Jump to content

२०१६ सियाचीन हिमनदी हिमस्खलन

दिनांक ३ फेबुवारी २०१६ला भारतीय सेनेच्या तळावर मोठ्या प्रमाणात हिमावसरण (इं-avalanche) झाले. हे स्थान सियाचीन ग्लेशियरच्या उत्तरी भागात आहे. यात भारतीय सेनेचे १० जवान त्या कोसळलेल्या बर्फाच्या एका मोठ्या थराखाली खोलवर दबल्या गेले.[]


सुटका अभियान

या दबलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेनेने एक अभियान राबविले. भारतीय सेनेच्या मद्रास रेजिमेंटच्या १९व्या फलटणीतील लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड हे या हिमावसरणाखाली ६ दिवसानंतर जीवंत सापडले. त्यांची ३५ फूट (११ मी) फूट खोल बर्फाच्या आवरणाखालून सुटका करण्यात आली तेंव्हा ते जीवंत होते.त्यावेळेस तेथील तापमान हे उणे४५°सें. इतके होते. ते सहा दिवस बर्फात अडकले होते. ही घटना समुद्रसपाटीपासून सुमारे १९,६०० फूट (६,००० मी) इतक्या उंचीवर घडली. यात इतर ९ जवानांचा मृत्यु झाला.

यानंतर हनुमंतप्पा यांचा दिल्लीच्या सैनिकी इस्पितळात उपचारादरम्यान, बर्फाघातामुळे त्यांचे अवयवांचे निकामी होण्याने, दि. ११ फेब्रुवारी २०१६ला, ११.४५ वाजता मृत्यु झाला.[]


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ हिमस्खलनाने १० सैन्यदलाचे जवान गाडल्या गेलेत (इंग्रजी मजकूर) Avalanche buries 10 Army personnel in Siachen (इंग्रजी मजकूर) Check |दुवा= value (सहाय्य). २७/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांचे देहावसान (इंग्रजी मजकूर) Siachen braveheart Lance Naik Hanamanthappa Koppad passes away, nation pays tribute; last rites today (इंग्रजी मजकूर) Check |दुवा= value (सहाय्य). २७/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)