Jump to content

२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक

२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक
तारीख ४ मार्च – ३ एप्रिल २०२२
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमानन्यूझीलंड न्यू झीलंड
विजेतेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
सहभाग
सामने ३१
मालिकावीरऑस्ट्रेलिया अलिसा हीली
सर्वात जास्त धावाऑस्ट्रेलिया अलिसा हीली (५०९)
सर्वात जास्त बळीइंग्लंड सोफी एसलस्टोन (२१)
अधिकृत संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
२०१७ (आधी)(नंतर) २०२५ →

२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे सुरू केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची बारावी आवृत्ती ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान न्यू झीलंडमध्ये झाली. न्यू झीलंडमध्ये महिला क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी १९८२ आणि २००० साली न्यू झीलंडमध्ये विश्वचषक झाला होता. मूलत: स्पर्धा ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ दरम्यान आयोजित केली जाणार होती परंतु कोव्हिड-१९ रोगाच्या फैलावामुळे स्पर्धा १ वर्ष पुढे ढकलण्यात आली. यजमान न्यू झीलंडसह ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या आठ देशांनी सदर विश्वचषकात सहभाग घेतला. पैकी बांगलादेशने महिला विश्वचषक पदार्पण केले.

न्यू झीलंड संघ स्पर्धेचा यजमान म्हणून आपोआप पात्र ठरला. मूलत: २०१७-२० आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेमधून आणखी तीन संघ पात्र ठरतील असे ठरले असताना ऑक्टोबर २०१८ मध्ये हा निर्णय बदलला गेला आणि सर्वोत्तम ४ संघ + स्पर्धेचा यजमान अस ठरवलं गेल. २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रतामधून आणखी ३ संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते. १२ मे २०२० रोजी आयसीसीने कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे पात्रता स्पर्धा जी ३-१४ जुलै २०२० दरम्यान श्रीलंकेत होणार होती ती अनिश्चित काळाकरता पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली. पात्रता स्पर्धा नोव्हेंबर २०२१ मध्ये झिम्बाब्वेमध्ये हलवण्यात आली. परंतु पुन्हा एकदा कोव्हिड-१९ पसरल्यामुळे पात्रता स्पर्धा अर्ध्यातूनच रद्द करावी लागली. महिला एकदिवसीय क्रमवारीनुसार विश्वचषकातील शेष तीन जागा भरवल्या गेल्या.

ऑस्ट्रेलियाने पहिले ६ सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. पाठोपाठ पहिल्या ६ सामन्यांमध्ये ४ विजयांसह दक्षिण आफ्रिका देखील उपांत्य फेरीस पात्र ठरला. इंग्लंडने शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. गट फेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भारतावरील विजयामुळे ७ गुणांसह वेस्ट इंडीज चौथे स्थान पटकावत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात अलिसा हीलीच्या १७० धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करत सातव्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाच्याच अलिसा हीलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. तिने स्पर्धेतील सर्वाधिक ५०९ धावा केल्या. तर २१ बळी घेऊन इंग्लंडची सोफी एसलस्टोन ही स्पर्धेत आघाडीची गोलंदाज ठरली.

सहभागी देश

२७ नोव्हेंबर २०२१ रोजी आफ्रिका खंडात कोव्हिड-१९ पसरायला लागल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने पात्रता स्पर्धा रद्द केली. महिला वनडे क्रमवारीच्या आधारे शेष तीन जागांसाठी बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज हे तीन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले.

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडयजमान, महिला अजिंक्यपद स्पर्धा १२ २०१७विजेते (२०००)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामहिला अजिंक्यपद स्पर्धा १२ २०१७विजेते (१९७८, १९८२, १९८८, १९९७, २००५, २०१३)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१२ २०१७विजेते (१९७३, १९९३, २००९, २०१७)
भारतचा ध्वज भारत१० २०१७उपविजेते (२००५, २०१७)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२०१७उपांत्यफेरी (२०००, २०१७)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशविश्वचषक पात्रता स्पर्धा
महिला वनडे क्रमवारी
पदार्पण पदार्पण पदार्पण
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२०१७सुपर सिक्स(२००९)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२०१७उपविजेते(२०१३)

मैदाने

११ मार्च २०२० रोजी आयसीसीने मैदानांची घोषणा केली. क्राइस्टचर्च शहरातील हॅगले ओव्हलवर अंतिम सामना खेळविण्यात आला.

क्राइस्टचर्चऑकलंडमाऊंट माउंगानुई हॅमिल्टन वेलिंग्टनड्युनेडिन
हॅगले ओव्हलईडन पार्क बे ओव्हलसेडन पार्कबेसिन रिझर्वयुनिव्हर्सिटी ओव्हल
प्रेक्षक क्षमता: १८,००० प्रेक्षक क्षमता: ४२,००० प्रेक्षक क्षमता: १०,००० प्रेक्षक क्षमता: १०,००० प्रेक्षक क्षमता: ११,६०० प्रेक्षक क्षमता: ३,५००

संघ

सर्व संघांनी प्रत्येकी १५ खेळाडूंची पथके जाहीर केली. ६ जानेवारी २०२२ रोजी खेळाडूंचे पथक जाहीर करणारा भारत पहिला देश ठरला. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी, आयसीसीने स्पर्धेसाठी खेळण्याच्या अटी जाहीर केल्या, ज्याने संघात कोविड-१९चा उद्रेक झाल्यास केवळ नऊ खेळाडू असल्यास सामने खेळण्याची परवानगी दिली.

स्पर्धा प्रकार

सर्व संघांनी प्रतिस्पर्धी संघाबरोबर एक सामना खेळला. गट फेरीमध्ये प्रत्येक संघासाठी ७ सामने निश्चित होते. गुणफलकातील सर्वोच्च चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. पहिला उपांत्य सामना हॅगले ओव्हल, दुसरा उपांत्य सामना बेसिन रिझर्व आणि अंतिम सामना इडन पार्क वर झाला.

सराव सामने

सामनाधिकारी

पंच

सामनाधिकारी

  • भारत गांदीकोटा लक्ष्मी
  • न्यूझीलंड गॅरी बॅक्स्टर
  • दक्षिण आफ्रिका शंद्रे फ्रिट्झ

गट फेरी

गुणफलक

संघ
खेविगुणरनरेटपात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१४१.२८३उपांत्य फेरीसाठी पात्र
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका११०.०७८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०.९४९
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज-०.८८५
भारतचा ध्वज भारत०.६४२स्पर्धेतून बाद
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड०.०२७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश-०.९९९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान-१.३१३


सामने

४ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५९/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५६ (४९.५ षटके)

५ मार्च २०२२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०७ (४९.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७५ (४९.३ षटके‌)

५ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१०/३ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९८/८ (५० षटके)

६ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२४४/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३७ (४३ षटके)

७ मार्च २०२२
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४०/८ (२७ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४४/१ (२० षटके)

८ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९०/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३/३ (३४.४ षटके)

९ मार्च २०२२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२५/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१८ (४७.४ षटके)

१० मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६०/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९८ (४६.४ षटके)

११ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२३/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१७ (४९.५ षटके)

१२ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३१७/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६२ (४०.३ षटके)

१३ मार्च २०२२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६९/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२८ (३०.२ षटके)

१४ मार्च २०२२
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२३४/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२५/९ (५० षटके)

१४ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३५/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२३६/७ (४९.२ षटके)


१६ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३४ (३६.२ षटके‌)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३६/६ (३१.२ षटके)

१७ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२८ (४७.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२९/८ (४९.३ षटके)

१८ मार्च २०२२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१४०/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३६ (४९.३ षटके)

१९ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२७७/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८०/४ (४९.३ षटके)

२० मार्च २०२२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०३ (४८.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०४/९ (४७.२ षटके)

२१ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
८९/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
९०/२ (१८.५ षटके)


२२ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२३०/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११८ (४०.३ षटके)


२४ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१०५ (४१.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०७/१ (१९.२ षटके)


२६ मार्च २०२२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६५/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९४/९ (५० षटके)

२७ मार्च २०२२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३४/६ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३४ (४८ षटके)


बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया३०५/३ (४५ षटके) 
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१४८ (३७ षटके)  
     ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया३५६/५ (५० षटके)
   इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२८५ (४३.४ षटके)
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१५६ (३८ षटके)
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२९३/८ (५० षटके) 

१ला उपांत्य सामना

विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना ३० मार्च रोजी झाला. पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला. वेस्ट इंडीज महिलांनी नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज राचेल हेन्स आणि अलिसा हीली या दोघींनी पहिल्या गड्यासाठी तब्बल २१६ धावांची भागीदारी रचली. राचेल हेन्स हिने १०० चेंडूमध्ये ८५ धावा केल्या तर अलिसा हीली हिने १०७ चेंडूमध्ये १२९ धावांची शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ४५ षटकांमध्ये ३ गड्यांच्या मोबदल्यात ३०५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने मंद सुरुवात केली. कर्णधार स्टेफनी टेलर हिने सर्वाधिक ४८ धावा केल्या. वेस्ट इंडीजचे अखेरचे दोन फलंदाज छिनेल हेन्री आणि अनिसा मोहम्मद हे फलंदाजी करु न शकल्याने वेस्ट इंडीज १४८ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने सामना १५७ धावांनी जिंकत दणक्यात अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवला. शतकवीरांगना अलिसा हीली हिला सामनाविरांगनेचा पुरस्कार देण्यात आला.


२रा उपांत्य सामना

हॅगले ओव्हल इथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे इंग्लंडने तुफान फलंदाजी करत ८ गड्यांच्या मोबदल्यात २९३ धावा केल्या. डॅनियेल वायट हिने १२९ धावांची शतकी खेळी केली. धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे तीनतेरा उडाले. सलामी फलंदाज लवकर बाद झाले. सोफी एसलस्टोन हिच्या ६ बळींच्या जोरावर ३८व्या षटकामध्येच दक्षिण आफ्रिकेचा डाव १५६ धावांवर आटोपला. विद्यमान जगज्जेते इंग्लंडने पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

३१ मार्च २०२२ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९३/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५६ (३८ षटके)


अंतिम सामना

विद्यमान विजेते इंग्लंडने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन फलंदाज अलिसा हीली हिने तडाखेबंद फलंदाजी करत १७० धावांची अजरामर खेळी केली. हीलीच्या १७० धावा या पुरुष अथवा महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा आहे. ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकांमध्ये ३५६ धावा केल्या. डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. परंतु नंतर नॅटली सायव्हर हिने एकीकडून किल्ला लढवत ठेवून नाबाद १४८ धावा केल्या परंतु तेवढ्या पुरेश्या नव्हत्या. इंग्लंडचा डाव २८५ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक आपल्या नावावर केला.

३ एप्रिल २०२२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३५६/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२८५ (४३.४ षटके)

आकडेवारी

सर्वाधिक धावा

खेळाडूसामनेडावधावासरासरीस्ट्रा.रे.सर्वो. धावा१००५०चौकारषटकार
ऑस्ट्रेलिया अलिसा हीली५०९५६.५५१०३.६६१७०६९
ऑस्ट्रेलिया राचेल हेन्स ४९७६२.१२८२.५५१३०५७
इंग्लंड नॅटली सायव्हर४३६७२.६६९२.९६१४८*४७
दक्षिण आफ्रिका लॉरा वॉल्व्हार्ड४३३५४.१२७७.७३९०४६
ऑस्ट्रेलिया मेग लॅनिंग३९४५६.२८८८.७३१३५*४४

सर्वाधिक बळी

खेळाडूसामनेडावबळीषटकेइकॉ.सरासरीसर्वो. गोलंदाजीस्ट्रा.रे.४ गडी५ गडी
इंग्लंड सोफी एसलस्टोन२१८५.३३.८३१५.६१६/३६२४.४
दक्षिण आफ्रिका शबनिम इस्माइल१४६०.५४.०२१७.५०३/२७२६.०
ऑस्ट्रेलिया जेस जोनासन१३६०.३४.०४१८.८४३/५७२७.९
ऑस्ट्रेलिया अलाना किंग१२६५४.५२२४.५०३/५९३२.५
दक्षिण आफ्रिका मेरिझॅन कॅप१२६६.३४.७३२६.२५५/४५३३.२