ह्वा ग्वोफेंग
ह्वा ग्वोफेंग (देवनागरी लेखनभेद: ह्वा क्वोफेंग, ह्वा ग्वोफंग, ह्वा क्वोफंग; सोपी चिनी लिपी: 华国锋; पारंपरिक चिनी लिपी: 華國鋒; पिन्यिन: Huà Guófēng) या टोपणनावाने ओळखले जाणारे सू चू (सोपी चिनी लिपी: 苏铸 ; पारंपरिक चिनी लिपी: 蘇鑄 ; पिन्यिन: Sū Zhù) (फेब्रुवारी १६, १९२१ - ऑगस्ट २०, २००८) हे खुद्द माओ त्से-तुंगांनी आपल्या पश्चात चिनी साम्यवादी पक्षाचे व चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी निवडलेले राजकारणी होते. १९७६ साली चौ एन्लायांच्या मृत्यूनंतर ते जनता-प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान निवडले गेले.