Jump to content

ह.भ.प. श्री रानबा (रामेश्वर) महाराज गुट्टे

ह.भ.प. श्री रामेश्वर उर्फ रानबा महाराज गुट्टे यांचा जन्म इ.स.१९२५(नंदनंज) मृत्यू १५ जानेवारी २००८ हे वारकरी संप्रदायातील जेष्ट कीर्तनकार आणि प्रवचनकार होते.

परिचय 

वारकरी संप्रदायातील जेष्ट कीर्तनकार आणि प्रवचनकार ह.भ.प. श्री रामेश्वर उर्फ रानबा महाराज गुट्टे यांचा जन्म नंदनंज गावी १९२५ साली झाला. घरातील वारकरी संप्रदायाच्या वातावरणाने लहानपण पासूनच त्यांचा भजन कीर्तनाकडे ओढा होता. त्या काली ग्रामीण शिक्षणाची व्यवस्था नव्हती. मोडी भाषेत काही शिक्षणाचे पाढे गिरवले. शिक्षण घेत असतानाच धार्मिक कार्यक्रम व भजन, कीर्तनात ते सहभागी होत. संसार आणि परमार्थ यांची सांगड घालताना दारिद्र्याचे चटके बसत असत म्हणून परमार्थ त्यांनी कधी सोडला नाही. सुतारकी, लोहारकी, शिवणकाम अशी कामे करून संसार व परमार्थ दोन्ही नेटाने चालू ठेवले.[]

अध्ययन 

उखळीकर हे त्यांचे गुरू घराणे. भजन कीर्तनकाचे विद्यावयात अध्ययन गुरुवर्य पंढरीनाथ शास्त्री महाराज उखळीकर यांच्याकडे केले. मोडी भाषेत शिक्षण घेऊन ही त्यांचे  प्राकृत व संस्कृत भाषेवर प्रभत्व होते. श्री क्षेत्र आळंदी येथे त्यांनी वेदांचे अध्ययन केले .

कार्य 

कीर्तन प्रवचन करत असताना ग्रामीण भागात पंचायतराजला सुरुवात झाली. कासारवाडी, नंदनज ग्रुप ग्रामपंचायतचे ते १७ वर्ष बिनविरोध सरपंच राहिले. कासारवाडी - मराळवाडी - नंदनज याच्या पतसंस्थे वर chairman म्हणून त्यांची निवड झाली जेथे त्यांनी ३५ वर्ष काम केले. राजकारण, समाजकारण व परमार्थ एकाच वेळी चालू ठेवला.

पुढे ते श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे संथ जगमित्र नागा संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक झाले. अनेक वर्ष भजन कीर्तन सेवेतून महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात ते लोकप्रिय झाले. 

दिनांक १५ जानेवारी २००८ पौष शु. ७ मंगळवारी त्यांनी उत्तरायणात सकाळी ६ वाजता देह ठेवला . मकर संक्रांतीच्या पर्वा काळात त्यांनी इच्छा मरण साधले.

संदर्भ 

  1. ^ marathwadasathi newspaper 3 January 2009