१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक ही एक क्रिकेट स्पर्धा इसवी सन १९७३ मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. क्रिकेट खेळामध्ये पुरुष अथवा महिला प्रकारात प्रथमच अशी बहुदेशीय स्पर्धा भरवली गेली. पुरुषांच्या विश्वचषकाआधी दोन वर्षे ही क्रिकेटमधील पहिली विश्वचषक स्पर्धा होती. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले. यजमान इंग्लंड संघाने पहिली वहिली स्पर्धा जिंकली. या विश्वचषकाचा जन्म एका प्रसिद्ध उद्योगपति सर जॅक हेवर्ड यांच्या संकल्पनेतून झाला. त्यांनीच या स्पर्धेच्या आयोजनासाठी ४०,००० युरो इतके भांडवल देऊ केले.
या विश्वचषकात एकूण ७ संघांनी सहभाग घेतला. १९७१ मध्ये दक्षिण आफ्रिकेवर वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कृत केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला या स्पर्धेत भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्यामुळे तत्कालिन ३ महिला कसोटी देश : यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड; आणि जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो ह्या देशांच्या महिला संघांना आमंत्रित करण्यात आले. तेव्हा अजून वेस्ट इंडीजचा महिला संघ अस्तित्वात नव्हता. आणखी दोन संघांनी यात भाग घेतला: आंतरराष्ट्रीय XI आणि इंग्लंडमधून २३ वर्षांखालील एक संघ यंग इंग्लंड. विश्वचषकात खेळवला गेलेला पहिला सामना हा जगातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. सर्व ७ संघांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
विश्वचषक स्पर्धेतील सामने हे फक्त साखळी पद्धतीत खेळवले गेले. इंग्लंड महिला एकूण खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये ५ जिंकत २० गुण घेऊन गुणफलकात अव्वल राहिल्याने पहिला वहिला महिला क्रिकेट विश्वचषक यजमान इंग्लंडने जिंकला. इंग्लंडच्या एनीड बेकवेल हीने स्पर्धेतील सर्वाधिक २६४ धावा बनविल्या तर यंग इंग्लंडच्या रोझलिंड हेग्स हिने सर्वाधिक १२ बळी घेतले.
सहभागी देश
देश/संघ | पात्रतेचा मार्ग | सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या | मागील सहभाग स्पर्धा | मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी |
---|
इंग्लंड | यजमान, महिला संपूर्ण सदस्य | पदार्पण | पदार्पण | पदार्पण |
ऑस्ट्रेलिया | महिला संपूर्ण सदस्य | पदार्पण | पदार्पण | पदार्पण |
न्यूझीलंड | पदार्पण | पदार्पण | पदार्पण |
त्रिनिदाद आणि टोबॅगो | आमंत्रित | पदार्पण | पदार्पण | पदार्पण |
जमैका | पदार्पण | पदार्पण | पदार्पण |
यंग इंग्लंड | पदार्पण | पदार्पण | पदार्पण |
आंतरराष्ट्रीय XI | पदार्पण | पदार्पण | पदार्पण |
मैदाने
इंग्लंडमधील मैदाने
वेल्समधील मैदाने
- लंडन मधील क्यू ग्रीन हे इंग्लंडमध्ये महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे पहिले मैदान ठरले.
- वेल्स मधील सेंट हेलेन्स हे वेल्समध्ये महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे पहिले मैदान ठरले.
संघ
गुणफलक
विजय | पराभव | सामना अणिर्नित |
- टीप: प्रत्येक साखळी सामन्याच्या शेवटी गुण दर्शविलेले आहेत.
- टीप: सामन्याची पाहिती पाहण्यासाठी साखळी सामन्यांच्या गुणांवर किंवा बाद फेरीच्या वि/प वर क्लिक करा.
|
गट फेरी
सामन्यांच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या -
| वि | न्यूझीलंड |
| | |
इंग्लंड २५८/१ (६० षटके) | वि | |
| | |
न्यूझीलंड १९७ (५९.५ षटके) | वि | |
| | |
न्यूझीलंड १३६/८ (६० षटके) | वि | |
| | |
| वि | न्यूझीलंड१०२ (५५.३ षटके) |
| | |
इंग्लंड १९१/७ (६० षटके) | वि | |
| | |
न्यूझीलंड १०५/७ (३५ षटके) | वि | इंग्लंड३४/१ (१५ षटके) |
| | |
इंग्लंड २३१/६ (६० षटके) | वि | |
| | |
| वि | इंग्लंड६२/२ (२५.५ षटके) |
| | |
| वि | न्यूझीलंड१७७/७ (५८.५ षटके) |
| | |
इंग्लंड २७९/३ (६० षटके) | वि | |
| | |
साचा:१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक