Jump to content

२००८ उन्हाळी ऑलिंपिक उद्घाटन समारंभ

२००८ उन्हाळी ऑलिंपिक उद्घाटन समारंभ बीजिंग राष्ट्रीय मैदानावर ०८.०८.२००८ रोजी रात्री ८.०० (चिनी प्रमाणवेळ) वाजता झाला.[][][] चिनी संस्कृतीत ८ हा आकडा समृद्धी दर्शवतो. ही तारीख व वेळ निवडण्यामागे हे कारण होते[]

संचलनाचा अनुक्रम

उद्घाटन समारंभातील संचलनात रुढीनुसार ग्रीसचा संघ सर्वप्रथम असतो तर यजमान देशाचा संघ सगळ्यात शेवटी. त्यादरम्यान इतर सहभागी देश नावानुक्रमे संचलन करतात. बीजिंगमध्ये संचलनाचा अनुक्रम चिनी चित्रलिपीतील नावांप्रमाणे ठरवण्यात आला होता. देशाचे नाव लिहिण्यात किती रेघा काढाव्या लागतात त्यानुसार हा क्रम ठरला.[] त्यानुसार ऑस्ट्रेलिया (澳大利亚) २०३व्या क्रमांकावर होता कारण 澳 या अक्षरात १६ रेघा आहेत तर झांबिया (赞比亚) तील 赞 अक्षरासाठी १५ रेघा लागतात.[] चीनमध्ये सहसा अनुक्रम ठरवताना अक्षरांतील रेघांची संख्या हे प्रमाण मानण्यात येते.

संदर्भ

  1. ^ "Tickets Infomation - The official ticketing website of the BEIJING 2008 Olympic Games". 2008-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Beijing Confirms the Opening Ceremony Time for 2008 Olympics" Archived 2008-08-09 at the Wayback Machine., Travel China Guide. Retrieved on August 2, 2008
  3. ^ "Opening Ceremony plan released". 2008-08-08 रोजी पाहिले.
  4. ^ "The Number Eight And The Chinese". 2007-04-22 रोजी पाहिले.
  5. ^ "Opening Ceremony plan released - The Official Website of the Beijing 2008 Olympic Games".
  6. ^ "Olympics athletes march to be done to different drum", ABC Radio Australia, July 29, 2008