२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (नववी फेरी)
२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (नववी फेरी) | ||||||
---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||
| ||||||
संघ | ||||||
![]() | ![]() | ![]() | ||||
संघनायक | ||||||
गेरहार्ड इरास्मुस | झीशान मकसूद (४ सामने) खावर अली (१ सामना) | अहमद रझा | ||||
सर्वात जास्त धावा | ||||||
गेरहार्ड इरास्मुस (२७१) | शोएब खान (२६९) | व्रित्य अरविंद (२०७) | ||||
सर्वात जास्त बळी | ||||||
जॅन फ्रायलिंक (८) | बिलाल खान (१७) | झहूर खान (११) |
२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (नववी फेरी) ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये ५ ते १४ मार्च २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान संयुक्त अरब अमिरातीसह ओमान आणि नामिबिया या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.
सदर स्पर्धेची ही नववी फेरी नियोजनाप्रमाणे डिसेंबर २०२१ मध्ये खेळवली जाणार होती, परंतु जगात कोरोनाव्हायरस या रोगाचा फैलाव झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा मार्च २०२२ मध्ये होईल असे जाहीर झाले. पुढच्या आठवड्यात लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले. चौथ्या फेरीमधील ओमान वि नामिबिया रद्द झालेला सामना देखील या फेरीमध्ये खेळविण्यात आला.
सामने
१ला सामना
ओमान ![]() २२५/७ (५० षटके) | वि | ![]() २१३ (४८.५ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
- आसिफ खान (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ओमानने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, संयुक्त अरब अमिराती - ०.
२रा सामना
नामिबिया ![]() २२६ (४९.५ षटके) | वि | ![]() ११६ (४२.१ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- नामिबियाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- टांगेनी लुंगामेनी (ना) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- डेव्हिड विसी याने दक्षिण आफ्रिकेतर्फे खेळल्यानंतर नामिबियाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : नामिबिया - २, ओमान - ०.
३रा सामना
नामिबिया ![]() २०८/६ (५० षटके) | वि | ![]() २०७/७ (४७.१ षटके) |
डेव्हिड विसी ६७ (८४) झहूर खान ३/४४ (१० षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक लीग दोन गुण : संयुक्त अरब अमिराती - २, नामिबिया - ०.
४था सामना
ओमान ![]() २२१/७ (५० षटके) | वि | ![]() २१३ (४८.३ षटके) |
- नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, संयुक्त अरब अमिराती - ०.
५वा सामना
नामिबिया ![]() २७५/८ (५० षटके) | वि | ![]() २७६/३ (४६.१ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, नामिबिया - ०.
६वा सामना
संयुक्त अरब अमिराती ![]() ३४८/९ (५० षटके) | वि | ![]() ३०५/९ (५० षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक लीग दोन गुण : संयुक्त अरब अमिराती - २, नामिबिया - ०.
७वा सामना
ओमान ![]() २६५/५ (५० षटके) | वि | ![]() २६६/५ (४७.३ षटके) |
शोएब खान ८६ (१०३) जॅन फ्रायलिंक ३/३६ (१० षटके) | जॅन निकोल लोफ्टी-इटन ६३ (७१) बिलाल खान २/३० (९ षटके) |
- नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
- लो-हांद्रे लोवरेन्स (ना) आणि वसिम अली (ओ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : नामिबिया - २, ओमान - ०.