Jump to content

२०२३ एमिलिया रोमान्या ग्रांप्री

इटली २०२३ एमिलिया रोमान्या ग्रांप्री
फॉर्म्युला वन कतार एरवेझ ग्रान प्रीमिओ देल मेड इन इटली इ देल एमिलिया रोमान्या २०२३
अतोद्रोमो इंतरनाझियोनाल आन्झो इ दिनो फेरारी
दिनांकमे २१, इ.स. २०२३
अधिकृत नाव फॉर्म्युला वन कतार एरवेझ ग्रान प्रीमिओ देल मेड इन इटली इ देल एमिलिया रोमान्या २०२३
शर्यतीचे_ठिकाण अतोद्रोमो इंतरनाझियोनाल आन्झो इ दिनो फेरारी, इमोला, इटली
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.९०९ कि.मी. (३.०५० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६३ फेर्‍या, ३०९.०४९ कि.मी. (१९२.०३४ मैल)
२०२३ फॉर्म्युला वन हंगाम
एमिलिया रोमान्या ग्रांप्री
मागील शर्यत२०२२ एमिलिया रोमान्या ग्रांप्री
पुढील शर्यत२०२४ एमिलिया रोमान्या ग्रांप्री

२०२३ एमिलिया रोमान्या ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन कतार एरवेझ ग्रान प्रीमिओ देल मेड इन इटली इ देल एमिलिया रोमान्या २०२३) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १९ मे २०२३ रोजी इमोला येथील अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी येथे आयोजित होण्याचे नियोजन होते. परंतु अचानक आलेल्या पुरामुळे, १७ मे रोजी फॉर्म्युला वन व्यवस्थापनाने शर्यत रद्द केल्याची घोषणा केली.[]

२०२३ एमिलिया रोमान्या पुर

जसा जसा शर्यतीचा दिवस जवळ येत होता, इटालिच्या नागरी संरक्षण विभागाने शर्यत होणाऱ्या एमिलिया-रोमान्या प्रदेशात हवामानाचा रेड अलर्ट जारी केला. हा प्रदेश अतिवृष्टीमुळे प्रभावित झाला होता, ज्यामुळे पूर आणि भूस्खलन झाले. १६ मे २०२३ रोजी, जवळच्या सँटेर्नो नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर खबरदारीच्या पावलांचा हवाला देत सर्व फॉर्म्युला वन कर्मचाऱ्यांना इमोला येथील अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी सर्किट सोडण्याच्या सूचना देण्यात आली.[][]शर्यतीच्या आधी आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आदल्या दिवशी अनेक अफवांमुळे, इटालियन मंत्रालयाने शर्यत पुढे ढकलण्याचे आवाहन केले.[][] ग्रँड प्रिक्स स्थळाचे काही भाग, ज्यात फॉर्म्युला २ पॅडॉकचा समावेश आहे, तेथे रद्द करण्याच्या घोषणेनंतर पूर आल्याचे दिसून आले. []

शेवटी, फॉर्म्युला १, तसेच फॉर्म्युला २ आणि फॉर्म्युला ३ ग्रांप्री शर्यती, वेळापत्रकानुसार ठरल्याप्रमाणे आयोजीत नाही केल्या गेल्या. फॉर्म्युला वनच्या अधिकृत निवेदनात असे म्हणले की सर्व चाहते, संघ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतीतेचा विचार करून कार्यक्रम आयोजित करणे शक्य नव्हते आणि वादळाच्या नुकसानामुळे स्थानिक आपत्कालीन सेवांवर आधीच खुप दबाव आला होता त्यामुळे त्यांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.[][] घोषणेने नंतर कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याची शक्यता नाकारली नाही गेली, तार्किक दृष्ट्या व्यवहारीय रेस कॅलेंडर मध्ये नवीन जागेच्या कमतरतेमुळे असे होण्याची शक्यता नाही असे ही मानले जात होते.[][][]

फॉर्म्युला वन ने एमिलिया-रोमान्या प्रदेशाच्या प्रादेशिक सुरक्षा आणि नागरी संरक्षण संस्थेला १ दशलक्ष युरो देणगी दिली,[१०] आणि स्कुदेरिआ फेरारी यांनी पुरानंतरच्या प्रदेशाच्या निधी उभारणीच्या प्रयत्नांना आणखी €१ दशलक्ष देणगी जाहीर केली.[११]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. एमिलिया रोमान्या ग्रांप्री
  3. २०२३ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c "एफ.१ उत्तर इटलीमध्ये पुरामुळे एमिलिया रोमान्या ग्रँड प्रिक्स रद्द". १७ मे २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "एमिलिया रोमान्या ग्रांप्री : एफ.१ कर्मचाऱ्यांना मुसळधार पावसाच्या चिंतेने इमोला सर्किट सोडण्यास सांगितले".
  3. ^ "इमोला एफ.१ वीकेंडला रेड अलर्ट हवामान चेतावणी दरम्यान व्यत्यय येत आहे". १७ मे २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ "इटालियन सरकारी कॉल इमोला ग्रांप्री साठी पुढे ढकलण्यात येणार आहे".
  5. ^ "इटालियन उपपंतप्रधानांनी इमोला एफ.१ पुढे ढकलण्याची मागणी केली".
  6. ^ मॅट केव. "एफ.१ ने हवामान आणीबाणीमुळे इमोला ग्रांप्री रद्द केले".
  7. ^ "इमोलामध्ये एमिलिया रोमान्या ग्रँड प्रिक्सवर अपडेट".
  8. ^ "एफ.१ च्या कंडेन्स्ड कॅलेंडरने इमोला २०२३ रिटर्न संभव का सोडले". १८ मे २०२३ रोजी पाहिले.
  9. ^ "एफ.१ ने इमिलिया रोमान्या पुरामुळे विनाशकारी इमोला येथे ग्रँड प्रिक्स बंद केला". १८ मे २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  10. ^ "फॉर्म्युला वन एमिलिया रोमान्या प्रदेशाच्या प्रादेशिक सुरक्षा आणि नागरी संरक्षण संस्थेला €१ दशलक्ष युरो देणगी".
  11. ^ "फेरारीने इमोला शर्यत रद्द केल्यानंतर फ्लडिंग फंडात £८७०k दान केले". १९ मे २०२३ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
२०२३ हंगाम
मागील शर्यत:
२०२२ एमिलिया रोमान्या ग्रांप्री
एमिलिया रोमान्या ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२४ एमिलिया रोमान्या ग्रांप्री