Jump to content

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक
तारीख १० जानेवारी – ७ फेब्रुवारी १९८२
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमानन्यूझीलंड न्यू झीलंड
विजेतेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२ वेळा)
सहभाग
सामने ३१
सर्वात जास्त धावाइंग्लंड जॅन ब्रिटीन (३९१)
सर्वात जास्त बळीऑस्ट्रेलिया लीन फुल्स्टन (२३)
१९७८ (आधी)(नंतर) १९८८

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक (प्रायोजक नावानुसार १९८२ हॅनशेल विटा फ्रेश विश्वचषक) ही एक क्रिकेट स्पर्धा इसवी सन १९८२ मध्ये न्यू झीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा पाच वर्षांपूर्वी १९७८ मध्ये भारतात झाली होती. माजी विजेते ऑस्ट्रेलिया होते. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले.

या वेळेस स्पर्धा तिहेरी साखळी पद्धतीने खेळविली गेली. यजमान न्यू झीलंडसह भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय XI या पाच देशांनी भाग घेतला. आंतरराष्ट्रीय XI संघाने या आधी १९७३ च्या विश्वचषकात भाग घेतला होता. पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषकाचा निकाल हा अंतिम सामन्याद्वारे केला गेला.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.





सहभागी देश

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडयजमान, महिला संपूर्ण सदस्य १९७८गट फेरी (१९७३, १९७८)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामहिला संपूर्ण सदस्य १९७८विजेते (१९७८)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१९७८विजेते (१९७३)
भारतचा ध्वज भारत१९७८गट फेरी (१९७८)
आंतरराष्ट्रीय XIनिमंत्रित १९७३गट फेरी (१९७३)

मैदाने

एकूण १५ मैदाने वापरण्यात आली.

मैदान शहर सामने संख्या
इडन पार्क क्र.२ऑकलंड
कॉर्नवॉल पार्कऑकलंड
सेडन पार्कहॅमिल्टन
पुकेकुरा पार्कन्यू प्लायमाउथ
मॅकलीन पार्कनेपियर
फिट्सहर्बर्ट पार्कपामेस्टन नॉर्थ
कुक्स गार्डनवांगानुई
बेसिन रिझर्ववेलिंग्टन
हट रिक्रिएशन मैदानलोवर हट
लोगन पार्कड्युनेडिन
ट्राफ्लगार पार्कनेल्सन
क्राइस्ट कॉलेजक्राइस्टचर्च
कँटरबरी विद्यापीठ मैदानक्राइस्टचर्च
डडली पार्करंगीओरा
लॅंसेस्टर पार्कक्राइस्टचर्च१ (अंतिम सामना)

संघ

गुणफलक

संघ
खेविगुणरनरेटपात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१२११४६३.१२४अंतिम सामन्यासाठी पात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१२३२२.९८८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१२२६२.५३४स्पर्धेतून बाद
भारतचा ध्वज भारत१२१६२.२९६
आंतरराष्ट्रीय XI१२१२२.०३४

गट फेरी

सामन्यांच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या -


१० जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४७/९ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४७/८ (६० षटके)

१२ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
११२ (५२.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११४/६ (३६ षटके)

१२ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४४/६ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
६० (३४.४ षटके)

१४ जानेवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४३/३ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१११/८ (६० षटके)

१४ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
८० (५८.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३७ (३५ षटके)

१६ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१०९/७ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११०/२ (४१ षटके)

१७ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९५/८ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५१/९ (६० षटके)


१८ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७०/८ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७१/३ (५६.५ षटके)

२० जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६४ (५९ षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१०० (५८.४ षटके)

२० जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१७८/७ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३१ (५५.५ षटके)

२१ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७७/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
८० (५५.४ षटके)

२३ जानेवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
११९ (५९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२०/४ (५३.५ षटके)

२४ जानेवारी १९८२
धावफलक
आंतरराष्ट्रीय XI
१४५ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४९/१ (३५.४ षटके)

२४ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
७८ (५०.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८०/२ (५८.१ षटके)



२७ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६९ (५८.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७०/५ (५९.१ षटके)

२८ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७०/८ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०१ (५७.१ षटके)



३१ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
६१ (३७ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६३/० (२१.३ षटके)
इंग्लंड महिला १० गडी राखून विजयी
ट्राफ्लगार पार्क, नेल्सन

३१ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९९/७ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
११५/७ (६० षटके)

२ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६७/८ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६७ (६० षटके)

२ फेब्रुवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
४९ (३७.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५०/२ (२३.१ षटके)


४ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४२/४ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१२९/७ (६० षटके)

६ फेब्रुवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४७/७ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०६ (५८ षटके)


बाद फेरी

अंतिम सामना

क्राइस्टचर्चमधील लॅंसेस्टर पार्क येथे खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेचा एकमेव आणि अंतिम सामन्याला तीन हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. पुरुष आणि महिला दोन्ही विश्वचषकांमध्ये पंचगिरी करणारे डिकी बर्ड पहिले पंच ठरले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी डावाच्या शेवटच्या दहा षटकांपर्यंत हळू धावा केल्या. जॅन साउथगेटने सर्वाधिक ५३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीविरूद्ध फलंदाजी करताना तिला अडचण झाली. शेवटच्या दहा षटकांत इंग्लंडने अधिक विस्तृत खेळ केला आणि अखेर १५१ धावा बनविल्या, याचा अर्थ ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १५२ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा पाठलाग सुरू होताच ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावल्या. परंतु कॅरेन रीड आणि शॅरन ट्रेड्रिया यांच्या जोडीने ते स्थिर राहिले. नंतर जेन जॅकब्स आणि मारी कॉर्निशच्या जलद खेळीने ऑस्ट्रेलियाने सामना ३ गडी राखत जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.

७ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५१/५ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५२/७ (५९ षटके)