२०२१ मध्य युरोप चषक
२०२१ मध्य युरोप चषक | |
---|---|
तारीख | २१ – २३ मे २०२१ |
व्यवस्थापक | चेक प्रजासत्ताक क्रिकेट बोर्ड |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी |
यजमान | चेक प्रजासत्ताक |
विजेते | ऑस्ट्रिया (१ वेळा) |
सहभाग | ३ |
सामने | ६ |
सर्वात जास्त धावा | साबावून दावीझी (१६२) |
सर्वात जास्त बळी | विक्रम विझ (६) पॉल टेलर (६) |
२०२१ मध्य युरोप चषक ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा आहे २१ ते २३ मे २०२१ दरम्यान चेक प्रजासत्ताक देशातील प्राग येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत यजमान चेक प्रजासत्ताकसह ऑस्ट्रिया आणि लक्झेंबर्ग या तीन देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. माल्टा क्रिकेट संघ सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार होता परंतु ६ मे रोजी आलेल्या बातमीनुसार वाढत्या कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामुळे माल्टा संघाने या स्पर्धेतून माघार घेतली. सर्व सामने प्राग मधील विनॉर क्रिकेट स्टेडियमवर खेळविले गेले.
ही स्पर्धा मध्य युरोप चषकातली ७वी स्पर्धा आहे आणि सन २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी (आयसीसी) सर्व सदस्य देशांमधील खेळवल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०चा दर्जा बहाल केला. त्यामुळे ही या वर्षीची स्पर्धा अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा असलेली पहिली स्पर्धा आहे. इसवी सन २०२० मध्येच या स्पर्धेला अधिकृत ट्वेंटी२० दर्जा दिला गेला होता परंतु कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामुळे सन २०२० च्या स्पर्धेची आवृत्ती रद्द करण्यात आली होती.
ऑस्ट्रियाने ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवत अव्वल स्थानावर राहत मध्य युरोप चषक या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकला.
गुणफलक
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रिया | ४ | ३ | १ | ० | ० | १२ | +१.३७० |
लक्झेंबर्ग | ४ | २ | २ | ० | ० | ८ | -०.०१५ |
चेक प्रजासत्ताक | ४ | १ | ३ | ० | ० | ४ | -१.१५१ |
गट फेरी
लक्झेंबर्ग १२६/५ (२० षटके) | वि | चेक प्रजासत्ताक १२७/१ (१८.२ षटके) |
टिमोथी बेकर ६० (४२) पॉल टेलर २/१९ (४ षटके) | साबावून दावीझी ५७ (३३) विक्रम विझ १/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.
- साहिल ग्रोवर, स्मित पटेल, सत्यजीत सेनगुप्ता, अली वकार (चे) आणि आनंद पांडे (ल) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
लक्झेंबर्ग १४३/५ (२० षटके) | वि | ऑस्ट्रिया ५९/३ (७.३ षटके) |
टिमोथी बेकर ३५ (३२) रझमल शिगीवाल २/२८ (४ षटके) | मार्क सिम्पसन-पार्कर २३ (१९) विक्रम विझ २/५ (१ षटक) |
- नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
- राह्यान अहमद, लकमल कस्तुरियराचीचि, झबीउल्लाह इब्राहिमखेल, जावीद सद्रान, नवीन विजेसेकरा आणि साहेल झद्रान (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
ऑस्ट्रिया १६२/६ (२० षटके) | वि | चेक प्रजासत्ताक ८४ (१८.१ षटके) |
मिर्झा अहसान ५२* (२२) अली वकार १/१९ (४ षटके) | नवीद अहमद २१ (२६) जावीद सद्रान २/८ (२.१ षटके) |
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.
चेक प्रजासत्ताक १६१/७ (२० षटके) | वि | लक्झेंबर्ग १६५/४ (१८.४ षटके) |
साबावून दावीझी ४८ (३१) अतीफ कमल ३/२३ (४ षटके) | टिमोथी बेकर ४७ (३०) पॉल टेलर २/२९ (३ षटके) |
- नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.
ऑस्ट्रिया १७९/५ (२० षटके) | वि | लक्झेंबर्ग १८०/५ (१९.४ षटके) |
रझमल शिगीवाल ७० (४९) विक्रम विझ ३/३० (४ षटके) | जूस्ट मेस ४२ (३१) बिलाल झलमाई १/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.
चेक प्रजासत्ताक १५६/४ (१७ षटके) | वि | ऑस्ट्रिया १६१/६ (१६.२ षटके) |
साबावून दावीझी ५७ (३६) बिलाल झलमाई २/२६ (४ षटके) | मार्क सिम्पसन-पार्कर ६५* (३६) साबावून दावीझी २/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, फलंदाजी.
- पावसामुळे ऑस्ट्रियाला १७ षटकात १५९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- इम्रान आसिफ आणि उमेर तारिक (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.