२०१७ प्रभादेवी रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी
मुंबईतील चेंगराचेंगरी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | अपघात, चेंगराचेंगरी | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | चेंगराचेंगरी | ||
स्थान | प्रभादेवी रेल्वे स्थानक, मुंबई शहर जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
तारीख | सप्टेंबर २९, इ.स. २०१७ | ||
मृत्युंची संख्या |
| ||
जखमींची संख्या |
| ||
| |||
२९ सप्टेंबर, २०१७ रोजी मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकात (पूर्वीचे एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानक) चेंगराचेंगरी झाली. [१] परळ रेल्वे स्थानक आणि प्रभादेवी उपनगरी रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये किमान २३ जण ठार, तर ३९ जण जखमी झाले.[२]
घटना
२९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांमध्ये एकाच वेळी चार उपनगरी गाड्या आल्या.[३][४] प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या[५][६] अरुंद पादचारी पुलावर अनेक लोक एकाच वेळी चढले.[७][८] या वेळी पाऊस पडत होता. या सुमारास कोणी तरी व्यक्ती घसरून पडल्यावर ही चेंगराचेंगरी झाली असावी.[९]
पूल पडत आहे अशी अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी अधिक गर्दी करीत पळ काढण्याचा प्रयत्न केला.[१०] एका साक्षीदारानुसार पोलीस आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद न दिल्यामुळे परिस्थिती चिघळली.
या चेंगराचेंगरीत किमान २३ लोक मरण पावले[११] आणि ३९ जण जखमी झाले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक लोकांचे मृत्यू गुदमरून आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे झाला.[१२]
पोलीस तपास
"आम्ही जवळपास निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. या चेंगराचेंगरीचं मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि अचानक वाढलेली गर्दी आहे. एकाचवेळी चार लोकल स्टेशन परिसरात आल्या. त्या लोकलमधून प्रवासी आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली." असे दादर पोलिसांनी सांगीतले.[१३] दादर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (ADR) नोंद झाली आहे.
अपघातांचे बळी
अपघातात मरण पावलेल्या लोकांची यादी[१४]
नाव | वय | लिंग | निवास |
---|---|---|---|
हिलोनी देढिया | २४ | महिला | घाटकोपर |
रोहित परब | ११ | पुरुष | विक्रोळी |
ॲलेक्स कॉरिया | ६१ | पुरुष | विरार |
अंकुश जयस्वाल | ३६ | पुरुष | दादर |
शुभा शेट्टी | ४५ | महिला | कांजूरमार्ग |
सुजाता अल्वा | ४५ | महिला | कांजूरमार्ग |
चांद्रबंग इंगळे | ५० | महिला | कांजूरमार्ग |
विजय बहादूर | ५० | पुरुष | घणसोली |
सुरेश जैस्वाल | ५० | पुरुष | अंधेरी |
ज्योतिबा चव्हाण | २९ | पुरुष | मुंब्रा |
टेरेसा फर्नांडिस | ३९ | महिला | दादर |
मुस्तक रियन | ४५ | पुरुष | मुंब्रा |
मुकेश मिश्रा | २२ | पुरुष | शीव |
मीना वाल्हेकर | ३५ | महिला | उल्हासनगर |
शारदा वरपे | २५ | महिला | कल्याण |
मयुरेश हळदणकर | २० | पुरुष | वरळी |
प्रियांका पासलकर | २३ | महिला | कुर्ला |
मसूद शेख | ३५ | पुरुष | गोवंडी |
संदर्भ
- ^ "22 Dead, Many Injured In Stampede Near Mumbai's Elphinstone Station". NDTV. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Elphinstone Road station stampede: 22 dead, 39 hurt; government announces compensation, orders probe - Times of India". The Times of India. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "22 Dead, Many Injured In Stampede Near Mumbai's Elphinstone Station". NDTV. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Stampede in Mumbai kills at least 22". IN (इंग्रजी भाषेत). 2017-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Stampede at Mumbai Railway Station Kills at Least 22" (इंग्रजी भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Mumbai stampede kills 23, injures 39 at train station". CNN. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Mumbai railway station stampede kills 22". BBC News. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Mumbai railway station stampede kills at least 22". The Guardian (इंग्रजी भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Mumbai stampede: 22 killed, over 39 injured". The Hans India (इंग्रजी भाषेत).
- ^ "Mumbai station stampede kills at least 22 amid rumour bridge was collapsing". The Telegraph. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Elphinstone stampede: death toll climbs to 23". The Hindu (इंग्रजी भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Crushed: What happened at Mumbai's Elphinstone Road railway station". The Hindu (इंग्रजी भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: पोलिसांनी कारण शोधलं, निष्कर्ष काढला!". 2018-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ^ "'Victims of murder, not an accident'". Mumbai Mirror. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.