१९९० युरोप महिला क्रिकेट चषक
१९९० युरोप महिला क्रिकेट चषक | |||
---|---|---|---|
तारीख | १८ – २२ जुलै १९९० | ||
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५५ षटके) | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि अंतिम सामना | ||
यजमान | इंग्लंड | ||
विजेते | इंग्लंड (२ वेळा) | ||
सहभाग | ४ | ||
सामने | ७ | ||
सर्वात जास्त धावा | वेंडी वॉट्सन (२२९) | ||
सर्वात जास्त बळी | सुझॅन ब्रे (८) | ||
|
१९९० युरोप महिला क्रिकेट चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८-२२ जुलै १९९० दरम्यान इंग्लंडमध्ये आयोजित केली गेली होती. युरोपियन क्रिकेट संघटनेद्वारे सुरू केलेल्या युरोप महिला क्रिकेट चषक स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती होती. सर्व सामन्यांना हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता. यजमान इंग्लंडसह डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड्स या चार देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धा गट फेरी आणि अंतिम सामना या पद्धतीने खेळवलि गेली. सर्व संघांनी एकमेकांशी एक सामना खेळला. गुणफलकात इंग्लंड अव्वल राहत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. आयर्लंड महिलांनी दुसरे स्थान मिळवत इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळला. अंतिम सामन्यात इंग्लंड महिलांनी आयर्लंडवर ६५ धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा युरोप महिला क्रिकेट चषक जिंकला. इंग्लंडची वेंडी वॉट्सन ही सलग दुसऱ्यावर्षीसुद्धा स्पर्धेत सर्वाधिक २२९ धावा करत आघाडीची खेळाडू ठरली. तर आयर्लंडची सुझॅन ब्रे स्पर्धेत सर्वाधिक ८ गडी मिळवत आघाडीची गोलंदाज ठरली.
गुणफलक
संघ | खे | वि | प | ब | अ | र | गुण | रनरेट | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड | ३ | ३ | ० | ० | ० | ० | ६ | ४.३१२ | अंतिम सामन्यासाठी पात्र |
आयर्लंड | ३ | २ | १ | ० | ० | ० | ४ | ३.८२८ | |
नेदरलँड्स | ३ | १ | २ | ० | ० | ० | २ | २.५८८ | |
डेन्मार्क | ३ | ० | ३ | ० | ० | ० | ० | २.८४८ |
गट फेरी
१८ जुलै १९९० धावफलक |
नेदरलँड्स ५७ (३३ षटके) | वि | इंग्लंड ५८/२ (१९.५ षटके) |
आयरेन स्कोफ १४ (७०) कॅरोलाइन बार्स ३/१ (४ षटके) | कॅरॉल हॉज २५* (५७) इनग्रीड केइझर १/८ (४ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर नेदरलँड्सचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ॲलिसन एल्डर (इं) आणि पॉलिन टी बीस्ट (ने) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१८ जुलै १९९० धावफलक |
आयर्लंड २३४/४ (५५ षटके) | वि | डेन्मार्क १८५/८ (५५ षटके) |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर आयर्लंड आणि डेन्मार्कचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- हेदी जेन्सन, जेन जेन्सन, मेटे फ्रॉस्ट (डे) आणि जुडीथ हर्बीसन (आ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१९ जुलै १९९० धावफलक |
इंग्लंड २७०/५ (५४ षटके) | वि | डेन्मार्क ६४ (२४.३ षटके) |
जानी जॉनसन २० (३८) गिलियन स्मिथ ५/१५ (५.३ षटके) |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना. परंतु ५४ षटकांचा खेळवण्यात आला.
- लिंडा सोरेन्सन (डे) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१९ जुलै १९९० धावफलक |
आयर्लंड १९८/४ (५० षटके) | वि | नेदरलँड्स १७२/९ (५० षटके) |
स्टेल्ला ओवेन्स ८४* (८८) इनग्रीड केइझर २/२० (९ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना. परंतु ५० षटकांचा खेळवण्यात आला.
२० जुलै १९९० धावफलक |
नेदरलँड्स १२३/७ (५३ षटके) | वि | डेन्मार्क ८९ (३९.१ षटके) |
मेटे फ्रॉस्ट ३५ (८०) इनग्रीड केइझर ४/१४ (११ षटके) |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना. परंतु ५३ षटकांचा खेळवण्यात आला.
- नेदरलँड्स महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्कवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मेटे ग्रेगरसेन, हेदी किजर (डे) आणि जिस्का हॉवर्ड (ने) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२० जुलै १९९० धावफलक |
आयर्लंड १६९/९ (५२ षटके) | वि | इंग्लंड १७०/१ (४१.४ षटके) |
वेंडी वॉट्सन ९३* (१२३) |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना. परंतु ५३ षटकांचा खेळवण्यात आला.
- गिलियन मॅककॉल, सैब यंग आणि टेरी बेनेट (आ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
अंतिम सामना
२२ जुलै १९९० धावफलक |
इंग्लंड २२४/३ (५५ षटके) | वि | आयर्लंड १५९/८ (५५ षटके) |
मेरी-पॅट मूर ४४ (१२५) क्लेर टेलर २/७ (८ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.