३ इडियट्स
३ इडियट्स | |
---|---|
दिग्दर्शन | राजकुमार हिरानी |
निर्मिती | विधू विनोद चोप्रा |
कथा | अभिजात जोशी राजकुमार हिरानी |
प्रमुख कलाकार | आमिर खान आर. माधवन शर्मान जोशी करीना कपूर बोम्मन इराणी ओमी वैद्य |
संगीत | शंतनू मोइत्रा |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २५ डिसेंबर २००९ |
वितरक | विनोद चोप्रा प्रॉडक्शन्स |
अवधी | १७१ मिनिटे |
निर्मिती खर्च | ३५ कोटी |
एकूण उत्पन्न | ३.९२ अब्ज |
थ्री इडियट्स हा एक २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. चेतन भगतच्या फाइव्ह पॉइंट समवन ह्या पुस्तकावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मान जोशी, करीना कपूर, बोम्मन इराणी, ओमी वैद्य, मोना सिंग आणि परिक्षीत साहनी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २५ डिसेंबर २००९ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर ह्या चित्रपटाने तिकिट खिडकीवरील सर्व जुने विक्रम तोडले. सध्या तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मिळकत करणारा चित्रपट आहे. भारताबाहेर देखील ह्या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले.
थ्री इडियट्सला ६ फिल्मफेअर, ३ राष्ट्रीय, १० स्क्रीन इत्यादी एकूण ४० पुरस्कार मिळाले.
कथा
चित्रपट हा भारताच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करतो. या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी हे तिघे एकमेकांचे मित्रांचे पात्र सकारात आहे. बोम्मन इराणी यांनी "विरू सहस्रबुद्धे" नामक विध्यापिठाच्या डीनची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री करीना कपूर हिने डीनच्या छोट्या मुलीची भूमिका साकरली आहे. मोठ्या मुलीची भूमिका मोना सिंग हिने साकारली आहे.
चित्रपटात आमिर खान "रणछोडदास चाह्छ्ड" व "फुन्सुख वान्ग्डू" या दोन पात्रा मध्ये दिसतो. आमिरने एक अश्या व्यक्तीचे पात्र साकारले आहे ज्याला शिक्षणाची खूप आवड असते. परंतु त्याची शिकण्याची व शिकवण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असते. आर. माधवन व शर्मन जोशी यांनी दोन मध्यमवर्गीय परिवारातील मुलांची पात्र साकारली आहेत. हे तिन्ही मित्र कोणत्या प्रकारे आपल्या आयुष्यात पुढे जातात व यशस्वी होतात हे बघण्यासारखे आहे.
अतिशय विनोदकीय ढंगात राजकुमार हिरानी याने भारताच्या शिक्षण पद्धतीवर टीका केली आहे. हा चित्रपट एकदा तरी पालकांनी व त्यांच्या पाल्यांनी पाहावा असा आहे.
संगीत
१. "बेहती हवा सा था वोह"
२. "जाने नही देंगे तुझे"
३. "गीव मी सम सनशायीन"
४. "झुबी डुबी"
प्रमुख पुरस्कार
फिल्मफेअर
- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम दिग्दर्शक - राजकुमार हिरानी
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - बोम्मन इराणी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
बाह्य दुवे
- अधिकृत पान
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील ३ इडियट्स चे पान (इंग्लिश मजकूर)
- Bollywood Movies Released In 2009