Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील तिरंदाजी

तिरंदाजी
ऑलिंपिक खेळ
चित्र बघण्यास येथे टिचका
स्थळसांबाड्रोम मार्क्युज द सप्युकाय
दिनांक६-१२ ऑगस्ट
सहभागी१२८
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
तिरंदाजी

एकेरी   पुरुष  महिला
सांघिक   पुरुष  महिला

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक मधील तिरंदाजी रियो दि जानेरो येथे ६ ते १२ ऑगस्ट ह्या सात दिवसात पार पडेल. खेळाचे एकूण चार प्रकार होतील, ते सर्व सांबाड्रोम मार्क्युज द सप्युकाय येथे खेळविले जातील.

स्पर्धा स्वरूप

चार क्रीडा प्रकारांमध्ये १२८ तिरंदाज भाग घेतील: पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष संघ आणि महिला संघ.[]

विश्व तिरंदाजी मान्यता असलेल्या ७०-मीटर अंतर आणि नियमांनुसार होणारे, सर्व क्रीडा प्रकार हे रिकर्व्ह तिरंदाजी प्रकार असतील. प्रत्येकी ६४ पुरुष आणि महिला तिरंदाजांचा समावेश असलेली स्पर्धा क्रमवारी फेरीने सुरू होईल. १-६४ मधील क्रमांकासाठी प्रत्येक तिरंदाजाला एकूण ७२ बाण सोडावे लागतील.

संघातील प्रत्येक तिरंदाजाच्या वैयक्तिक गुणांची बेरीज करून, १ ते १२ संघांच्या क्रमांकासाठी सुद्धा क्रमवारी फेरी होईल.

एकेरी

एकेरी प्रकारात, सर्व ६४ तिरंदाज सर्वप्रथम ६४ जणांच्या पहिल्या फेरीत उतरतील. क्रमवारी फेरीतील क्रमांकानुसार ड्रॉ काढण्यात येईल, ज्यामध्ये १ल्या क्रमांकाचा तिरंदाज पहिल्या फेरीत ६४व्या क्रमांकाच्या तिरंदाजाविरूद्ध लढत देईल.

प्रत्येक सामन्यात तिरंदाजी ऑलिंपिक फेरीच्या पद्धतीनुसार गुण दिले जातील, ज्यामध्ये प्रत्येकी तीन बाणांचा एक संच आणि अशा ५ संचांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विजेता घोषित केला जाईल. प्रत्येक संचातील विजयासाठी २ गुण दिले जातील आणि बरोबरी झाल्यास प्रत्येकी १ गुण दिला जाईल. ५ संचांच्या शेवटी जर गुण संख्या ५-५ अशी असेल तर, प्रत्येकी १ बाण मारून, ज्याचा बाण मध्यबिंदुच्या जास्तीत जास्त जवळ असेल त्या तिरंदाजाला विजयी घोषित करण्यात येईल.

सांघिक

सांघिक प्रकारांमध्ये क्रमवारी फेरीतील पहिले ४ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होतील. उर्वरित ५ ते १२ क्रमांकाचे संघ उपांत्यपूर्व फेरीच्या उरलेल्या ४ जागांसाठी मुकाबला करतील.

यावेळी पहिल्यांदाच, सांघिक प्रकारामध्ये सुद्धा एकेरीप्रमाणे तिरंदाजी ऑलिंपिक फेरी संच पद्धत वापरली जाईल.

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझिल वेळा आहेत. (यूटीसी−३).

दिवसदिनांकसुरुवातसमाप्तप्रकारटप्पा
दिवस ०शुक्रवार ५ ऑगस्ट २०१६पुरुष एकेरीक्रमवारी फेरी
महिला एकेरीक्रमवारी फेरी
दिवस १शनिवार शनिवार ६ ऑगस्ट २०१६९:००१७:४५पुरुष संघबाद/पदक फेरी
दिवस २रविवार ७ ऑगस्ट २०१६९:००१७:४५महिला संघबाद/पदक फेरी
दिवस ३सोमवार ८ ऑगस्ट २०१६९:००१७:४५पुरुष एकेरी१/३२ व १/१६ एलिमिनेशन
महिला एकेरी१/३२ व १/१६ एलिमिनेशन
दिवस ४मंगळवार ९ ऑगस्ट २०१६९:००१७:४५पुरुष एकेरी१/३२ व १/१६ एलिमिनेशन
महिला एकेरी१/३२ व १/१६ एलिमिनेशन
दिवस ५बुधवार १० ऑगस्ट २०१६९:००१८:५५पुरुष एकेरी१/३२ व १/१६ एलिमिनेशन
महिला एकेरी१/३२ व १/१६ एलिमिनेशन
दिवस ६गुरुवार ११ ऑगस्ट २०१६९:००१७:१०महिला एकेरी१/८ एलिमिनेशन/उपांत्यपूर्व/उपांत्य/पदक फेरी
दिवस ७शुक्रवारी १२ ऑगस्ट २०१६९:००१७:१०पुरुष एकेरी१/८ एलिमिनेशन/उपांत्यपूर्व/उपांत्य/पदक फेरी

पात्रता

प्रत्येक राष्ट्रीय ऑलिंपिक समितीला (एनओसी) ३ पुरुष आणि ३ महिला असे जास्तीत जास्त ६ स्पर्धक स्पर्धेत उतरवण्याची परवानगी होती. ज्या देशांचे संघ स्पर्धेसाठी पात्र होतील ते देश सांघिक प्रकारांसाठी ३ स्पर्धक पाठवू शकतात ज्यांना सांघिक आणि एकेरी अशा दोन्ही प्रकारांमध्ये सहभागी होता येणार होते. महिला आणि पुरुष दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी १२ संघाना स्थान मिळाले. ज्यामुळे सांघिक पात्रतेद्वारे प्रत्येकी ३६ स्पर्धक पात्र ठरले. इतर सर्व देशांना एकेरी प्रकारासाठी पात्र झाल्यास प्रत्येकी जास्तीत जास्त २ जागा (प्रत्येकी १ पुरुष आणि महिला गटासाठी) देण्यात आल्या.[]

यजमान ब्राझीलसाठी सहा जागा राखीव ठेवण्यात आल्या आणि तिहेरी आयोगाने आणखी सहा जागांचा निर्णय घेतला. उर्वरित ११६ जागा पात्रता प्रक्रियेद्वारे वाटण्यात आल्या, ज्यानुसार तिरंदाज स्वतःसाठी नाही तर आपल्या देशासाठी जागा मिळवू शकले.

एनओसीला जागा मिळाल्यानंतर तिरंदाजाला ऑलिंपिक खेळात पात्र होण्यासाठी किमान खालील निकष पार करणे गरजेचे होते:

  • पुरुष: ७०मी फेरीत ६३०
  • महिला: ७०मी फेरीत ६००

सदर निकष हे २६ जुलै २०१५ (विश्व तिरंदाजी चँपियनशीप २०१५, पासून) ते ११ जुलै २०१६ पर्यंतच्या नोंदणीकृत विश्व तिरंदाजी स्पर्धामध्ये पार करणे गरजेचे होते.

सहभागी देश

एकूण ५६ देशांचे तिरंदाज २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले.

  • ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया (४)
  • ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया (१)
  • अझरबैजान अझरबैजान (१)
  • बांगलादेश बांगलादेश (१)
  • बेलारूस बेलारूस (१)
  • बेल्जियम बेल्जियम (१)
  • भूतान भूतान (१)
  • ब्राझील ब्राझील (६)
  • कॅनडा कॅनडा (२)
  • चिली चिली (१)
  • चीन चीन (६)
  • कोलंबिया कोलंबिया (४)
  • क्युबा क्युबा (१)
  • डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक (१)
  • इजिप्त इजिप्त (२)
  • एस्टोनिया एस्टोनिया (१)
  • फिजी फिजी (१)
  • फिनलंड फिनलंड (२)
  • फ्रान्स फ्रान्स (३)
  • जॉर्जिया जॉर्जिया (३)
  • जर्मनी जर्मनी (२)
  • ग्रीस ग्रीस (१)
  • युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम (२)
  • भारत भारत (४)
  • इंडोनेशिया इंडोनेशिया (४)
  • इराण इराण (१)
  • इटली इटली (६)
  • कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर (१)
  • जपान जपान (४)
  • कझाकस्तान कझाकस्तान (२)
  • केन्या केन्या (१)
  • लीबिया लीबिया (१)
  • मलावी मलावी (१)
  • मलेशिया मलेशिया (३)
  • मेक्सिको मेक्सिको (४)
  • मोल्दोव्हा मोल्दोव्हा (१)
  • मंगोलिया मंगोलिया (१)
  • म्यानमार म्यानमार (१)
  • नेपाळ नेपाळ (१)
  • नेदरलँड्स नेदरलँड्स (३)
  • उत्तर कोरिया उत्तर कोरिया (१)
  • नॉर्वे नॉर्वे (१)
  • पोलंड पोलंड (१)
  • रशिया रशिया (३)
  • स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया (२)
  • दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया (६)
  • स्पेन स्पेन (४)
  • स्वीडन स्वीडन (१)
  • चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ (६)
  • थायलंड थायलंड (१)
  • टोंगा टोंगा (२)
  • तुर्कस्तान तुर्कस्तान (२)
  • युक्रेन युक्रेन (४)
  • अमेरिका अमेरिका (४)
  • व्हेनेझुएला व्हेनेझुएला (२)
  • झिम्बाब्वे झिम्बाब्वे (१)

पदक सारांश

पदक तालिका

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
अमेरिका अमेरिका
जर्मनी जर्मनी
फ्रान्स फ्रान्स
रशिया रशिया
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ
Total१२

पदक विजेते

प्रकारसुवर्णरौप्यकांस्य
पुरुष एकेरी
माहिती
दक्षिण कोरिया कु बॉन-चान
दक्षिण कोरिया (दक्षिण कोरिया)
फ्रान्स जीन-चार्ल्स वाल्लाडोन्ट
फ्रान्स (फ्रान्स)
अमेरिका ब्रॅडी एलिसन
अमेरिका (अमेरिका)
पुरुष संघ
माहिती
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
कु बॉन-चान
ली सेउंग-युन
किम वू-जिन
अमेरिका अमेरिका
ब्रॅडी एलिसन
झाक गॅरेट
जाक कमिन्स्की
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
ॲलेक पॉट्स
रायन त्याक
टेलर वर्थ
महिला एकेरी
माहिती
दक्षिण कोरिया चँग ह्ये-जिन
दक्षिण कोरिया (दक्षिण कोरिया)
जर्मनी लिजा उन्रुह
जर्मनी (जर्मनी)
दक्षिण कोरिया कि बो-बाए
दक्षिण कोरिया (दक्षिण कोरिया)
महिला संघ
माहिती
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
चँग ह्ये-जिन
चोई मी-सुन
कि बो-बाए
रशिया रशिया
तुयाना दाशीदोर्झीएव्हा
क्सेनिया पेरोव्हा
इना स्टेपानोव्हा
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ
ल चिएन-यिंग
लिन शिह-चिआ
तान या-टिंग

संदर्भ

  1. ^ "Archery" (इंग्रजी भाषेत). 2014-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "तिरंदाजी पात्रता" (PDF). ११ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.