Jump to content

२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा

२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा
२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेचे मुख्य मैदान
यजमान शहरपुणे, भारत भारत
दिनांक २२-२९ जुलै
मुख्य मैदान शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी
सहभागी देश ४३
सहभागी खेळाडू ५७८
खेळ प्रकार ४२
← २०११ कोबे
२०१५ →


२० वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा पुणे, भारत येथे ३-७ जुलै दरम्यान आयोजित केली गेली[].

चेन्नईने यजमानपद नाकारल्यानंतर दिल्लीनेआणि झारखंडनेही या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले नाही. परंतु महाराष्ट्राने १२ जून २०१३ या दिवशी स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने या स्पर्धेसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे[]

२०व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना यावर्षी ऑगस्टमध्ये मॉस्को येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल.

लेझीम, पोवाडा, लावणी आदी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे प्रतिबिंब असलेल्या उद्घाटन सोहळ्याने पुण्यात मंगळवारी २०व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेस प्रारंभ होणार झाला. स्पर्धेचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी पुणे-बालेवाडी येथील शिव छत्रपती स्टेडियमवर केले. उद्‌घाटन प्रसंगी ४३ देशांच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ८००० पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते.

शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या उद्‍घाटन समारंभात महाराष्ट्राच्या विविध कलासंस्कृतीची ओळख परदेशी खेळाडूंना करून दिली गेली. साधारणपणे एक तास चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम, पोवाडा, लावणी, कोळीनृत्य, आसामचे बिहू नृत्य, कथकली, मुजरा नृत्य, बॉलिवूडचे नृत्य आदींचा समावेश होता. त्याखेरीज मलखांब, योगासने, दांडपट्टा याचीही प्रात्यक्षिके सादर केली गेली. लेट्स प्ले स्पोर्ट्‌स मॅनेजमेंटकडे या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कार्यक्रमात मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्‍नागिरी आदी ठिकाणची साडेतीनशे मुले-मुली सहभागी झाली.

पदकतालिका

देश

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
चीन चीन१६२७
बहरैन बहरीन१५
जपान जपान१०२०
सौदी अरेबिया सौदी अरेबिया
उझबेकिस्तान उझबेकिस्तान
भारत भारत१७
कझाकस्तान कझाकस्तान
संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
कतार कतार
१०थायलंड थायलंड
११हाँग काँग हाँग काँग
११ताजिकिस्तान ताजिकिस्तान
१३इराण इराण
१४श्रीलंका श्रीलंका
१५कुवेत कुवेत
१६चिनी ताइपेइ चीनी तैपेई
१७दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
१८ओमान ओमान
१८लेबेनॉन लेबेनॉन
१८उत्तर कोरिया उत्तर कोरिया
एकूण४२४३४११२६

पुरूष

खेळ प्रकारसुवर्णरौप्यकांस्य
१०० मीटर
 सु बिंगतीआन१०.१७  सॅम्युएल फ्रान्सिस१०.२७  बरकत अल्-हारथी१०.३०
२०० मीटर
 शी झ्हेन्ये२०.८७  फहाद मोहम्मद अल सुबेई२०.९२  केई टकासे२०.९२
४०० मीटर
 युसेफ मसराही४५.०८  अलि खामिस४५.६५  युझो कानेमारू४५.९५
८०० मीटर
 मुसेब अब्दुलरहमान बल्ला१:४६.९२  अब्दुलअझीझ लादान१:४७.०१  बिलाल मन्सूर अली१:४८.५६
१५०० मीटर
 इमाद हमीद नूर३२:१७.२९  मोहमद अल्गारणी३२:३९.३९  बिलाल मन्सूर अली३२:४७.४४
५००० मीटर
 देजेने रेगास्सा मुतोमा१३:५३.२५  आलेमू बेकेले गेब्रे१३:५७:२३  इमाद नूर१४:०५.८८
१०,००० मीटर  अलेमु बेकेले गेब्रे२८:४७.२६  बिलीसुमा शुगिगेलास२८:५८.६७  रतिराम सैनी२९:३५.४२
११० मीटर अडथळा शर्यत
 जिआंग फां१३.६१  अब्दुलअझीझ अल मंदील१३.७८  वटारू याझावा१३.७८
४०० मीटर अडथळा शर्यत
 यासुहीरो फुएकी४९.८६  चेंग वेन५०.०७  सतिंदर सिंग५०.३५
३००० मीटर स्टीपलचेस
 तारेक मुबारक ताहेर८:३४.७७  देजेने रेगास्सा मुतोमा८:३७.४०  त्सुयोशी ताकेदा८:४८.४८
४ × १०० मीटर रिले
हाँग काँग हाँग काँग
टँग यिक चून
लाई चून हो
नग का फुंग
त्सुईची हो
३८.९४ जपान जपान
काझुमा ओसेटो
केई टाकासे
सोटा कावात्सुरा
युईची कोबायाशी
३९.११ चीन चीन
गुओ फान
Xie झ्हेन्ये
सु बिंगतीआन
चेन किआंग
३९.१७
४ × ४०० मीटर रिले
सौदी अरेबियासौदी अरेबिया
मोहम्मद अली अल-बिशी
फह्हाद मोहम्मद अल सुबई
मोहम्मद अल साल्ही
युसुफ मसराही
३:०२.५३
CR
जपानजपान
युसुके इशीत्सुका
युझो कानेमारू
काझुया वातानाबे
हिदेयुकी हिरोसे
३:०४.४६ श्रीलंकाश्रीलंका
चनाका दुलन प्रियाशंथा
दिलन अलोका
कासुन सेनेविरात्ने
अंजना मदुशान
३:०४.९२
उंच उडी
 बी ईआओलीआंग२.२१ मी  जीथीन थॉमस
 केय्वान घनबरझादेह
२.२१ मी दिले गेले नाही
पोल वॉल्ट
 झुए चांग्रुइ५.६० मी  लु याओ५.२० मी  जीन मीन-सब५.२० मी
लांब उडी
 वँग जीअनन७.९५ मी  प्रेम कुमार कुमारावेल७.९२ मी  टँग गाँगचेन७.८९ मी
तिहेरी उडी
 काओ शुओ१६.७७ मी  रनजीथ माहेश्वरी१६.७६ मी  अरपिंदर सिंग१६.५८ मी
गोळा फेक
 सुलतान अब्दुलमजीद, अलहेब१९.६८ मी  चँग मींग-हुआंग१९.६१ मी  ओम प्रकाश सिंग१९.४५ मी
थाळी फेक  विकास गौडा६४.९० मी  मोहम्मद समीमी६१.९३ मी  अहमद मोहम्मद धीब६०.८२ मी
हातोडा फेक  दिलशोद नाझारोव्ह७८.३२ मी  अली अल झिंकावी७४.७० मी  की डकाई७४.१९ मी
भाला फेक  इव्हान झाय्सेव७९.७६ मी  साचीथ माधुरंगा७९.६२ मी  समरजीत सिंग७५.०३ मी
दशघटक  दमित्री कारपोव्ह८०३७ गुण  अकिहीको नाकामुरा७६२० गुण  लिओनिड आंद्रेयेव७३८३ गुण

महिला

खेळ प्रकारसुवर्णरौप्यकांस्य
१०० मीटर
 वुई याँगली११.२९  चिसातो फुकूशिमा११.५३  बरकत अल्-हारथी११.६३
२०० मीटर
 विक्टोरिया झ्याबकीना२३.६२  आशा रॉय२३.७१  दुती चंद२३.८२
४०० मीटर
 झाओ यानमीन५२.४९  पुवम्मा एम्. आर.५३.३७  ग्रेट्टा तस्लाकीआन५३.४३
८०० मीटर
 वांग चुन्यू२:०२.४७  गेन्झेब शुमी२:०४.१६  टिनू लुका२:०४.४८
१५०० मीटर
 बेतल्हेम देसालेग्न४:१३.६७  मिमी बेलेटे४:१४.०४  आयोको जीन्नौची४:१६.७३
५००० मीटर
 बेतल्हेम देसालेग्न१५:१२.८४CR NR शितये इशेते१५:२२.१७  तेजीतू दाबा१५:३८.६३
१०,००० मीटर  शितये इशेते३२:१७.२९  आलिया सईद३२:३९.३९  अयुमी हगिवारा३२:४७.४४
१०० मीटर अडथळा शर्यत
 अयाको किमुरा१३.२५  अनास्तासिया सोप्रुनोव१३.४४  हेमाश्री जे१४.०१
४०० मीटर अडथळा शर्यत
 सातोमी कुबोकुरा५६.८२  मनामी कीर५७.७८  जो एउन-जू५८.२१
३००० मीटर स्टीपलचेस
 रुथ जेबेत९:४०.८४ CR सुद्धा सिंग९:५६.२७  पाक कुम ह्यांग१०:०९.८०
४ × १०० मीटर रिले
चीन चीन
ताओ युजीया
ली मान्युआन
लीन हुईजून
वुई याँगली
४४.०१ जपान जपान
साओरि किताकाझे
चिसातो फुकूशिमा
मायुमी वातानाबे
ॲना फुजीमोरी
४४.३८ थायलंड थायलंड
Phatsorn Jaksuninkorn
Orranut Klomdee
Tassaporn Wannakit
Jintara Seangdee
४४.४४
४ × ४०० मीटर रिले
भारत भारत
निर्मला
टिनू लुका
अनु मरीअम जोस
पुवाम्मा राजू मचेत्तीरा
३:३२.२६ चीन चीन
चेन लीन
चेंग चाँग
गेंग क़िन्ग्यु
झावो यानमीन
३:३५.३१ जपान जपान
असामी चिबा
सायका आओकी
सातोमी कुबोकुरा
मनामी किरा
३:३५.७२
उंच उडी
 नादिया दुसानोव्हा१.९० मी  सुवेतलाना रादझिवील१.८८ मी  मरिना ऐतोव्हा१.८८ मी
पोल वॉल्ट
 ली लींग४.५४ मी CR रेन मेंगक्विआन४.४० मी  सुकन्या चोमचुएनदे४.१५ मी
लांब उडी
 सचिको मासुमी६.५५ मी  अनास्तेशिया जुरावलेवा६.३६ मी  मयुखा जॉनी६.३० मी
तिहेरी उडी
 ॲनास्तेशिया जुराव्लेव्हा१४.१८ मी  अलेक्झांड्रा कोत्यारोव्हा१३.८९ मी  इरिना लिटव्हीनेन्को एकटोव्हा१३.७५ मी
गोळा फेक
 लिऊ Xiangrong१८.६७ मी  लेयला राजबी१८.१८ मी  Gao यांग१७.७६ मी
थाळी फेक  सु Xinyue५५.८८ मी  जियांग फेंगजींग५५.७० मी  ली त्साई-यी५५.३२ मी
हातोडा फेक  वँग झेंग७२.७८ मी CR लिऊ टिंगटिंग६७.१६ मी  मासूमी आय६३.४१ मी
भाला फेक  ली लींगवेई६०.६५ मी CR नादिका लाक्मली६०.१६ मी NR रिसा मियाशिता५५.३० मी
सप्तघटक  वास्साना विनाथो५८१८ गुण  एकातेरिना वोरोनिना५५९९ गुण  ची किरीयामा५४५१ गुण
  1. ^ "Competition Calendar". 2013-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-04 रोजी पाहिले.
  2. ^ फक्त २१ दिवसांत महाराष्ट्राची जय्यत तयारी