Jump to content

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला

मुंबईतील या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला.

२६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.[][][] मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.[][]

दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.[]

पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.[] भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला.[] परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.[]

या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या.

हल्ल्याची ठिकाणे

हल्ल्याची ठिकाणे[१०]
ठिकाणहल्ल्याचा प्रकार
छत्रपती शिवाजी टर्मिनसगोळीबार
लियोपोल्ड कॅफे, कुलाबागोळीबार
ताज महाल हॉटेलगोळीबार, ६ बॉम्बस्फोट, आग, ओलिस[]
ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेलगोळीबार, बॉम्बस्फोट
मादाम कामा इस्पितळगोळीबार, ओलिस
नरीमन हाउसगोळीबार, ओलिस
मेट्रो सिनेमागोळीबार
माझगांव डॉकबॉम्बस्फोट
विले पार्लेबॉम्बस्फोट

घटनाक्रम

कुलाब्यात पोलीस बंदोबस्त.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोटरसायकली.

गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनेक हल्ले मुंबईवर झाले आहेत. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरून समुद्रमार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरून सोडण्यात आल्या होत्या.[११]

बातमी अहवालांनुसार नोव्हेंबर २६ रोजी रात्री ८:१० वाजता एका अशा बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. पैकी सहाजण भारी बॅगा घेउन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनाऱ्यालगत पुढे गेले.[१२] स्थानिक कोळ्यांनी या सहाजणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले.[१२] ८:२० वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणाऱ्या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे गुरकावून ते दोन गट करून निघून गेले. कोळ्यांनी याची पोलिसांत बातमी दिली असता त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.[१३]

नोव्हेंबर २६ला रात्री ९:२० वाजता हल्ला सुरू झाला. ए.के. ४७ असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले.[१४] यात कमीतकमी दहा व्यक्ती ठार झाल्या.[१५] याच सुमारास इतर दोघांनी ताज होटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह १५ जणांना ओलिस घेतले.[१६] रात्री अकरा वाजता महाराष्ट्र पोलीस मुख्याधिकाऱ्यांचा हवाला देऊन सी.एन.एन.ने अहवाल दिला की ताज होटेलमधील परिस्थिती निवळली आहे आणि सगळ्या ओलिसांना सोडविण्यात आले आहे,[] पण नंतर उघड झाले की होटेलमध्ये अजूनही ओलिस होतेच.[१७] इकडे ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी ४० ओलिस धरले.[१८] यावेळी ताज व ओबेरॉय मिळून सहा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी होती.[१९][२०] २८ला पहाटे ४:२२ला ताजमहाल होटेल पुन्हा पोलिसांच्या नियंत्रणात आल्याची बातमी आली.[] यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय होटेलमध्ये ठार मारून इमारतीचा ताबा घेतला.<[१६]

या वेळी दोन्ही होटेलना आगी लागलेल्या होत्या व लश्कर व रॅपिड ऍक्शन फोर्सच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातलेला होता.[२१] सुमारे ४०० लश्करी कमांडो आणि ३०० एन.एस.जी. कमांडो तसेच ३५-१०० मार्कोस कमांडो घटनास्थळी पाठविण्यात आले होते.[१५] या शिवाय नेपियन सी रोड आणि व्हिले पार्ले येथे दोन बॉम्ब स्फोट झाले.

भारतात प्रवेश

  तारीख  अंदाजे वेळ
(भारतीय)
घटना
नोव्हें २१संध्याकाळकराचीहून एका बोटीतून दहा दहशतवादी निघाले[२२][२३]
नोव्हें २२विनाशसामुग्रीचे वाटप. प्रत्येकाला ३० गोळ्या असलेली ६-७ मॅगेझिन देण्यात आली. याशिवाय प्रत्येकाला ४०० गोळ्या, ८ हातबॉम्ब, एक ए.के. ४७ असॉल्ट रायफल, स्वयंचलित रिव्हॉल्व्हर, क्रेडिट कार्डे व सुका मेवा देण्यात आला[२२]
नोव्हें २२इतर काही दहशतवादी ताजमहाल होटेलमध्ये हत्यारे व दारुगोळा घेउन राहण्यास दाखल झाले.[२२]
नोव्हें २३पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एक भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला. त्यातील ४ कोळ्यांना ठार मारून कप्तानाला भारताच्या किनाऱ्याकडे जाण्यास भाग पाडले.[२२]
नोव्हें २४कुबेरच्या कप्तानाला ठार मारून दहशतवादी गुजरातजवळ आले. तेथे पांढरा झेंडा फडकावून त्यांनी एका तटरक्षक नौकेला जवळ खेचले. चौकशी करण्यासाठी दोन तटरक्षक अधिकारी कुबेरवर आले असता त्यातील एकाला ठार मारले व दुसऱ्याला मुंबईकडे बोट नेण्यास भाग पाडले.[२२]
नोव्हें २६दुपार, संध्याकाळदहशतवादी मुंबईपासून चार समुद्री मैलावर आल्यावर दुसऱ्या तटरक्षक अधिकाऱ्याला ठार केले. यानंतर संध्याकाळी दहशतवादी तीन हवा भरलेल्या छोट्या तराफ्यांत चढले आणि कुलाब्याकडे निघाले.[२२]
नोव्हें २६रात्रपाकिस्तानहून निघालेले ही दहा माणसे कफ परेडजवळ बधवार पार्क येथे आली. हे ठिकाण नरीमन हाउस पासून अर्ध्या किलोमीटरवर आहे.[२२]
नोव्हें २६रात्री उशीराया दहांपैकी चार ताजमहाल होटेलमध्ये आले, दोघे ओबेरॉय ट्रायडेंटला गेले, दोन नरीमन हाउसला गेले तर उरलेले दोघे, आझम आणि इस्माईल, टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले.[२२]

ताज हॉटेल

छत्रपती शिवाजी टर्मिनस मधील गोळीबाराचे निशाण
ओबेरॉय ट्रायडेंट होटेल

स्रोत: एन.डी.टी.व्ही.[२४], इव्हनिंग स्टँडर्ड[२५], आणि बी.बी.सी.[२६]

  तारीख  अंदाजे वेळ
(भारतीय)
घटना
नोव्हें २६२३:००दहशतवादी ताजमहाल हॉटेलात घुसले.[२४]
नोव्हें २७मध्यरात्रमुंबई पोलिसांनी हॉटेलास वेढा घातला.[२४]
नोव्हें २७०१:००हॉटेलाच्या मध्यवर्ती घुमटात प्रचंड स्फोट. इमारतीत आग.[२४]
नोव्हें २७०२:३०दोन ट्रकमधून सैनिक दाखल. दर्शनी भागातील लॉबीवर कबजा. सगळ्यात वरच्या मजल्यावर आग[२४]
नोव्हें २७०३:००अग्निशमन दल आले. लॉबी आणि हेरिटेज इमारतीत गोळीबार.[२४]
नोव्हें २७०४:००अग्निशमन दलाने शिड्या वापरून २००+ व्यक्तींना सोडवले.[२४]
नोव्हें २७०४:३०दहशतवादी मध्यवर्ती भागातून नवीन इमारतीत गेल्याची बातमी.[२४]
नोव्हें २७०५:००बाँबपथक आणि कमांडो दाखल. पोलिसांनी मारा वाढवला.[२४]
नोव्हें २७०५:३०आग आटोक्यात. दहशतवाद्यांनी १००-१५० ओलिसांसह नवीन इमारतीत ठाण मांडले.[२४]
नोव्हें २७०६:३०सुरक्षा दले हल्ल्यासाठी सज्ज.[२४]
नोव्हें २७०८:००काही व्यक्तींची लॉबीतून सुटका.[२४]
नोव्हें २७०८:३०चेंबर्स क्लबमधून अजून ५० व्यक्तींची सुटका.[२४]
नोव्हें २७०९:००गोळीबार सुरूच. अजून काही माणसे आत अडकल्याची बातमी.[२४]
नोव्हें २७१०:३०इमारतीच्या आत गोळीबारांच्या झटापटी.
नोव्हें २७मध्याह्नअजून ५० व्यक्तींची सुटका.
नोव्हें २७१६:३०दहशतवाद्यांनी चौथ्या मजल्यावर आग लावली.
नोव्हें २७१९:२०अजून एन.एस.जी. कमांडो घटनास्थळी दाखल, होटेल वर नवीन हल्ला.
नोव्हें २७२३:००मोहीम चालूच.
नोव्हें २८०२:५३सहा मृतदेह मिळाले.
नोव्हें २८०२:५३ – ०३:५९दहा हातबॉम्बचा स्फोट
नोव्हें २८१५:००मरीन कमांडोनी इमारतीच्या आतील स्फोटके निकामी केली.
नोव्हें २८१६:००आरमारी कमांडोंना सुमारे १५ अधिक मृतदेह मिळाले.
नोव्हें २८१९:३०इमारतीत नवीन झटापटी व स्फोट.
नोव्हें २८२०:३०एक दहशतवादी पळून गेल्याची बातमी.
नोव्हें २९०३:४०– ०४:१०पाच अजून स्फोट झाल्याची बातमी.
नोव्हें २९०५:०५आत उरलेल्या दहशतवाद्यांबद्दल सुधारित अटकळ.
नोव्हें २९०७:३०पहिल्या मजल्यावरील आग चालूच, दुसऱ्या मजल्यावरही पसरली. इमारतीत चकमकी सुरूच.
नोव्हें २९०८:००कमांडोंनी ताजमहाल होटेलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे जाहीर केले. खोल्याखोल्यांतून शोधमोहीम सुरू. जनतेचा रस्त्यांवर जल्लोष.[२७]

ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल

ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल येथील घटनाक्रम असा घडला.

ओबेरॉय ट्रायडेंट होटेलचा अंतर्भाग
  तारीख  अंदाजे वेळ
(भारतीय)
घटना
नोव्हें २७६ वाएन.एस.जीचे पथक हॉटेलापाशी दाखल.
नोव्हें २७८:४० वागोळीबाराचा आवाज, सेना व नौदलाच्या पथकाचे आगमन.
नोव्हें २७१३:३० वादोन लहान ग्रेनेडचे स्फोट. इमारतीत अजून कुमक घुसली.
नोव्हें २७१५:२५ वाकाही विदेशी नागरिकांची सुटका.
नोव्हें २७१७:३५ वाशीख रेजिमेंटीचे आगमन, प्रचंड गोळीबार.
नोव्हें २७१८:०० वाएर इंडियाच्या इमारतीतून ओलिसांची सुटका काही विदेशी नागरिकांची रुग्णालयात रवानगी.
नोव्हें २७१८:४५ वास्फोटाचा आवाज दोन कंमांडो व २५ सैनिक जखमी झाल्याचा अंदाज. अजून काही ओलिसांची सुटका एकूण ३१.
नोव्हें २७१९:१० वाएका अतिरेक्याला कंठस्नान.
नोव्हें २७१९:२५ वाहॉटेलाच्या ४थ्या मजल्यावर आग
नोव्हें २७२३:०० वाऑपरेशन चालू
नोव्हें २८१० वाट्रायडंटमधून काही ओलिसांची सुटका.
नोव्हें २७१५:00 PMकंमांडो ऑपरेशन संपले २४ ओलिस नागरिक मृत, २ दहशतवादी ठार[२८] एकूण १४३ ओलिसांची सुटका.[२९]

नरीमान हाउस

नरीमान हाउस येथील घटनाक्रम असा घडला.

नरीमन हाउस
  तारीख  अंदाजे वेळ
(भारतीय)
घटना
नोव्हें २७७.०० वापोलिसांनी आजूबाजूच्या इमारती मोकळ्या करून ताबा घेतला.
नोव्हें २७११.०० वापोलीस व अतिरेक्यांच्यात गोळीबार, एक अतिरेकी जखमी.
नोव्हें २७१४:४५ वाअतिरेक्यांनी जवळच्या गल्लीत हातबाँम्ब फेकला, हानी नाही.
नोव्हें २७१७:३० वाएन.एस.जीचे कंमांडोंचे आगमन, नौदलीय हेलीकॉप्टरने सर्वेक्षण.
नोव्हें २७२३.०० वाऑपरेशन चालू.
नोव्हें २८००:०० वापहिल्या मजल्यावरून ९ ओलिसांची सुटका.
नोव्हें २८७:३० वाएन्.एस्.जी कंमाडोंनी नरीमन हाउसच्या गच्चीवर हेलीकॉप्टरने प्रवेश.[३०]
नोव्हें २८३.०० वाएन्.एस्.जी कंमाडों आणि अतिरेकी यांच्यातील गोळीबार चालूच.
नोव्हें २८रात्री ७:३० वाज्यू धर्मगुरू, त्यांची पत्नी व इतर तिघे असे ५ जणांची अतिरेक्यांकडून हत्या.
नोव्हें २८रात्री ८:३० वाएन.एस.जी कंमाडोंचे २ अतिरेक्यांना कंठस्नान, एन्.एस्.जी कंमाडों यांची मोहीम समाप्त. तशी सरकार कडून अधिकृत घोषणा.

नुकसान

देशमृत्यूजखमी
भारत भारतीय१७८६५७
अमेरिका अमेरिका[३१]
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया[३२]
कॅनडा कॅनडा
जर्मनी जर्मनी[३२]
इस्रायलअमेरिका इस्रायल/अमेरिका[३३]-
इस्रायल इस्रायल[३३][३४][३५]-
फ्रान्स फ्रांस[३६]-
युनायटेड किंग्डमसायप्रस ब्रिटन/सायप्रस
चीन चीन-1[३२]
नेदरलँड्सबेल्जियम नेदरलँड्स आणि बेल्जियम1[३७]-
इटली इटली
जपान जपान
जॉर्डन जॉर्डन
मलेशिया मलेशिया[३८]
मॉरिशस मॉरिशियस1[३९][४०]-
मेक्सिको मेक्सिको[४१]-
सिंगापूर सिंगापूर[४२]-
स्पेन स्पेन-[३२][४३][४४]
थायलंड थायलंड[४५]-
ओमान ओमान-[३२]
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया-[४६]
फिलिपिन्स फिलिपाईन्स-[४७]
फिनलंड फिनलंड-[३२]
नॉर्वे नॉर्वे-[४८]

या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. [४९] तर २९३ जण जखमी झाले आहेत.[४९] यांत १२१ भारतीय नागरिक, १७ सुरक्षा कर्मचारी आणि ३४ परदेशी नागरिक आहेत. परदेशी नागरिकांपैकी चार ऑस्ट्रेलियन, चार अमेरिकन, तीन केनेडियन, तीन जर्मन, दोन इस्रायली-अमेरिकन, दोन इस्रायली, दोन फ्रेंच तर प्रत्येकी एक ब्रिटिश-सायप्रॉइट, चिनी, इटालियन, जपानी, जॉर्डनी, मलेशियन, मॉरिशयन, मेक्सिकन, सिंगापूरी, थाई आणि मेक्सिकन आहेत. इतर सांख्यिकी उजवीकडे दिलेली आहे.[][५०][५१][५२][५३][५४][५५][५६]

यांशिवाय नऊ अतिरेकी ठार करण्यात आले आणि एकास जिवंत पकडण्यात आले.[५७]

जखमी झालेल्या इतर २६ परदेशी नागरिकांना बॉम्बे हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले आहे.[५५]

मृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्ती

प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलीस वीरमरण पावले आहेत.[५८]

अँड्रियास लिव्हरास हा ब्रिटिश उद्योगपती हल्ल्यांत मृत्यू पावला.[६०] जर्मन दूरचित्रवाणी निर्माता राल्फ बर्केई, फ्रेंच उद्योगपती लूमिया हिरिद्जी आणि तिचा नवरा हेही मृतांत आहेत.[६१][६२] नरीमन हाउसमध्ये गॅव्रियेल नोआह होल्त्झबर्ग, त्यांची पत्नी रिव्का होल्त्झबर्ग हे मृत्युमुखी पडले.[६३]

महाराष्ट्र सरकार ने प्रत्येक मृताच्या नातेवाईकास ५ लाख रुपये तर जखमींना ५०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.[६४]

प्रतिक्रिया आणि परिणाम

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील गोळीबाराबद्दल ऐकून घाबरलेले कर्मचारी
निषेध

२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावरील प्रतिक्रिया अनेक स्तरांवर व विविध प्रकारच्या होत्या. यांत स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील अधिकाऱ्यांची उचलबांगडी, बदल्या तसेच राजकीय बदल शामिल होते. भारतातील जनतेसह मुस्लिम वर्गानेही या हल्ल्यांचा कठोर निषेध केला आणि हे घडवून आणणाऱ्या संस्थांबद्दल संताप व्यक्त केला. वृत्तमाध्यमांतून अनेक आठवडे या घटनेचा पाठपुरावा केला गेला. नेहमीच्या माध्यमांव्यतिरिक्त सोशल मीडियात या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व पडसाद उमटले.

या घटनांनंतर बहुतांश शाळा, महाविद्यालये व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई रोखे बाजारराष्ट्रीय रोखे बाजार नोव्हेंबर २७ रोजी बंद ठेवण्यात आले.[६५] अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले[६६] काही आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांनी आपली मुंबईची उड्डाण रद्द केली.[६७]

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९|इंग्लंड क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यातील सातपैकी शेवटचे दोन सामने या हल्ल्यांमुळे रद्द करण्यात आले. इंग्लंड संघातील खेळाडू घरी परतले पण नंतर कसोटी सामने खेळण्यासाठी परत आले.[६८] या दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतून चेन्नई येथे हलवण्यात आला.[६९] ३ ते १० डिसेंबर दरम्यान होणारी पहिली ट्वेंटी२० चँपियन्स लीग स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.[७०]

या हल्ल्याच्या निमित्ताने पाकिस्तानने पकडून ठेवलेल्या ३७९ भारतीय होड्या, नौका व ३३६ कोळ्यांचा प्रश्न पुढे आला. यांपैकी २०० नौका पाकिस्तानने परस्पर विकून ते पैसे हडपलेले आहेत. पाकिस्तानची ही चाल आता भारत सरकार आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान समजत असल्याचे जाहीर केले गेले. हा हल्ला झाल्यावर भारताची मखलाशी करण्यासाठी नोव्हेंबर २८ रोजी पाकिस्तानने यांपैकी ९९ कोळ्यांना सोडले.[७१]

याचबरोबर नवी मुंबई येथील आयटीसी फॉर्च्युन होटेल सुद्धा बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसला मिळाली होती पण त्यात तथ्य नव्हते.[७२]

नोव्हेंबर २८ रोजी सीएसटी स्थानकात पुन्हा गोळीबार झाल्याच्या अफवा वृत्तवाहिन्यांनी पसरवल्यावर तेथे निघालेल्या रेल्वेगाड्या मार्गातच थांबवण्यात आल्या.[७३]

भारतीय पंतप्रधान मनमोहनसिंगने विनंती केल्याने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स या हेरखात्याच्या प्रमुख अहमद शुजा पाशाने भारतास येउन हल्ल्याच्या तपासात मदत करण्याचे आश्वासन दिले.[७४] नंतर पाकिस्तान सरकारने हे आश्वासन फिरवून त्याच्या ऐवजी त्याचा उजवा हात असलेल्या आयएसआयचा मुख्य निदेशकास भारतात पाठवण्याचे ठरवले.[७५]

झालेल्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटीलने नोव्हेंबर ३० रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.[७६] राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सल्लागार मयंकोटे केलत नारायणननेसुद्धा आपला राजीनामा दिला परंतु मनमोहनसिंगनी हा राजीनामा स्वीकारला नाही.[७७] महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही याच दिवशी पदत्याग केल्याच्या आवया उठल्या परंतु त्यात तथ्य नव्हते.

उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी हे हल्ले म्हणजे किरकोळ घटना आहेत असे वक्तव्य दिल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. डिसेंबर १ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेता शरद पवारच्या सांगण्यावरून पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राष्ट्राला उद्देशून केलेल्या दूरचित्रवाणीवरील आपल्या भाषणात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी भारत सरकार हे हल्ले करवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांना सोडणार नाही असे सांगितले. हे हल्ले सुनियोजित असून त्याला देशाबाहेरील शक्तींचा पाठिंबा आहे असेही त्यांनी सांगितले.[७८] विरोधीपक्ष नेता लालकृष्ण अडवाणीने भारतीय नागरिकांना या आणीबाणीच्या काळात एकजून राहण्याचे आवाहन केले.[७९]

या हल्ल्यांवर जगभरातून तीव्र प्रतिसाद उमटले. अनेक देशांच्या नेत्यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आणि हताहत व्यक्तींना तसेच त्यांच्या नातेवाईकांना धीराचा संदेश दिला.[८०][८१] मोसाद या इस्रायेलच्या गुप्तहेरखात्याने भारतीय सरकारला देऊ केलेली मदत सरकारने नाकारल्याचे वृत्त आहे.[८२] या हल्ल्यांनतर अनेक पाश्चिमात्य देशांनी आपल्या नागरिकांना लगेचच भारतात जाण्यापासून परावृत्त केले.[८३][८४]

एन.एस.जी.चे विस्तारीकरण

डिसेंबर २ला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एन.एस.जी.चे दिल्लीशिवाय इतर शहरांतून विस्तारीकरण करण्याबद्दल चर्चा होईल.[८५] हे झाल्यास मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता सारख्या शहरांतून एन.एस.जी.चे कमांडो राहतील व दिल्लीहून प्रवास करण्यात जाणारा मौल्यवान वेळ वाचेल.

प्रत्येक एन.एस.जी. कमांडोला वेढा घालण्याचे व वेढा फोडण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.[८६] because the Taj terrorists were in a gun battle for 59 hours continuously.[८७]

पोलिसांना चांगली शस्त्रास्त्रे

कमांडोंकडील बुलेटप्रूफ उपवस्त्रे आणि शिरस्त्राणे व पोलिसदलांकडील उपकरणे यातील मोठा फरक पाहिल्यावर पुण्याच्या पोलीस कमिशनर सत्यपाल सिंहनी सरकारकडे पोलीस अधिकाऱ्यांनाही कमांडोंसारखी उपकरणे व साहित्य देण्याची मागणी केली आहे. यामुळे पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल व त्यांची कामगिरी सुधारेल.[८८]

दहशतवाद विरोधासाठी नवीन केंद्रीय संस्था

सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंहनी जाहीर केले की दहशतवादाशी लढण्यासाठी कायदेतंत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, तसेच दहशतवादविरोधात इतर संस्था व दलांचा समन्वय साधण्यासाठी अन्वेषणसंस्था उभारण्यात येईल.[८९]

मुस्लिम काउन्सिलचा दफनविधीला नकार

भारतीय मुस्लिम काउन्सिल ने ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानात दफन करण्यास मनाई केली. तसेच भारतीय भूमीवर कोठेही या दहशतवाद्यांचे दफन होऊ नये यासाठी प्रयत्न केले.[९०]

केंद्र सरकार समोरील पेच

The attack has put challenges for the Congress-led Indian government ahead of general elections, and also to persuade Pakistan to act against militants. Many general public want some kind of clear response to the attack that killed 183 people, from identifying and punishing the masterminds to trade sanctions against Pakistan, or passing harsh anti-terrorism laws within India.[९१]

राजकारण्यांवर आगपाखड

भारतीय मिडीयाच्या प्रंचड टिकेला व जनतेच्या क्षोभाला भारतीय सरकार व राजकारण्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनतेत या घटनेमुळे जबरदस्त संताप असून सरकारपुढे या टिकेवर समाधानकारक उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहे. तथापि मिडिया ने या हल्ल्याच्या काळात टिआरपी साठी निष्काळजीपणे पोलिसांच्या व कमांडोजच्या हालचाली प्रसारित केल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा दहशतवाद्यांना होत होता असा आरोप मिडीया वर करण्यात आला होता. टाईम्स ने आपल्या अग्रलेखात लिहिले आहे की 'राजकारण्यांच्या निष्काळजी मुळे निष्पापांचा जीव '.[९२]

केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा

३० नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या प्रकरणी गृहमंत्री श्री शिवराज पाटील यांनी नैतिक जवाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला. वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी नवे गृहमंत्री म्हणून जवाबदारी स्वीकारली.[९३] मनमोहन सिंग यांनी स्वता: वित्तमंत्रीपदाचा कार्यभार हातात घेतला.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा

महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री आर. आर. पाटील यांनी १ डिसेंबर २००८ रोजी मुख्यमंत्र्याना आपला राजीनामा सादर केला. पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील 'ऐसी छोटी वारदाते होती रहती है' या विधानावर बरेच वादळ उठले होते. शरद पवार यांनी सूचना केल्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिला.[९४]

पाकिस्तानच्या राजदूताची कानउघाडणी

डिसेंबर १ रोजी भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने पाकिस्तानी हाय कमिशनर शहीद मलिकना बोलावून घेउन पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना लगाम न घातल्या बद्दल अधिकृत तक्रार (डिमार्च) केली.[९५]

परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडून अपेक्षित पावलेही जाहीर केली -- "पाकिस्तानच्या राजदूतांना सांगण्यात आले आहे की पाकिस्तानच्या कृती त्यांच्या भारताशी नवीन प्रकारचे संबंध हवे असल्याच्याबोलण्याप्रमाणे असल्या पाहिजेत.

त्यांना सांगण्यात आले की मुंबईतील हे हल्ले पाकिस्तानमधील व्यक्ती व संस्थांनी केले आहेत. भारत सरकारची अपेक्षा आहे की पाकिस्तान अशांविरुद्ध कृती करून दाखवेल.[९६]

पाकिस्तानवर दबाव

काही माध्यमांनुसार जर हा हल्ला पाकिस्तानात योजला गेल्याचे उघड झाले तर भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावतील आणि भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर दिले जाईल. यासाठी भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसण्याची शक्यता आहे असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.[९७]

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कॉन्डोलीझा राइसने पाकिस्तानला या हल्लेखोरांना पकडण्यासाठी आपल्याकडून पूर्ण सहकार करण्याचे आवाहन केले.[९८]

या प्रसंगानंतर राइस भारताच्या भेटीवर येईल व भारताच्या लोकांसोबत उभे राहण्याचे व त्यासाठी एकत्र काम करण्याचे वचन निभावण्याचे काम करेल असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने सांगितले.[९९]

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची राजीनाम्याची तयारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मसलत करून दुसरा उमेदवार ठरल्यावर हा राजीनामा स्वीकारेल.[१००]

पाकिस्तानकडे दाऊद इब्राहीमला पकडून देण्याची मागणी

सीएनएन-आयबीएन दूरचित्रवाणीवाहिनीच्या अहवालानुसार भारताने पाकिस्तानकडे दाऊद इब्राहीम आणि मौलाना मसूद अझहरला पकडून देण्याची मागणी केली आहे.

दाऊद भारतातील अव्वल नंबरचा पाहिजे असलेला गुन्हेगार आहे. त्याचे लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मसूद जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा स्थापक व म्होरक्या असून त्याला पाकिस्तानने इंडियन एरलाइन्स फ्लाइट ८१४ या विमानाच्या ओलिसांच्या बदली सोडून दिले होते.[१०१] पाकिस्तानने भारताने केलेली मागणी फेटाळून लावली असून पाकिस्तानमध्ये दहशतवादी असल्यास त्याच्यांवर पाकिस्तानमध्ये खटले दाखल करून चालवण्यात येतील असे सांगितले.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "मुंबई ट्रॉमा एंड्स, लीव्ज बिहाइंड ॲन आउटरेज्ड नेशन" (इंग्लिश भाषेत). 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "मुंबई फायटिंग नॅरोझ टू वन होटेल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "पोलिस डिक्लेर मुंबई सीज ओव्हर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "अ डे ऑफ रेकनिंग ॲझ इंडिया टोल टॉप्स १७०" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ a b c d e "स्कोर्स किल्ड इन मुंबई रॅम्पेज" (इंग्लिश भाषेत). २००८-११-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "कॉप्स क्लूलेस अबाउट व्हिले पार्ले टॅक्सी ब्लास्ट" (इंग्लिश भाषेत). २००८-११-२८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ श्मिट, एरिक. "यू.एस. अँड इंडिया सी लिंक टू मिलिटंट्स इन पाकिस्तान" (इंग्लिश भाषेत). २००८-१२-०३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "पाकिस्तान कंटिन्यूज टू रेझिस्ट इंडिया प्रेशर ऑन मुंबई" (इंग्लिश भाषेत). 2009-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००९-०१-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "सरव्हायविंग गनमॅन्स आयडेंटिटी एस्टाब्लिश्ड ॲझ पाकिस्तानी" (इंग्लिश भाषेत). 2019-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००९-०१-०७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "Mumbai targets were favourite hangouts for affluent" (इंग्लिश भाषेत). 26, November, 2008. 2012-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२६ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ ॲलन, पॅडी. "मुंबई टेरर अटॅक्स" (इंग्लिश भाषेत). २००८-११-२७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ a b लेही, ज्यो. "द नाइट मुंबई बिकेम सीन फ्रॉम अ नाइटमेर" (इंग्लिश भाषेत). २००८-११-२७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ मोरू, रॉन (२००८-११-२७). "द पाकिस्तान कनेक्शन" (इंग्लिश भाषेत). २००८-११-२८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; nytimes-latest नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  15. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; mumbaiattack-toi नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  16. ^ a b "७ फॉरेनर्स अमंग द फिफ्टीन टेकन होस्टेज इन ताज होटेल" (इंग्लिश भाषेत). 2020-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  17. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; CNN-27th नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  18. ^ "लेटेस्ट न्यूझ फ्रॉम इंडिया" (इंग्लिश भाषेत). 2008-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  19. ^ "ताज होटेल बर्न्स, २ टेररिस्ट्स किल्ड" (इंग्लिश भाषेत). 2011-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  20. ^ "Taj Hotel Attacked" (इंग्लिश भाषेत). 27 November 2008. २००८-११-२७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  21. ^ "We want all Mujahideen released: Terrorist inside Oberoi - Times of India". The Times of India. 2018-04-22 रोजी पाहिले.
  22. ^ a b c d e f g h The Straits Times (2008-11-30). "दहशतवाद्यांनी मलेशियाचे विद्यार्थी असल्याचे भासवले" (इंग्लिश भाषेत). 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  23. ^ "कन्फेशन्स ऑफ अ टेररिस्ट - इंडियाज सप्टेंबर ११" (इंग्लिश भाषेत). 2010-02-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-३० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  24. ^ a b c d e f g h i j k l m n "ताजमहाल हॉटेलातील घटनाक्रम" (इंग्लिश भाषेत). 2012-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२९ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  25. ^ "घटनाक्रम: कत्तल आणि अराजकतेची रात्र" (इंग्लिश भाषेत). २००८-१२-०१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  26. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; BBChg नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  27. ^ "Mumbai Siege Ends". TOI. 2008-11-29. Text "http://timesofindia.indiatimes.com/Mumbai_siege_ends_combing_op_on_at_Taj/articleshow/3771119.cms " ignored (सहाय्य); |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  28. ^ "कमांडो ऑप्स ॲट ओबेरॉय ओव्हर; होटेल डेथ टोल ३०" (इंग्लिश भाषेत). Reuters. 2008-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-29 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  29. ^ "ऑल मुंबई टेररिस्ट्स किल्ड" (इंग्लिश भाषेत). news.com.au. 2020-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. Text "accessdate" ignored (सहाय्य); Text "२००८-११-२९" ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  30. ^ "नरीमन हाउस क्रायसिस हेड्स फॉर ड्रामॅटिक फिनिश | Pics". 2008-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले.
  31. ^ Sengupta, Somini (2008-11-30). "भारतीय उच्चाधिकार्‍याचा राजीनामा". Asia Pacific. p. 2. 2008-11-30 रोजी पाहिले.
  32. ^ a b c d e f "मुंबईवरील हल्ल्यात ११९ ठार". 27 November 2008 रोजी पाहिले.
  33. ^ a b "Israel: 6 bodies removed from Jewish center [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २००८-११-२८. 2008-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२८ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  34. ^ "Consulate, ZAKA believe there are no more Israel casualties". 2008-30-11. 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  35. ^ . 2008-12-01 http://www.independent.co.uk/news/world/asia/mumbai-sixty-hours-of-terror-and-chaos-1041646.html. 2008-12-01 रोजी पाहिले. Text "Mumbai: Sixty hours of terror and chaos" ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  36. ^ "Battle rages for Mumbai hostages". 28 November 2008 रोजी पाहिले.
  37. ^ "Dutch died in Mumbai: NOS News". 2008-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 December 2008 रोजी पाहिले.
  38. ^ "Hema died of smoke inhalation, says consul-general". The Star. 30 November 2008. 30 November 2008 रोजी पाहिले. Unknown parameter |तिरपे= ignored (सहाय्य)
  39. ^ India, Nerve - News and Analysis of. "CEO of Mauritian bank reported missing in Mumbai  : India". www.nerve.in (इंग्रजी भाषेत). 2017-10-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-22 रोजी पाहिले. line feed character in |title= at position 49 (सहाय्य)
  40. ^ "संग्रहित प्रत". 2008-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले.
  41. ^ "Mexican national among Mumbai victims: Mexican Foreign Ministry". 29 November 2008 रोजी पाहिले.
  42. ^ "Sporean hostage killed". २००८-११-२८. 2009-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२८ रोजी पाहिले.
  43. ^ "List of the deceased". Nation. 2008-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-30 रोजी पाहिले.
  44. ^ "Los dos españoles heridos en los atentados de Bombay regresarán a España en un avión-ambulancia". Internacional (Spanish भाषेत). 2008-11-30. 2008-11-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  45. ^ Thai woman shot dead my militants in Mumbai, Bangkok Post, Accessed 29 November 2008
  46. ^ "13 foreigners died in Mumbai: MHA". 30 November 2008 रोजी पाहिले.
  47. ^ "Filipino tourist injured in Mumbai hotel attack". 28 November 2008 रोजी पाहिले.
  48. ^ "Norway condemns terrorist attacks in India". Norwegian Broadcasting Corporation. 28 November 2008. 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 November 2008 रोजी पाहिले. Unknown parameter |तिरपे= ignored (सहाय्य)
  49. ^ a b "Mumbai death toll revised down". 2008-12-01. 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-30 रोजी पाहिले.
  50. ^ "B.C. family mourns relative's death in Mumbai". २००८-११-२७. 2008-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२७ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  51. ^ Chang, Anita (२००८-११-२७). "104 killed as gunmen rampage in India city". २००८-११-२७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  52. ^ Somayaji, Chitra (२००८-११-२७). "Mumbai Deaths in Attacks Top 100; Injured Total 290". २००८-११-२७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  53. ^ "Indian forces storm Jewish centre". २००८-११-२७. २००८-११-२७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  54. ^ One Japanese killed, another wounded in Mumbai shootings. Archived 2009-01-08 at the Wayback Machine. Retrieved on November 26, 2008.
  55. ^ a b PTI. "Nine foreigners die in terror attacks". २००८-११-२७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  56. ^ "Mumbai: Italians killed in attack". २००८-११-२७. २००८-११-२७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  57. ^ Stevens, Andrew (2008-11-29). "Indian official: Terrorists wanted to kill 5,000". 2008-11-30 रोजी पाहिले.
  58. ^ "Three top cops die on duty". २००८-११-२७. २००८-११-२७ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  59. ^ Three rly men killed in CST encounter
  60. ^ Naughton, Philippe (२००८-११-२७). "British yachting tycoon Andreas Liveras killed in Bombay terror attacks". २००८-११-२७ रोजी पाहिले.
  61. ^ http://www.hindu.com/2008/11/28/stories/2008112854911900.htm Archived 2011-08-13 at the Wayback Machine. and [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  62. ^ The Associated Press. "2 French killed in Mumbai attacks identified". 2008-11-29 रोजी पाहिले.
  63. ^ Chabad rabbi, wife killed in Mumbai attacks by JTA Staff, Jewish Telegraph Agency (JTA), November 28, 2008.
  64. ^ "Key developments in Mumbai terror attacks". 2010-05-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले.
  65. ^ "BSE, NSE to remain closed on Thursday". 27 November 2008. 2011-05-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२७ रोजी पाहिले. Unknown parameter |publiser= ignored (|publisher= suggested) (सहाय्य)
  66. ^ "Shooting of films and TV serials hauled". २००८-११-२७. २००८-११-२८ रोजी पाहिले.
  67. ^ Prada, Paulo (२००८-११-२७). "Mumbai Notebook: Squeeze to India's Cash-Strapped Carriers". २००८-११-२७ रोजी पाहिले.
  68. ^ "Mumbai terrorist attacks: England set to leave India but Test series could still go ahead". २००८-११-२७. २००८-११-२८ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  69. ^
  70. ^ "Mumbai terror attack: T20 Champions League postponed". २००८-११-२७. 2009-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-११-२८ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  71. ^ http://www.expressindia.com/latest-news/boats-auctioned-by-pak-pose-a-threat-india-seeks-details/392730/ Archived 2008-12-02 at the Wayback Machine. Boats auctioned by Pak pose a threat, India seeks details
  72. ^ Dixit, Ravi (२००८-११-२७). "Indian Financial Capital Mumbai Under Attack – Bomb Blasts and Indiscriminate Firing; 125 Dead and 327 Injured". २००८-११-२८ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  73. ^ "NSG sanitising Taj Hotel". November 26, 2008. 2008-11-29 रोजी पाहिले.
  74. ^ "ISI chief to visit India: PM's office". २००८-११-२८. २००८-११-२८ रोजी पाहिले.
  75. ^ "DG ISI representative to visit India: PM". २००८-११-२८. २००८-११-२८ रोजी पाहिले.
  76. ^ "संग्रहित प्रत". 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले.
  77. ^ Press Trust of India (2008-11-30). "Shivraj Patil sends resignation to PM". 2008-11-30 रोजी पाहिले.
  78. ^ Subramaniam Sharma (27 November 2008). "India to 'Go After' Individuals, Groups Behind Mumbai Attacks". २००८-११-२७ रोजी पाहिले.
  79. ^ "Advani calls PM, inquires about terror attacks". २००८-११-२७. २००८-११-२७ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  80. ^ "World leaders condemn Mumbai attacks". २००८-११-२७. २००८-११-२७ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  81. ^ "Mumbai attacks: Reaction from international leaders to terrorism". २००८-११-२७. २००८-११-२७ रोजी पाहिले.
  82. ^ "India declines Israeli offer of aid delegation to Mumbai".
  83. ^ "Many western nations issue Mumbai travel warnings". 2011-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले.
  84. ^ US Department of State Travel Alert, 28 November 2008, 2008-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित, 2008-12-01 रोजी पाहिले
  85. ^ India to bolster NSG strength
  86. ^ "NDTV.com: Mumbai attacks learning experience for NSG". 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले.
  87. ^ 59-hour Mumbai terror siege comes to end_English_Xinhua
  88. ^ Need NSG-like equipment: cops
  89. ^ "PM for federal agency, better legal framework". 2008-12-01. 2008-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  90. ^ "Muslim body refuses to bury 9 killers". 2008-12-01. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  91. ^ "After Mumbai terror attack, PM battles for political life". 2008-12-01. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  92. ^ "India directs anger at politicians after Mumbai attacks". 2008-12-01. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  93. ^ "Resignation of Shivraj Patil". 2008-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले.
  94. ^ "Maharashtra Deputy CM RR Patil resigns". 2008-12-01. 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  95. ^ "Pakistan High Commissioner summoned". 2008-12-01. 2008-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  96. ^ "Mumbai gunmen trained in Pakistan - investigators". 2008-12-01. 2008-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  97. ^ "Mumbai attack may trigger Indian military response'". 2008-11-29. 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  98. ^ "Rice urges Pakistan to cooperate in Mumbai inquiry". 2008-12-01. 2008-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  99. ^ "Rice to visit India on Wednesday, White House says". 2008-12-01. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  100. ^ "Deshmukh offers to quit, Cong concults NCP on his successor". 2008-12-01. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  101. ^ "India asks for Dawood, Masood Azhar's head". 2008-12-01. 2008-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-01 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)