Jump to content

२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक

२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक
तारीख २४ – २६ जून २०२१
व्यवस्थापकबल्गेरिया क्रिकेट फेडरेशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमानबल्गेरिया बल्गेरिया
विजेतेरोमेनियाचा ध्वज रोमेनिया
सहभाग
सामने
मालिकावीररोमेनिया तरणजीत सिंग
सर्वात जास्त धावारोमेनिया रमेश सथीसन (१९७)
सर्वात जास्त बळीरोमेनिया समी उल्लाह (७)
रोमेनिया पॅवेल फ्लोरिन (७)
(नंतर) २०२२

२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २४-२६ जून २०२१ दरम्यान बल्गेरियामध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धा बल्गेरिया क्रिकेट फेडरेशनच्या स्थापनेस २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भरविण्यात आली होती. सर्व सामने सोफिया मधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीावर खेळविण्यात आले. यजमान बल्गेरियासह रोमेनिया, सर्बिया आणि ग्रीस या चार देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला.

स्पर्धा प्रथम गट पद्धतीने खेळवली गेली. सर्व संघांनी विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. गट फेरीचे सामने झाल्यावर गुणफलकातील अंतिम क्रमवारीनुसार उपांत्य सामने झाले. रोमेनिया ने सर्व गट सामने जिंकत पहिले स्थान पटकावले. रोमेनियाने चौथ्या स्थानावर असलेल्या सर्बियाला उपांत्य सामन्यात १० गडी राखत अंतिम सामना गाठला. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या बल्गेरियाची तिसऱ्या स्थानावर असलेल्या ग्रीसबरोबरची उपांत्य सामन्याची लढत पावसाचा व्यत्यत आल्याने रद्द करण्यात आली. गट फेरीत दुसऱ्या स्थानी राहिल्यामुळे बल्गेरिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात रोमेनियाने बल्गेरियाचा ७ गडी राखून पराभत करत सोफिया ट्वेंटी२० चषक जिंकला. तरणजीत सिंग याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोमेनियाच्याच रमेश सथीसन याने स्पर्धेत सर्वाधिक १९७ धावा केल्या तर समी उल्लाह आणि पॅवेल फ्लोरिन ह्या जोडीने प्रत्येकी ७ बळी मिळवत स्पर्धेत आघाडीचे गोलंदाज ठरले.

गुणफलक

संघ
साविगुणधावगतीनोट्स
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया +४.०१११ल्या उपांत्य सामन्यास पात्र
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया +१.२००२ऱ्या उपांत्य सामन्यास पात्र
ग्रीसचा ध्वज ग्रीस -१.४४५
सर्बियाचा ध्वज सर्बिया -३.५०२१ल्या उपांत्य सामन्यास पात्र

गट फेरी

२४ जून २०२१
१४:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
२०८/७ (२० षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
१४७/५ (२० षटके)
अरविंद डि सिल्व्हा १००* (६०)
वुकासिन झिमोंझिक १/३१ (४ षटके)
स्लोबोडन टॉसिक ३८* (५७)
ह्रिस्तो लाकोव २/८ (४ षटके)
बल्गेरिया ६१ धावांनी विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: इओनिस आफिथिनोस (ग्री) आणि सुदीप ठाकूर (रो)
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (बल्गेरिया)
  • नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
  • सर्बियाने बल्गेरियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • जॅकब अल्बिन, अस्वद खान (ब), विन्टले बर्टन, ब्रेट डेव्हिडसन, मायकेल डॉर्गन, निकोलस जॉन्स-विकबर्ग, स्लोबोडन टॉसिक, नेमंजा झिमोनजीक आणि वुकासिन झिमोंझिक (स) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२४ जून २०२१
१७:३०
धावफलक
ग्रीस Flag of ग्रीस
१५७/८ (२० षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१५९/७ (१२.५ षटके)
अस्लाम मोहम्मद ६१ (४२)
शंतनु वशिष्ठ ४/२२ (४ षटके)
रमेश सथीसन ७० (३२)
स्पायरीडॉन गॅस्टेराटोस २/४ (१ षटक)
रोमेनिया ३ गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: स्टीफन नेरंडझिक (स) आणि निसर्ग शाह (ब)
सामनावीर: रमेश सथीसन (रोमेनिया)
  • नाणेफेक : ग्रीस, फलंदाजी.
  • ग्रीस आणि रोमेनिया या दोन्ही देशांनी बल्गेरियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • ग्रीस आणो रोमेनिया या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रोमेनियाने ग्रीसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • सय्यद अमानुल्लाह, स्पायरीडॉन गॅस्टेराटोस, निकोलॉस मॉरिकिस, स्पायरोस सिरिओटिस, थॉमस झोटोस (ग्री) आणि तरणजीत सिंग (रो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२५ जून २०२१
१०:००
धावफलक
सर्बिया Flag of सर्बिया
१४४ (२० षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
१४७/५ (१४.३ षटके)
निकोलस जॉन्स-विकबर्ग २४ (१७)
स्पायरीडॉन गॅस्टेराटोस २/१२ (४ षटके)
अस्लाम मोहम्मद ५४ (२५)
वुकासिन झिमोंझिक २/२७ (४ षटके)
ग्रीस ५ गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: इवान दिमित्रोव्ह (ब) आणि निसर्ग शाह (ब)
सामनावीर: अस्लाम मोहम्मद (ग्रीस)
  • नाणेफेक : ग्रीस, क्षेत्ररक्षण.
  • अल्किनुस मॅनाटोस (ग्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२५ जून २०२१
१३:३०
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
१५७/८ (२० षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१६१/३ (१४ षटके)
सुलैमान अली ३२ (१६)
तरणजीत सिंग ३/२७ (४ षटके)
तरणजीत सिंग ६० (२२)
प्रकाश मिश्रा १/१६ (३ षटके)
रोमेनिया ७ गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: इओनिस आफिथिनोस (ग्री) आणि स्टीफन नेरंडझिक (स)
सामनावीर: तरणजीत सिंग (रोमेनिया)
  • नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.
  • सुदीप ठाकूर (रो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२५ जून २०२१
१७:००
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१९१ (१९.२ षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
१०० (१६.५ षटके)
सुदीप ठाकूर ५५ (३१)
निकोलस जॉन्स-विकबर्ग ३/१९ (४ षटके)
विन्टले बर्टन २२ (१२)
पॅवेल फ्लोरिन ३/१४ (३.५ षटके)
रोमेनिया ९१ धावांनी विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: इओनिस आफिथिनोस (ग्री) आणि निसर्ग शाह (ब)
सामनावीर: सुदीप ठाकूर (रोमेनिया)
  • नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.
  • सर्बिया आणि रोमेनिया या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रोमेनियाने सर्बियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२६ जून २०२१
१०:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
१९७/४ (२० षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
१३३ (१६.५ षटके)
ह्रिस्तो लोकाव ६८* (४७)
अस्रार अहमद २/३३ (४ षटके)
अनास्तासिओस मॅनोसिस २७ (१९)
प्रकाश मिश्रा ३/१२ (१.५ षटके)
बल्गेरिया ६४ धावांनी विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: अँड्रु बेग (रो) आणि स्टीफन नेरंडझिक (स)
सामनावीर: प्रकाश मिश्रा (बल्गेरिया)
  • नाणेफेक : ग्रीस, क्षेत्ररक्षण.

उपांत्य फेरी

१ला उपांत्य सामना

२६ जून २०२१
१३:३०
धावफलक
सर्बिया Flag of सर्बिया
११५/७ (२० षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
११६/० (५.४ षटके)
लेस्ली डनबर ५५* (४१)
पॅवेल फ्लोरिन २/२२ (३ षटके)
तरणजीत सिंग ५७* (१९)
रोमेनिया १० गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: इओनिस आफिथिनोस (ग्री) आणि निसर्ग शाह (ब)
सामनावीर: तरणजीत सिंग (रोमेनिया)
  • नाणेफेक : सर्बिया, फलंदाजी.

२रा उपांत्य सामना

२६ जून २०२१
१७:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
१४० (१९.५ षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
३३/२ (३.५ षटके)
बख्तियार ताहिरी ४९ (४५)
जॉर्जियस गॅलानिस ३/१७ (४ षटके)
अनास्तासिओस मॅनोसिस १७* (१०)
ह्रिस्तो लोकाव १/२ (०.५ षटक)
सामन्याचा निकाल लागला नाही.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: अँड्रु बेग (रो) आणि स्टीफन नेरंडझिक (स)
  • नाणेफेक : ग्रीस, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
  • गट फेरीमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिल्याने बल्गेरिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.

अंतिम सामना

२७ जून २०२१
११:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
११५/९ (२० षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
११९/३ (१०.२ षटके)
सुलैमान अली २१ (१९)
वसु सैनी ४/१२ (४ षटके)
तरणजीत सिंग ३९ (१६)
रोहन पटेल १/१३ (२ षटके)
रोमेनिया ७ गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
पंच: इओनिस आफिथिनोस (ग्री) आणि स्टीफन नेरंडझिक (स)
सामनावीर: समी उल्लाह (रोमेनिया)
  • नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.