत करणारा वारा, पॉंईंट टू पॉंईंट)
- + = दीर्घ शर्यतींमध्ये दरम्यानच्या अंतरासाठी घेण्यात आलेली वेळ दर्शवते
- c = converted mark दर्शवते
- DNF = स्पर्धक शर्यत पूर्ण करु शकला नाही
- DNS = स्पर्धक शर्यत सुरू करु शकला नाही
- DQ = अपात्र
- i = इनडोअर
- n = विजय न मिळवता आलेला वेळ
- NH = उंची नाही
- NM = मार्क नाही
- Q = मोठ्या शर्यतींमध्ये आपोआप पात्र
- q = दुय्यम पात्रता, क्रमवारीत विशिष्ट स्थान किंवा अंतराचे लक्ष्य पार न करता, विहित क्षेत्रात सर्वोत्तम वेळ किंवा अंतर पार करून
- y = शर्यतीच्या अंतराचे एकक यार्ड होते