Jump to content

२०१० क्युबा विमान दुर्घटना

२०१० क्युबा विमान दुर्घटना
सी.यु.-टी१५४९, क्रॅश केलेले विमान.
अपघात सारांश
तारीख नोव्हेंबर ४, २०१०
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ
21°44′39″N 79°28′16″W / 21.744194°N 79.470978°W / 21.744194; -79.470978
प्रवासी ६१
कर्मचारी
जखमी
मृत्यू ६८ (सगळे)
बचावले
विमान प्रकारए.टी.आर. ७२-२१२
वाहतूक कंपनी एरो कॅरिबियन
विमानाचा शेपूटक्रमांकसी.यु.-टी१५४९
पासून तूसैं लूव्हर्चर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पोर्ट औ प्रिन्स, हैती
शेवट होजे मार्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हवाना, क्युबा

एरो कॅरिबियन फ्लाइट ८८३ हे एरो कॅरिबीयन या विमानसेवेचे विमान नोव्हेंबर ४ इ.स. २०१० रोजी दुर्घटनाग्रस्त होउन त्यातील सर्व, ६१ प्रवासी व चालकदलाचे ७ सदस्य यांचा मृत्यू झाला. ही हैती येथील पोर्ट औ प्रिन्स ते सेंटियागो डि क्युबा मार्गे क्युबामधील हवाना येथे जाणारी नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा होती.उड्डाणादरम्यान एटीआर-७२-२१२ प्रकारचे हे विमान सेंट्रल क्युबन प्रॉव्हींस क्युबा मध्ये दुर्घटनाग्रस्त झाले.या विमानात असणारे सर्व,७ चालकदल सदस्यासहीत ६१ प्रवासी ठार झालेत.एटीआर-७२ या जातीच्या विमानांच्या अपघातापैकी हा सर्वात वाईट, तर आजवर क्युबामध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये तीसऱ्या क्रमाचा वाईट अपघात आहे.

विमान

सीयु-टी१५४९ म्हणुन नोंदविलेले एटीआर-७२ जातीचे हे विमान[] एरो कॅरिबियनमध्ये ऑक्टोबर २००६पासुन कार्यरत होते.[] हे विमान 'कॉन्टीनेन्टल एक्सप्रेस'या विमानकंपनीने १९९५मध्ये विकत घेतले होते. एरो कॅरिबीयन ही विमानसेवा कंपनी त्यास २००६ मध्ये विकत घेणारी त्याची तिसरी मालक होती.[२]. उत्पादकानुसार या विमानाने सुमारे २५,००० विमानोड्डाणतासात ३४,५०० उड्डाणे केली होती.[] एरो कॅरिबीयन क्युबाच्या सरकारच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे.[]

अपघात

हे विमान हैती येथील पोर्ट औ प्रिन्स[] येथुन निघाले. ते सेंटियागो डि क्युबा मार्गे क्युबामधील हवाना येथे जाण्यासाठी दुपारी सुमारे ४:५०ला (स्थानिक वेळ)(20:50-आंतरराष्ट्रीय वेळ).[]ला निघाले.'हरिकेन टॉमस' या नावाच्या वादळाच्या येण्याच्या संभाव्य सुचनेमुळे बंद करण्यापूर्वी,सेंटियागो डि क्युबा येथील विमानतळावरून निघणारे, त्यादिवशीचे ते शेवटचे विमान होते.[]

अपघातापूर्वी आणीबाणीचा संदेश देउन, हवानाच्या आग्नेय दिशेस,३३६ कि.मी.अंतरावर असणाऱ्या,ग्वासीमल या शहराजवळ,सुमारे ५:४२ला ते जमिनीवर धडकले.[] एका प्रत्यक्षदर्शीनुसार,या विमानाने दाट झाडी असलेल्या ठिकाणी खाली पडण्यापूर्वी,अनेक वेड्यावाकड्या हालचाली केल्यात.[] ग्वासीमल येथील आरोग्यसेवेस जखमींवर उपचारासाठी सतर्कतेची सुचना देण्यात आली होती, परंतु, मध्यरात्रीनंतर,अपघातात कोणीही वाचु न शकल्यामुळे, ती सुचना परत घेण्यात आली.[]एटीआर-७२ या जातीच्या विमानांच्या अपघातापैकी हा सर्वात वाईट, तर आजवर क्युबामध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये तीसऱ्या क्रमाचा वाईट अपघात आहे.[] सन १९८९ मध्ये, ३ सप्टेंबरला क्युबाना डि एव्हीयाशनच्या एका विमानापघातानंतर, १७१ व्यक्ति ठार झाल्या होत्या,[], व २७ मे १९७७ला आणखी एका अपघातात,६९ व्यक्ति दगावल्या होत्या.[].

शोधमोहिम व बचावकार्य

बचावदलास अपघातस्थळी पोचण्यास, मार्गातील दाट झाडी बुलडोझरने रातोरात साफ करावी लागली.अधिकाऱ्यांनी अपघातस्थळास गराडा घातला व वृत्तसंकलकांना तेथे जाण्यास मज्जाव केला.विमान कोसळण्याने व स्फोटामुळे पूर्णपणे नष्ट झाले होते व प्रवाश्यांचे देह वाईटरित्या जळले होते.अपघाताच्या अनेक तासानंतरही विमानाचे अवशेष जळत होते.[] सापडलेले मृतदेह हे क्युबाच्या न्यायवैद्यक संस्थेत ओळखण्यासाठी पाठविले जाणार आहेत.[]. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला, बचावदलाने फ्लाइट डाटा व कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर सापडविला.तो अन्वेषकांना सोपविण्यात आला.त्याने हे कळु शकेल कि,दोन टर्बो इंजिने असलेले हे विमान उड्डाणादरम्यान आकाशातुन कां कोसळले व ज्वालांच्या भक्षस्थानी पडले.[].

प्रवासी व चालकदल

या विमानातील चालकदल व प्रवासी वेगवेगळ्या देशांचे होते.

राष्ट्रीयत्व चालकदल प्रवासी एकूण
क्युबा क्युबा []३३[]४०
आर्जेन्टिना आर्जेंटिना - [१०]
मेक्सिको मेक्सिको - [११]
नेदरलँड्स डच - [१२]
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया - [१३]
जर्मनी जर्मनी - [१३]
फ्रान्स फ्रेंच - [१३]
इटली ईटली - [१३]
जपान जपान - []
स्पेन स्पेन - [१३]
व्हेनेझुएला व्हेनेझुएला - [१३]
एकूण६१ ६८

अन्वेषण

'इंस्टिट्युटो डि एरोनॉटिका सिव्हिल डि क्युबा' ही क्युबामधील विमान अपघातांचे अन्वेषण करणारी संस्था आहे.एटीआर विमान कंपनी व फ्रांसचे 'नागरी विमानन अपघात सुरक्षा चौकशी व पृथक्करण ब्युरो' हे सरकारी खाते यात मदत करेल.[१४][१५]

प्रतिक्रिया

  • आर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टिना फर्नांदेझ यांनी मृतांच्या नातेवाईकांना घेउन एक विमान पाठविले.[]
  • स्पेनचे पंतप्रधान होजे लुइस रॉद्रिगेझ झपातेरो यांनी आपल्या संवेदना कळविल्या.[]
  • दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झुमा यांनी क्युबा विमान अपघाताबद्दल आपल्या संवेदना कळविल्या.[१६]

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h i j "क्युबामध्ये ६८ प्रवासी असलेले विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे सांगीतले जाते.(इंग्लिश मजकूर)". 5 November 2010 रोजी पाहिले.
  2. ^ a b "अपघाताचे वर्णन (इंग्लिश मजकूर)". 2010-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2010 रोजी पाहिले. Unknown parameter |Publisher= ignored (|publisher= suggested) (सहाय्य)
  3. ^ फ्लाइट इंटरनॅशनल 27 March 2007
  4. ^ a b "प्रवासी विमान क्युबात कोसळले (इंग्लिश मजकूर)". 5 November 2010 रोजी पाहिले.
  5. ^ a b "६८ लोकांसह विमान क्युबात कोसळल्याचे सांगीतल्या जाते". 5 November 2010 रोजी पाहिले.
  6. ^ Hradecky, Simon. "अपघातःआणीबाणीचा संदेश देउन विमान क्युबात कोसळले". 5 November 2010 रोजी पाहिले.
  7. ^ "अपघात वर्णन (इंग्लिश मजकूर)". 2013-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2010 रोजी पाहिले.
  8. ^ "अपघात वर्णन (इंग्लिश मजकूर)". 2013-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2010 रोजी पाहिले.
  9. ^ "क्युबातील विमान अपघातात ६८ मृत्युमुखी (इंग्लिश मजकूर)". 6 November 2010 रोजी पाहिले.
  10. ^ "Accidente aéreo en Cuba: estiman que hay 9 argentinos entre los pasajeros" (स्पॅनिश मजकूर भाषेत). 2010-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "Пассажирами разбившегося на Кубе самолета были граждане 11 стран" (रशियन मजकूर भाषेत). 5 November 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ "3 Nederlanders dood bij crash Cuba" (डच मजकूर भाषेत). 5 November 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ a b c d e f "Relación de fallecidos en el accidente de la aeronave ATR-72-212" (स्पॅनिश मजकूर भाषेत). 5 November 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ "एटीआर विमान कंपनीचे एरो कॅरिबियन उड्डाण क्र.८८३ बद्दलचे निवेदन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 5 November 2010 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  15. ^ "उड्डाण क्र.८८३ ४ नोव्हेंबर २०१० एटीआर-७२-२१२ नोंदणी-सीयु-टी१५४९". 2011-07-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2010 रोजी पाहिले.
  16. ^ "[१] Archived 2011-07-16 at the Wayback Machine.." BuaNews. November 5, 2010. Retrieved on November 5, 2010.