२०२० उन्हाळी ऑलिंपिक
२०२० उन्हाळी ऑलिंपिक XXXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | टोकियो जपान |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै २४ |
सांगता | ऑगस्ट ९ |
मैदान | नॅशनल स्टेडियम |
◄◄ २०१६ २०२४ ►► |
२०२० उन्हाळी ऑलिंपिक (जपानी: 2020年夏季オリンピック) ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३२वी आवृत्ती पूर्व आशिया खंडातील जपान देशामधील तोक्यो ह्या शहरामध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० मध्ये खेळवण्यात येणार होती. २०२० च्या सुरुवातीस जगभर पसरलेल्या कोव्हिड-१९ रोगाच्या साथीमुळे ही स्पर्धा २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच तोक्यो ऑलिंपिक स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा आता २३ जुलै-८ ऑगस्ट, २०२१ दरम्यान भरेल.
७ सप्टेंबर २०१३ रोजी आर्जेन्टिनाच्या ब्युनॉस आयर्स शहरात झालेल्या आयओसीच्या १२५व्या अधिवेशनादरम्यान तोक्योची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी इस्तंबूल व माद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती.
१९६४ सालानंतर तोक्योमध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा दुसऱ्यांदा खेळवल्या जातील. दोनदा हा मान मिळणारे तोक्यो हे आशिया खंडामधील पहिलेच शहर असेल.
तोक्यो ऑलिंपिकमध्ये प्रथमच तीन नवीन खेळ समाविष्ट करण्यात आले होते. त्यात थ्री बाय थ्री बास्केटबॉल, फ्रीस्टाइल बीएमएक्स आणि मॅडिसन सायकलिंग या खेळांचा समावेश होता.
यजमानपदाची प्रक्रिया
ऑलिंपिक यजमानपदाच्या शर्यतीत तोक्यो (जपान), इस्तंबुल (तुर्कस्तान) आणि माद्रिद (स्पेन) ही तीन शहरे होती. बाकू (अझरबैजान) आणि दोहा (कतार) या दोन शहरांना या शर्यतीत स्थान मिळाले नाही, तर रोमने यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओसी) 125 व्या आयओसी सत्राची बैठक 7 सप्टेंबर 2013 रोजी अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथील ब्युनॉस आयर्स हिल्टनमध्ये झाली. या बैठकीत 2020च्या ग्रीष्मकालीन ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदाची निवड करण्यात आली. ही निवड करताना मतदान यंत्रणा वापरण्यात आली. पहिल्या फेरीत तोक्योने सर्वाधिक ४२ मते मिळवली. मात्र, एकाही शहराला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. माद्रिद आणि इस्तंबुल दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे या दोन शहरांत पुन्हा मतदान घेण्यात आले. त्यात इस्तंबुलने ४९ मते मिळवत माद्रिदचा पराभव केला. त्यामुळे तोक्यो आणि इस्तंबुलमध्ये दुसऱ्या फेरीत मतदान झाले. त्यात तोक्योने ६० मते मिळवत इस्तंबुलचा (३६ मते) पराभूत केले. तोक्योने अपेक्षित बहुमत मिळविल्याने तेच ऑलिंपिकचे यजमान ठरले. अर्थात, हा आनंद कोरोना विषाणू संसर्गामुळे धुळीस मिळाला. जगभरातील क्रीडा स्पर्धा या महामारीमुळे कचाट्यात सापडल्या. त्यामुळे तोक्यो ऑलिंपिक स्पर्धेला एक वर्षासाठी स्थगित करण्यात आले.
खेळ
या ऑलिंपिकमध्ये ३३ प्रकारच्या खेळांमध्ये ३३९ स्पर्धा असतील. यांत ५ नवीन खेळांचा समावेश आहे.
खेळ आणि स्पर्धा
2020 Summer Olympic Sports Programme |
---|
|
भाग घेणारे देश
या ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देश आणि परागंदा लोकांचा १ संघ असे २०६ संघ भाग घेतील.
सहभागी देश |
---|
|
हे सुद्धा पहा
- २०२० उन्हाळी पॅरालिंपिक्स
- जपानमधील ऑलिंपिक खेळ
- १९६४ उन्हाळी ऑलिंपिक - तोक्यो
- १९७२ हिवाळी ऑलिंपिक - सप्पोरो
- १९९८ हिवाळी ऑलिंपिक - नागानो
संदर्भ आणि नोंदी
- आयओसीच्या संकेतस्थळावर
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-08-15 at the Wayback Machine.
बाह्य दुवे
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.