२०२१-२२ व्हॅलेटा चषक
ऑक्टोबर २०२१ मध्ये माल्टा, बल्गेरिया, जिब्राल्टर आणि स्वित्झर्लंड या चार देशांच्या क्रिकेट संघांनी माल्टामध्येच काही क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला. स्पर्धेनंतर माल्टा आणि जिब्राल्टर संघांमध्ये २ सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील खेळविण्यात आली.
वॅल्लेट्टा चषक
२०२१-२२ वॅल्लेट्टा चषक | |||
---|---|---|---|
तारीख | २१ – २४ ऑक्टोबर २०२१ | ||
व्यवस्थापक | माल्टा क्रिकेट असोसिएशन | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | माल्टा | ||
विजेते | स्वित्झर्लंड | ||
सहभाग | ४ | ||
सामने | ८ | ||
सर्वात जास्त धावा | लुईस ब्रुस (२२२) | ||
सर्वात जास्त बळी | अश्विन विनोद (९) | ||
|
२०२१-२२ वॅल्लेटा चषक ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २१-२४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान माल्टामध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने मार्सा मधील मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळविण्यात आले. यजमान माल्टासह बल्गेरिया, जिब्राल्टर आणि स्वित्झर्लंड या चार देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. स्वित्झर्लंडने आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.
स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघाने विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. गुणतालिकेत अव्वल दोन संघ अंतिम सामन्यास पात्र ठरले तर तिसरे स्थान निश्चित करण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असणाऱ्या संघादरम्यान सामना खेळविण्यात आला.
गुणफलक
संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
स्वित्झर्लंड | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | +३.६०७ | अंतिम सामन्यात बढती |
माल्टा | ३ | २ | १ | ० | १ | ४ | +१.३७९ | |
जिब्राल्टर | ३ | १ | २ | ० | ० | २ | -१.२७४ | |
बल्गेरिया | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -३.६६२ |
गट फेरी
माल्टा २१३/५ (२० षटके) | वि | जिब्राल्टर १५२/२ (२० षटके) |
हेनरिक गेरिके ६४ (२५) बालाजी पै २/२८ (४ षटके) | लुईस ब्रुस ५७* (५५) बिलाल मुहम्मद १/२४ (४ षटके) |
- नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.
- जिब्राल्टरने माल्टामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- आफताब आलम खान, कल्की कुमार (मा), फिलिप रेक्स आणि अँड्रु रेयेस (जि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
जिब्राल्टर १३३/९ (२० षटके) | वि | स्वित्झर्लंड १३४/१ (१४.४ षटके) |
लुईस ब्रुस ३१ (२७) एडन अँड्रु ३/२१ (४ षटके) | ओसामा महमूद ५८* (४६) चार्ल्स हॅरिसन १/१९ (२ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टर, फलंदाजी.
- स्वित्झर्लंडचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्वित्झर्लंड आणि जिब्राल्टर यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
- स्वित्झर्लंडने माल्टामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- स्वित्झर्लंडचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय तसेच जिब्राल्टरवर मिळवलेला देखील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- नूरखान अहमदी, एडन अँड्रु, स्टेफान फ्रँकलिन, निकोलस हेंडरसन, असद महमूद, ओसामा महमूद, अन्सर महमूद, अली नय्यर, इद्रीस उल हक, अर्जुन विनोद आणि अश्विन विनोद (स्वि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
बल्गेरिया ८१ (१९.३ षटके) | वि | स्वित्झर्लंड ८२/२ (६ षटके) |
जॅकब अल्बीन १९* (३०) अनीश कुमार ३/३ (२.३ षटके) | अर्जुन विनोद ४३* (२०) डेल्रीक वर्घिस १/२१ (१ षटक) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.
- स्वित्झर्लंड आणि बल्गेरिया यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
- बल्गेरियाने माल्टामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- स्वित्झर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बल्गेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अहसान खान, अँड्रे लिलोव (ब) आणि अनीश कुमार (स्वि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
जिब्राल्टर २१७/४ (२० षटके) | वि | बल्गेरिया १८०/५ (२० षटके) |
बालाजी पै १०७* (५२) सुलैमान अली २/३८ (४ षटके) | ह्रिस्तो लाकोव ८० (६३) जेम्स फिट्झगेराल्ड २/३७ (४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
- जिब्राल्टर आणि बल्गेरिया यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- जिब्राल्टरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- जिब्राल्टरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बल्गेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- डेव्ह रॉबसन (जि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
स्वित्झर्लंड १५०/९ (२० षटके) | वि | माल्टा १४२/९ (२० षटके) |
असद महमूद ३३ (२५) बिक्रम अरोरा ३/२० (४ षटके) | बिलाल मुहम्मद ३५* (१७) अश्विन विनोद ३/३० (४ षटके) |
- नाणेफेक : स्वित्झर्लंड, फलंदाजी.
- माल्टा आणि स्वित्झर्लंड यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
- स्वित्झर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात माल्टावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मॅथ्यू मार्टिन (स्वि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
बल्गेरिया १५०/६ (२० षटके) | वि | माल्टा १५३/४ (१७ षटके) |
ओमर रसूल ६३* (३६) वरूण थामोथरम २/३० (४ षटके) | बसिल जॉर्ज ४१ (२७) सुलैमान अली २/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.
- झोहेब मलेक आणि डियॉन वूस्लो (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
तिसऱ्या स्थानाकरता सामना
जिब्राल्टर १७७/९ (२० षटके) | वि | बल्गेरिया १७८/४ (२० षटके) |
बालाजी पै ७१ (३७) प्रकाश मिश्रा ३/२२ (४ षटके) | अरविंद डि सिल्व्हा ६२ (४०) चार्ल्स हॅरिसन २/३१ (४ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टर, फलंदाजी.
- बल्गेरियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जिब्राल्टरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
अंतिम सामना
माल्टा १७६/७ (२० षटके) | वि | स्वित्झर्लंड १७०/८ (२० षटके) |
बिक्रम अरोरा ४२ (३९) अनीश कुमार २/२६ (४ षटके) | इद्रीस उल हक ४२ (२३) वरूण थामोथरम ३/२५ (४ षटके) |
- नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.
- माल्टाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात स्वित्झर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
माल्टा वि जिब्राल्टर द्विपक्षीय मालिका
वॅल्लेट्टा चषकानंतर यजमान माल्टाने जिब्राल्टरसोबत दोन ट्वेंटी२० सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळली. दोन्ही सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यत आला. पहिला सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला तर दुसऱ्या सामन्यात डकवर्थ-लुईस पद्धत वापरावी लागली आणि सामना बरोबरीत सुटला.
१ला सामना
२रा सामना
माल्टा १४५ (१९ षटके) | वि | जिब्राल्टर ५७/२ (७.२ षटके) |
वरुण थामोथरम ५० (२७) लुईस ब्रुस ४/१३ (३ षटके) | किरॉन फेरे ३५* (२५) वसिम अब्बास १/१५ (२ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टर, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे जिब्राल्टरला ७.२ षटकांमध्ये ५८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- जोजो थॉमस (मा) आणि किरॉन फेरे (जि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.